Author: Annant Ppangarkar
संगमनेर, दि.२५ मार्च – प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथे कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास साहेबराव बडे (वय ३८) यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. रामदास बडे हे जम्मू-काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रामदास बडे हे ३४ एफ रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या निधनाने मेंढवण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद रामदास बडे यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार, २६ मार्च) दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी, मेंढवण येथे शासकीय…
अहिल्यानगर, दि. २५ मार्च येत्या काही दिवसात संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संगमनेर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तर प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी…
मुंबई, दि. २५ मार्च – प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी, शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही. त्याऐवजी, त्यांना विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्यावे लागतील. या वर्गांमध्ये, विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून शिकवले जाईल. ३० जूनपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याला या विषयांमध्ये प्रवीण करणे हे शिक्षकांचे ध्येय असेल. हे विशेष वर्ग शालेय शिक्षण विभागाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाचा भाग आहेत. या अभियानाचा उद्देश राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवणे आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने शिकवावे लागेल. या उपक्रमात, राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान ७५% विद्यार्थ्यांना भाषा…
मुंबई, दि. २३ मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी २२०० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्याची तसेच, परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांचा संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अकोले आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली. याव्यतिरिक्त, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बस स्थानकाच्या व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांना ३% गाळे वाटप करण्याची अंमलबजावणी करण्याची तसेच, संगमनेरच्या बी.ओ.टी. व्यापारी संकुलाला…
मुंबई, दि. २४ मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेची उपलब्धता करून दिली. मात्र हे स्मारक अधिक भव्य आणि भव्य दिव्य ठरावे यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते. तांबे म्हणाले, २१ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे स्मारक…
ठाणे, दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेरमधील डॉ. सुधाकर पेटकर यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. पेटकर यांचा गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या वतीने ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३४ राज्यस्तरीय काव्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते डॉ. पेटकर यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. सुधाकर पेटकर यांचे ‘चंदनाचे हात’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावाना जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी लिहिली आहे. डॉ. पेटकर यांच्या आत्मचरित्राला…
संगमनेर, दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात वन जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या सहा व्यापाऱ्यांच्या नावावर नोंद करण्यात आलेल्या व महसुली दस्तऐवज असलेल्या सातबारावरील अवैध नोंदी रद्द केल्या आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात सुमारे ८० हेक्टर वन जमिनीवर काही व्यापाऱ्यांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर नोंदी केल्या होत्या. या नोंदींच्या आधारे सदर जमीन हडपण्याचा…
संगमनेर दि. २४ मार्च – प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शहरातील पाच मालमत्ताधारकांची एकूण ९ लाख ८ हजार ९७१ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नऊ नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडे कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या मोहिमे अंतर्गत उप मुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक दत्तू साळवे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश…
अकोले (अहिल्यानगर) दि. २३ मार्च – महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन १०० दिवस उलटले तरी महिलांना या वाढीव रकमेची प्रतीक्षा आहे. या योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ती सुरूच राहणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. २१०० रुपये देण्याबाबत सरकार…
अकोले, दि. २३ मार्च – प्रतिनिधी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत राज्यात ५० ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना आहे. अकोले येथे योग्य जागा उपलब्ध झाल्यास येथेही ‘उमेद मॉल’ उभारण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. ‘कळसुबाई’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार किरण लहामटे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, तहसीलदार सिद्धार्थ…
त्र्यंबकेश्वर दि. २३ मार्च – त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन या आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात प्रामुख्याने दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेत या तीर्थक्षेत्राला खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची कामे दोन टप्प्यांत पूर्ण होतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल. यामध्ये, दर्शनासाठीचा…
मुंबई, दि. २३ मार्च विशेष प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल. तसेच, कार्यकर्त्यांना कामाची आखणी २ एप्रिलपर्यंत मिळेल आणि शहर…
संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संगमनेर पोलिसांनी आज रविवारी शहरातून रूट मार्च काढला, अशी माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत काढलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, गवंडीपुरा, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, माळीवाडा या प्रमुख मार्गांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपीड ॲक्शन फोर्सच्या १०२ बटालियनच्या असिस्टंट कमांडर प्रियंकासिंग परिहार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, पोलीस हवालदार दुधाणे यांच्यासह ३२ जवान,…
संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक काढून कांद्यावर असलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून शून्य करण्यात आल्याचे जाहीर केले असून हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे…
गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल आता सर्वदूर घेतली जाऊ लागली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दंगलीकडे एकांगाने पाहणार हे अगदी स्पष्टपणे दिसू लागल्याने यामागच्या डोक्याची चिरफाड करणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच आवश्यक बनलं आहे. सरकार पुरस्कृत दंगल कशी असते हे नागपूरच्या घटनेने दाखवून दिलं. सरकारी पक्षाची लोकं भाजपचे नेते आणि यंत्रणा या दंगलीनंतर ज्याप्रकारे आग ओकण्याचं काम करत आहेत, ते पाहिलं तर ही दंगल सरकार पुरस्कृतच आहे, असं चित्र आहे. सरकारला विकली गेलेली माध्यमं आणि शासकीय यंत्रणांकडून यातलं खरं काय ते कळू देलं जात नाही. तरी समाजमाध्यमांनी केलेला पोलखोल सारं काही सांगून जात आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत समाज…
नाशिक, दि. २२ मार्च जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांचे चार विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशात नावलौकिक होता. परंतु, संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि ठेवीदारांना पैसे परत करणेही बँकेला जड जात आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या…
शिर्डी, दि. २२ मार्च – संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,…
मुंबई, दि. २२ मार्च – राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने शुक्रवारी ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करत महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे,…
मुंबई, दि. २२ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगरपरिषदेने अन्यायकारक शास्तीकर आणि दंडाचा बोजा टाकला आहे. यातून दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आपल्या फेसबुक या समाज माध्यमात दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या-मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली. मात्र, नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि २% व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी…
मुंबई, दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. न्यायदंडाधिकारी समितीने नुकताच या प्रकरणाचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला आहे. या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत असताना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचे विधान केले होते.…
