Author: Annant Ppangarkar
मुंबई, दि.३ : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. महायुती सरकार जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीकरीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे.…
मुंबई, दि. ०३ : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल…
संगमनेर दि. ३ फेब्रुवारी : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत. या मार्गावर ३९,५०० वृक्षांची लागवड होणार असून त्याचे पाच वर्षांसाठी संगोपन देखील ठेकेदार करणार आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे-नाशिक रस्त्याच्या…
शिर्डी दि. ३ फेब्रुवारी – शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने साईबाबांची शिर्डी या गुन्हेगारी कृत्यामुळे हादरून गेली आहे. या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर…
अहिल्यानगर दि. ३ फेब्रुवारी – महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलेच महागात पडलं आहे. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली. यानंतर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने चोरांचा तपास लावण्यात संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्या गुन्हे करू लागले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर, घरफोड्या करणाऱ्यांनी, दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा. कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते, असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवोद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर विश्वस्त डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एम. ए.…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रख्यात लेखक असलेल्या शरद तांदळे यांनी आज रामाच्या काळात ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी लिहिली आहे. आगामी बळी या पुस्तकाचे ते लेखन करत असून ‘बळी’देखील क्रांतिकारक पुस्तक असेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मेधा महोत्सवाच्या आनंद पर्वाचे सुरुवात झाल्याची घोषणा केली. संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रत्येक तरुणांमध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात. सुप्त गुणांच्या रूपाने प्रत्येकामध्ये दडलेला हा राजहंस आपल्याला माहित नसतो. त्यामुळे बऱ्याचदा तो माहिती करून देण्यासाठी मेधा महोत्सवाचा खूप उपयोग होत असतो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमध्ये रविवारी दोन दिवस चालणाऱ्या आणि तरुण-तरुणींसाठी आकर्षण ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला प्रारंभ झाला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रख्यात उद्योजक व लेखक शरद तांदळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले, अनेक दिवस ज्या उत्सव,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक दि. – २ रविवारी पहाटे नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटामध्ये खासगी लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी असून ४२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तसेच हा अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नितेश राणे यांना महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय व बंदरे यामध्ये खूप काम करण्याचा वाव आहे. ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवा. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर लक्ष दिले तर उत्तम होईल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना सुनावले आहेत. मंत्री राणे यांनी ‘परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी, त्याने कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल’, अशी हास्यास्पद मागणी केली होती. मात्र राणे यांची ही मागणी फेटाळत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सामाजिक भान राखले असल्याचे सांगत रूपवते यांनी हे सरकार जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…
शहाणा होईल तो माणूस कसला, अशी बोली म्हण आहे. मरणासाठी तो कुठल्याही संकटाची तमा बाळगत नसतो. वाईच्या मांढरादेवीच्या गडावर घसरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संकटाची तमा जे बाळगत नाहीत, त्यांना काही सांगून डोकं चालवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. याने मरण आलंच तर आदळआपट करायची आणि गप्प बसायचं. प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति असंच म्हणता येईल. सारासार विचार करणारा माणूस तिथे मरायला जाणार नाही. ज्याला श्रध्देचं ठिकाण मानलं जातं तिथेच अशा घटना घडतात. मात्र श्रध्दा म्हणून कोणी कोणाला वाचवायला येत नाही. पवित्र स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो, असं मानायच्या ठिकाणी ३० जण मोक्षाला गेले. असा मोक्ष…
अहिल्यानगर दि. १ – जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले. यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. १९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत…
अहिल्यानगर दि.१- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपा व अहिल्यानगर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. शनिवारी (१ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुपा व पारनेर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसिलदार श्रीमती गायत्री सौंदणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक उद्योग येऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याला शासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. सुपा व…
संगमनेर दि. १ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान थोरात यांचा पराभव करून संगमनेरमधून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर उत्तर देताना संगमनेरमध्ये आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता. मात्र थोरात यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर असताना देखील थोरात यांनी चाळीस वर्षात काय केले असा प्रश्न…
संगमनेर दि. १ – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली जात असतानाच संगमनेर विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मुंबई येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेत असा निकाल कसा लागू शकतो. हा मोठा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातून सलग…
अहिल्यानगर दि. १ – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचे चार आमदार निवडून येण्याची पात्रता नव्हती त्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा कशा मिळाल्या या राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेस हैराण झाली आहे. राज यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने तिरकस सवाल करत महाराष्ट्राने राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका पाहिली आहे असं त्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विचारलं आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थिती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा…
शिर्डी दि. १ – मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकाऱ्यांनाही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी दर आठवड्याला गावभेटी देत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे पुढील प्रमाणे सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी. यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे. दौऱ्यामध्ये सकारात्मक फलित निघेल…
