Author: Annant Ppangarkar
गुरुवार १२ डिसेंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने एक पत्रक काढले आहे. योजनेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांना माजी महिला व बालकल्याण मंत्री एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल आहे. लोकसभेला महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीमधील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची…
विशेष प्रतिनिधी /मुंबई बुधवार ११ डिसेंबर – लाडक्या बहिणींमुळे महायुतीचं सरकार आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने सांगतात. पण, लाडक्या बहीण योजनेसाठी नव्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना वगळले जाऊ शकते. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम महिलांना यातून वगळण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सर्वाधिक लाभार्थी मुस्लिम – मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’चे सगळ्यात जास्त लाभार्थी हे मुस्लीम समाजाचे आहेत. मात्र, दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यामुळे खरेच दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘लाडकी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बुधवार ११ डिसेंबर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या पातळीवर टीका करतात. मंगळवारी पडळकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जाऊन शरद पवार यांच्याबद्दल टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पडळकरांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपने पडळकर यांना जाब विचारत स्पष्टीकरण मागितलं आहे. पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका करताच राज्यभर त्यांचा आणि ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या भाजपवर सर्वत्र जोरदार टीका होत होती. तरीही भाजपकडून याची अपेक्षित दखल…
बुधवार, ११ डिसेंबर संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेने सुरू केलेले वाँटर एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना खाजगी पाणी पुरवठा करणार्या व्यक्तीकडून पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेची शुद्ध पुरवठा योजना ठेकेदाराला फायदेशीर ठरली आहे संगमनेर नगर परिषदेच्यावतीने दररोज शहरातील उपनगरात नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन टाकुन कायम स्वरूपी हा प्रश्न मार्गी लावला आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीजवळ साई मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. तरीही नगर परिषदेने दहा वर्षांपूर्वी नाशिक येथील ‘प्रथमेश एन्टरप्रायजेस’ या संस्थेला शहरात शुद्ध…
बुधवार, ११ डिसेंबर सातारा – व्यवस्थेला लागलेली लाचेची कीड किती भयानक आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून साताऱ्यामध्ये मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडी सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. न्यायाधीशालाच लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे लाचखोरीमध्ये न्याय यंत्रणादेखील बरबटल्याचे समोर आले आहे. राज्यातील न्याय पालिका क्षेत्रात मोठी खळबळ या कारवाईमुळे उडाली आहे. फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी संबंधितांकडून पाच लाखांची…
बुधवार, ११ डिसेंबर तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले. यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद,…
बुधवार, ११ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमधील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या गोल्डन सिटीतील शिक्षकाचा शिवपुष्प बंगला अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या फोडत ५० ग्रॅम वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात दागिने चोरीच्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना त्यातच आता दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घरे लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून मोठी गुप्तता राखली जात आहे. ७ डिसेंबरला घडलेल्या चोरीच्या दोन घटनादेखील तब्बल तीन दिवसानंतर समोर आल्या आहे. शिक्षक असलेल्या विलास कारभारी काळे यांनी…
मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही…
बुधवार, १० डिसेंबर – मुंबई लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे…
मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सकाळ हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यांचा सहभाग – सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते. यांना दिले निवेदन – मंगळवारी सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभव पंथाचे विजय…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात याही वर्षी महाअधिवेशनाचे आयोजन केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने त्यावर बंदी घातली असून एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर ताशेरेही ओढले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं की, बेळगावला केंद्रशासित करण्यासाठी आजच्या अधिवेशनात ठराव आणा आणि तो केंद्राकडे पाठवा. हा ठराव आज आला असता तर आम्ही तो एकमताने मंजूर करण्यासाठी मदत…
सोमवार ९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही, ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माझे मत मी दिलेल्या उमेदवारालाच जाते का, यावर जर मतदारांना शंका असेल तर त्याचे समाधान…
संख्येने कमी असले तरी विरोधकांचा आवाज कमी होणार नाही – नवनियुक्त अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ग्वाही
सोमवार ०९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. रविवारी नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. पण त्यानंतर विरोधकांकडून कोणीही अर्ज न भरल्याने नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली. ज्याची औपचारिक घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेल्या नार्वेकरांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांना महत्त्वाचे आश्वासन दिले. तसेच यापुढे आता कोणीही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, अशी विनंती नार्वेकरांकडून करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव…
सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशामधील हिंदू बांधवांना दिलासा देण्याची मागणी संगमनेर काँग्रेसने प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला आहे. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहे. मालमत्तेची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या…
सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहे. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार तांबे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशमधील आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना तेथील सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली…
सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमध्ये रोटरी क्लब ऑफ संगमनेर, सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था आणि रत्ननिधी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग व्यक्तींसाठीच्या शिबिराने एक अभूतपूर्व सामाजिक सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला आहे. दोन दिवस चाललेल्या या मोफत तपासणी शिबिरात मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ टीमच्या माध्यमातून २२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३६ रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांना १६२ साहित्यांचे एक ते दीड महिन्यांत मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष महत्त्व – दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी LN-4 हात, पाय, आणि जयपूर फुट यासारखी अत्याधुनिक साधने देण्यात आली. येथील रुग्णांचा सहभाग – रुग्णांची तपासणी, निवड,…
सोमवार ९ डिसेंबर – अहिल्यानगर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दागिने पळविणाऱ्या अशाच एका टोळीला पकडण्यात अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने टोळीतील चार जणांना अटक केली. तर दोघे अद्याप फरार आहेत. या टोळीकडून संगमनेरमधील आठ आणि लोणी मधील एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आहेत आरोपी – पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये मयूर संजय ब्राह्मणे (वय २२, रा. चर्चजवळ, वेताळबाबा चौक, लोणी, ता. राहता जि. अहिल्यानगर), निखिल सुरेश भुजबळ (वय २०, रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे, हल्ली रा. भाने वस्ती, हसनापूर…
सोमवार, ०९ डिसेंबर – संगमनेर सात वर्षांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा पाठलाग सुरू असताना रात्रीच्या वेळी अंधाराचा अंदाज न आल्याने पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी व आरोपी विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री संगमनेर तालुक्यातील सांगवी गावामध्ये घडली. काय होती घटना – याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून तालुक्यामध्ये २०१६ साली हाणामारी झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीने आपल्या मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार गुन्हेगाराचा पोलिसांना मिळाला माग – गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने या आरोपीने पलायन केले होते.…
रविवार, ०८ डिसेंबर – मुंबई विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजप नेते, आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. या निवडीची औपचारिकता बाकी आहे. यांच्या उपस्थितीत भरला अर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज अर्ज दाखल केला आहे. निवड निश्चित – विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज (८ डिसेंबर ) दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानुसार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. परंतु, यावेळेत राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्षपदाचा…
रविवार, ०८ डिसेंबर – नाशिक बस स्थानकात उभ्या असलेल्या ईबस चालकाने बस सुरू करताच क्षणार्धात बसने उसळी घेत समोरील लोखंडी बार तोडत बस थेट स्थानकाच्या भिंतीवर आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल – शनिवारी रात्री अपघाताची ही दुर्दैवी घटना मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात घडली असून यासंदर्भात बसचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. अशी आहेत नावे – अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी…
