Author: Annant Ppangarkar
देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प मुंबई, दि. 10 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास…
अहिल्यानगर, दि. १० – प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. शेतकऱ्यांनी वरील संदेशाची लिंक उघडू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर दि. १० मार्च – प्रतिनिधी राज्यात हायटेक ठरलेल्या संगमनेरच्या बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के कोठ्यातील दर्शनी भागातील बांधीव गाळे दिव्यांग तक्रारदारांना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. सात ते आठ वर्षांपासून प्रदीर्घ लढा देणाऱ्या दिव्यांग बांधवांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. संगमनेर बसस्थानकामध्ये बांधकाम ठेकेदार रामहरी कातोरे यांच्या मार्फत बांधा वापरा व हस्तांतरित करा (BOT) या तत्त्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधव क्षेत्रातील तीन टक्के गाळे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असल्याने त्यासाठी शिवाजी संभाजी खुळे यांच्यासह जालिंदर कचरू लहामगे, पुरुषोत्तम बिषणलाल जोशी, शिवाजी गवराम कासार, सुनील बाबुराव खरे…
संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात जबरी चोरीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी ५१ डोळे सोन्याच्या मुकुटासह २ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी केल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने धार्मिक स्थळावर मोठा डल्ला मारल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती समोर येताच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलीस घटनास्थळी तातडीने हजर झाले होते. दरम्यान चोरट्यांनी मंदिरातून केवळ सोन्या-चांदीचे दागिनेच चोरले नाही तर सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) देखील चोरून नेला आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.…
संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी शिवजयंती उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असताना या उत्सवाच्या तयारीवरून संगमनेरात मोठे वादंग निर्माण झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस यंत्रणेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती. घटनास्थळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस दल तसेच संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोहोचले होते. पोलिसांसमोरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सवावरून वाद सुरू होते. पोलिसांसह दोन्ही गट ठाण मांडून बसले आहेत. रविवारी पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ पोलीस व्हॅन…
राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात वादातील मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वाचवण्याची कसरत सुरू आहे. गैरवर्तणुकीचा जनठपका बसलेल्यांना सत्तेत सामील करून घेताना सारासार विचार न करणार्या मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ याआधीही आली होती. तेव्हा फारकाळ न थांबता अशा मंत्र्यांना आणि सत्ता समर्थकांना वेळीच पायउतार व्हावं लागलं. सध्या त्यासाठी दिवसांवर दिवस आणि महिन्यांवर महिने घालवले जात आहेत. मंत्र्यांना वाचवण्याचा हा सिलसिला महाराष्ट्रासाठी घातक आहेच, पण देशभर गौरवल्या गेलेल्या राज्य विधिमंडळाच्या एकूणच परंपरेला छेद देणारा आहे. ज्यांना वाचवण्याची शिकस्त मुख्यमंत्र्यांना करावी लागत आहे ते सारे सत्ताधारी पक्षांशी संबंधित असल्याने युतीच्या सत्तेविषयी घृणा निर्माण होणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने असंख्य चढ उतार पाहिले.…
संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोंची गावच्या शिवारात असलेल्या वनक्षेत्राच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे मुरूमाची तस्करी होत असल्याचा प्रकार महसूलच्या कारवाईत समोर आला आहे. मुरूम उत्खनन करणारे काही वाहनांसह जण फरार झाले असले तरी एक डंपर आणि पोकलेन ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले असून या परिसरातून हजारो ब्रास मुरूम चोरी झाल्याचा संशय आहे. शनिवारी दुपारी कोणत्याही कायद्याला न जुमानता बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. नव्या सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बीड सारख्या जिल्ह्यात आका संस्कृती उदयास आली असून असे आका आता…
शनिवार, दि. ८ – प्रतिनिधी आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अपर तहसिल कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी आहे. तुमच्या ‘यशोधनातून’ जनतेला मुक्तता हवी होती. विधानसभेला तालुक्यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्वातंत्र्य आता तुम्ही हिरावून घेवू नका, असा खरमरीत टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला. आश्वी बुद्रूक येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच थोरातांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. निमित्त होते अप्पर तहसिल कार्यालयाचे. हे कार्यालय आश्वी आणि पंचक्रोशीतील गावे तसेच अन्य शेजारील…
संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या आणि वर्षानुवर्ष अध्यक्ष राहिलेल्या, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याने आर्थिक गैरव्यवहार करत वाट लावलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेला गैरव्यवहाराच्या दृष्टचक्रातून सावरण्यासाठी आता नव्या संचालकांची टीम मैदानात उतरली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. संगमनेरच्या सहकारातील अग्रगण्य असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चेअरमन भाऊसाहेब कुटे याने संस्थेतील काही जणांना हाताशी धरत मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. तब्बल ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चेअरमन भाऊसाहेब कुटे, संस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह तब्बल २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. यातील मुख्य…
शनिवार, दिनांक ८ मार्च साहेबांशी बोलून मोजणी झालेल्या जमिनीच्या हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून पूर्ण काम करून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपये लाचेची मागणी करून साडेतीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाच लुचपतच्या पथकाने पकडले आहे. नितेंद्र काशिनाथ गाढे (वय ३५ वर्ष) असे साहेबांसाठी लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर शिपायाचे नाव आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी ही कारवाई केली. तक्रारदारांच्या मावशीची दीक्षि (ता.निफाड) येथे शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे २५ जानेवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा…
