Author: Annant Ppangarkar
संगमनेरच्या प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात! गुरुवार, ७ नोव्हेंबर संगमनेर – येथे काही लोकांचा असा समज झाला आहे की, त्यांचा जन्म हा राज्य करायला, तुमच्या डोक्यावर बसायला, बँका, साखर कारखाने, लोकांच्या जमिनी, लोकांचे धंदे, दूध डेअरी, सहकार बँका स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी झाला आहे. मात्र आता तुम्हाला हे ठरवावे लागेल तुमचा जन्म स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला की प्रस्थापितांच्या पोरांची मक्तेदारी चालविण्यासाठी, यांच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाला आहे का? असा सवाल करत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. इतके दिवस एकच खानावळ होती आता मात्र आपल्याला स्वतःची खानावळ सुरू करावी लागेल वंचितची खानावळ सुरू करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर…
मुंबई | विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आणण्यात आलेल्या संजय वर्मा यांची नियुक्ती तात्पुरत्या काळासाठी करण्याचे आदेश काढत राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही ठेंगा दाखवला आहे. शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. २४ तासाच्या आत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे…
बुधवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी रात्री शहरालगत असलेला खांडगाव शिवारातील बाह्यवळण मार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने एका दोन वर्षे बिबट्याच्या मादीला जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या बिबट्याची ही मादी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे जखमी मादी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली. अनेक जण आपल्या दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात जखमी बिबट्याच्या मादीला बघत होते. यावेळी चवताळलेल्या जखमी अवस्थेत मादी बिबट्याने जमावावर हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले. दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दादू मधुकर रूपवते आणि गोविंद बाबाराजा गायकवाड…
बुधवार, ०६ नोव्हेंबर मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बहुतेक इच्छुकांनी पक्षाचा आदेश न पाळता निवडणुकीसाठी अर्ज भरत बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर पक्षाचा आदेश न पाळल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते यांचा समावेश आहे. महायुतीच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पक्षाचा आदेश मानत बहुतेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र तरीदेखील पक्षाचा आदेश न पाळता…
बुधवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – अज्ञात चोरट्यांनी ब्युटी पार्लर आणि बंद असलेला बंगला फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी चोरून नेले असल्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील जाणता राजा मैदान परिसरात ब्युटी पार्लर अज्ञात चोरट्यांनी फोडत १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. दुसऱ्या घटनेत घुलेवाडी हद्दीतील मालपाणी नगरमध्ये बंगला फोडण्यात आला. यातही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे. निकिता अजित साळवे यांचे जाणता राजा मैदान परिसरात मेहेर शाळेजवळ कांसा ब्युटी सलून नावाचे पार्लर आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे…
बुधवार, ०६ नोव्हेंबर नवी दिल्ली : सार्वजनिक हितासाठी सर्व खासगी मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे वाटप करण्याचा अधिकार घटनेने सरकारला दिलेला नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने मंगळवारी ७:२ अशा बहुमताने दिला आहे. घटनापिठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक संपत्ती समाजासाठी उपयुक्त मालमत्तेचे संसाधन असेलच असे नाही. म्हणजे, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक मालमत्ता समाजासाठी वापरता येईलच असे नाही. स्वतःच्या कमाईची खासगी मालमत्ता संविधानाच्या अनुच्छेद ३९ (बी) अंतर्गत समाजासाठी उपयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही, असे घटनापीठाने स्पष्ट केले. तथापि, काही प्रकरणांमध्ये खासगी मालमत्तेवर दावा केला जाऊ शकतो, असेही घटनापीठाने म्हटले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड…
वंचितचे उमेदवार अजीज वोहरांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर संगमनेरमध्ये… बुधवारच्या सभेकडे लागले लक्ष
मंगळवार, ०५ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांच्या प्रचारासाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर बुधवारी संगमनेरमध्ये येत आहे. वंचित घटकातील तरुणांमध्ये सुजात यांची मोठी क्रेझ असल्याने ते संगमनेरमध्ये काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर करत निवडणुकीत रंगत आणली होती. या मतदारसंघातून युवा कार्यकर्ते अब्दुल अजीज वोहरा यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिली आहे. येथील मतदारांच्या एका विशिष्ट वर्गावर आंबेडकर यांचा प्रभाव आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांना आपल्या मतदार संघात प्रचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे…
मंगळवार, ०५ नोव्हेंबर अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी ५ विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या तर ४ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बंडखोरांचा त्रास सहन करावा लागणार आहे. केवळ संगमनेर, कोपरगाव, कर्जत-जामखेड हे तीन मतदारसंघ बंडखोरांच्या बंडखोरीतून सेफ राहिले आहे. महायुतीतील ५ जागांपैकी ३ जागांवर भाजपच्या, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीमधील ४ पैकी ३ जागांवर ठाकरे गटाने तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने नगर शहरात बंडखोरी केली आहे. अकोल्यात महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात…
मंगळवार, ०५ नोव्हेंबर मुंबई : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सोमवारी चार नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले वर्मा आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने…
आपण वाटेला जात नाही आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू खांडेश्वर महादेव मंदिरात जल्लोषात आमदार थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार ०५ नोव्हेंबर संगमनेर – यावेळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी गाजत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास या बळावर आपण सर्वोच्च पदावर असताना काही लोक जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी तालुक्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. चांगली घडी विस्कटित करण्यासाठी प्रयत्न केले, सभा घेतल्या. आता तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना आणि त्यांच्या मागे असलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे…
आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – तुमचे जागेचे प्रश्न सुटतील. काहींना जुन्या मालमत्तेपासून फायदा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कधी आपण जास्तच बोलून जाता, त्याकडे लक्ष द्या त्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. वृषभ – पती-पत्नीमधील संबंध सुधारतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, मुलांना पण घरची ओढ वाटेल. कोणाचाही अपमान होणार नाही, याची मात्र दक्षता घेणे आवश्यक. नोकरीत स्थिती चांगली राहील. मिथुन – मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात. आपल्या व्यवसायात व्यापारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात येतील. शांतचित्ताने महत्त्वाचे निर्णय घ्या. मित्रपरिवारात स्वतःची प्रशंसा होईल. कर्क – व्यापार-व्यवसायात मोठ्या उलाढाली करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, मात्र आपण आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. कामाचा आनंद आणि…
सोमवार, ०४ नोव्हेंबर संगमनेर, अकोले या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांनी सोमवारी संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच काही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची संवाद देखील साधला असल्याची माहिती संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे. निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांचा मुक्काम संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात असून त्यांचा ८७८८४९१६४१ हा संपर्क क्रमांकदेखील जाहीर करण्यात आला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाबरोबरच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंमलबजावणीवर…
सोमवार, ०४ नोव्हेंबर देवळाली – माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदार संघातून भावाविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मुलीला कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर सोमवारी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली आहे. माघार घेतली असली तरी या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना भाऊ म्हणून शुभेच्छा देत प्रचार मात्र भावाऐवजी महायुतीच्या उमेदवाराचा करणार असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी समाज कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या मुलाला म्हणजेच योगेश घोलप यांना महाविकास आघाडीचे उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप स्वतः पुन्हा स्वगृही ठाकरेंच्या…
सोमवार, ०४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या बंडखोरासह रासपच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दोघांनी निवडणुकीचे मैदान सोडल्याने आता निवडणुकीत १३ उमेदवार उरले आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विठ्ठल घोरपडे आणि रासपचे उमेदवार रभाजी खेमनर अशी माघार घेतलेल्या दोघा उमेदवारांची नाव आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले आहे. या मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर भाजपाचे खताळ सलग आठ टर्म आमदार राहिलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना लढत देणार आहे. याशिवाय मनसे आणि वंचितचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या…
सोमवार, ०४ नोव्हेंबर संगमनेर – छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे रविवारी दुपारी संगमनेरमधून अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाचे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा शून्य क्रमांकाने शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. राजू धर्माजी शिंदे असे अपहरण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून अपक्ष उमेदवार असून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवाराच्या अपहरणामुळे राजकीय वर्तुळात कळवळ माजली आहे. अपक्ष उमेदवार असलेले राजू धर्माजी शिंदे हे शिर्डी येथे आपल्या परिवारासह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी शिर्डी विमानतळ मार्गे ते संगमनेरकडे येत असताना शहरानजीकच्या…
सोमवार, ०४ नोव्हेंबर नाशिक – राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून मुलगी तनुजा उर्फ दिपाली हिने अपक्ष उमेदवारी करताना माहेरचे आडनाव वापरू नये यासाठी नोटीस बजावली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. घोलप यांनी मुलीला बजावलेल्या नोटीसचे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. घोलप मुलगा योगेश यांच्या प्रचारासाठी सरसावले आहे. तर घोलप यांच्या कन्या तनुजा उर्फ…
आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – आरोग्यात लाभ होईल, प्रवासाचे योग आहेत. मानसिक तणाव दूर होईल, कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद संभवतात. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल. वृषभ – तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने सर्वांची मने जिंकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि कर्तबगार व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. आत्मविश्वास वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मिथुन – कौटुंबिक समस्या सर्वांसमोर मांडू नका. घरगुती गोष्टी घरी सोडा आणि वडिलांच्या सल्ल्याचे पालन करा. तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा, कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. नोकरीत वाद होण्याची शक्यता आहे. कर्क – दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील. तुमच्या वागण्यामुळे लोक तुम्हाला मदत करतील आणि व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक…
रविवार, ०३ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (०४ नोव्हेंबर) अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी आपापल्या पक्षातील बंडोबांना शांत करण्यासाठी एकवटले असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी वाढविणारा निर्णय घेतला आहे. जरांगे यांचे राज्यभरात उमेदवार नसल्याने काहीसा सुटकेचा निश्वास या महायुती आणि महाविकास आघाडीने सोडला आहे. जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची थेट नावं जाहीर केली आहे. पाटील यांनी दिलेल्या यादीत काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे. राज्यात विधानसभा…
रविवार, ०३ नोव्हेंबर संगमनेर – शनिवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी संगमनेरमध्ये एका सजविलेल्या बैलगाडीत महात्मा बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बळीराजाची पूजा तसेच पुष्पवर्षाव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बळीराजाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती. राजाभाऊ अवसक, सिताराम राऊत यांच्या हस्ते मिरवणूक मार्गावर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकी दरम्यान अनिकेत घुले, राहुल जऱ्हाड, दत्ता ढगे, संदीप काकड, लोकपंचायतचे अध्यक्ष थोरात, शाहीर तुळशीराम जाधव यांनी चळवळीतील गाणी म्हटली. मिरवणुकीमध्ये राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकपंचायत, भारत ज्ञान विज्ञान समूह आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.…
रविवार, ०३ नोव्हेंबर अहिल्यानगर – महाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक पोलीस निरीक्षक, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, निवडणूक…