अहिल्यानगर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या अहिल्या नगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार नवे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आज स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पदभार सोपवला. डॉ. आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे…
संगमनेर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला संगमनेर व पारनेर तालुका हा पर्जन्य छायेतील तालुका आहे. तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांच्या कामांमधून तालुक्यात विकास साधला आहे. मुंबई–नाशिक-पुणे या गोल्डन ट्रँगलवर असलेल्या संगमनेर व पारनेर तालुक्यामध्ये नव्याने मोठी एमआयडीसी उभारावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. संगमनेर व पारनेर तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मागील ३५-४० वर्षांमध्ये सततच्या विकास कामांमधून मोठे परिवर्तन झाले आहे. गावोगावी विकासाच्या योजना…
अहिल्यानगर, दि. ७ मार्च – महाराष्ट्र संवाद न्यूज महसूलच्या पथकाने पकडलेले वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडवून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागणाऱ्या पैठणच्या तहसीलदारासह महसूल सहाय्यक आणि एका खासगी व्यक्तीवर अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाने कारवाई केली आहे. या तिघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी इसम सलील करीम शेख (वय- ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. लक्ष्मीनगर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), हरिष शिंदे (महसूल सहाय्यक, वर्ग ३, तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण, वय ४८ वर्ष, रा. ए विंग, फ्लॅट नंबर ३०५, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा…
मुंबई, दि. ७ मार्च – प्रतिनिधी सत्तेत आल्यापासून महायुती सरकारने सुरू केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका अद्यापही सुरूच आहे. गुरुवारी रात्री राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगरच्या रिक्त झालेल्या जागेवर यवतमाळ येथून पंकज आशिया जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतील. आशिया आता अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची बदली पुण्याचे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली होती. सालीमठ यांच्या जागेवर आता पंकज आशिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. बघा कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली? १) यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज अशिया यांची अहिल्यनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. २) MMRDA चे…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद सुरूच असून आता घारगाव पाठोपाठ तळेगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे, सरपंच घनशाम भारस्कर, महेश उदमले, गोविंद कांदळकर, कोंडाजी खेमनर, मच्छिंद्र घुले, निखिल सानप यांच्या शिष्टमंडळांने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे. तळेगाव आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात…
मुंबई, दि. ६ मार्च – युवकांच्या रोजगारासाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र औद्योगिक निर्माण शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शितगृहाची उभारणी करावी, नासिक पुणे रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरमधून नेला जावा, यासह विविध मागण्या आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये बुधवारी केल्या आहे. राज्यपालांच्या अभीभाषणावर आभार दर्शक ठरावावेळी खताळ बोलत होते. राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यादृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून,राज्याला औदयोगीक विकास, कृषी परंपरा मोठी आहे. त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी कोयत्यासह घातक शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करत लूटमार करणाऱ्या संगमनेरमधील कोयता गॅंगला पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या पाच आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेश बबन कुरकुटे (वय २३), सार्थक उल्हास कुरकुटे (वय २०) व प्रथमेश शांताराम दुधवडे (वय १९, सर्व रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सन २०१३ मध्येच संपूर्ण पूर्तता केली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणतेही अडचण राहिली नव्हती. प्रत्येक वेळी यात काही ना काही निमित्त आडवे आले, राजकारण सुद्धा झाले. मात्र, हा दर्जा मिळण्यासाठी तब्बल अकरा वर्षे का लागली हे मात्र न समजण्यासारखे असल्याची खंत मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली. बुधवारी (५ मार्च) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व सह्याद्री परिवार यांच्यावतीने प्राध्यापक पठारे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देत त्यांचा…
नाशिक, दि. ५ मार्च – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. बुधवारी (५ मार्च) न्यायालयाने या शिक्षेला कोकाटे बंधू विरोधात अपील चालेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्यावरील शिक्षेचे बालंट तूर्तास तळले आहे. १९९५ साली कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक करून फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोकाटे बंधू विरोधात न्यायालयात खटला सुरू होता. नासिक जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्यात कोकाटे यांना पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटे यांच्या वकिलाची बाजू ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला होता. या संदर्भात १ मार्च रोजी…
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता संगमनेरात पान टपऱ्यांवर गांजा मिळू लागल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या धंद्यांवर कारवाया होत नसल्याने तसेच संबंधितांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आता हे धंदे चोरून लपून नव्हे तर उघड्यावर राजरोसपणे सुरू आहे. पान टपरी मधून गांजा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले असून या कारवाईमुळे अवैधरित्या अमली पदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाई देखील फार्स…
