Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या बहुचर्चित खुनाच्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य दोघांपैकी एका आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी व तिसऱ्या आरोपीला दहा वर्षे साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २२ जून २०२० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडगावपान येथील फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर ही घटना घडली होती. आदल्या दिवशी झालेल्या भांडणावरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड हे तेथे आले होते. त्यांनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब चत्तर यांना…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीचे प्रकरण तालुक्यात चांगले चर्चेत आले असून सोमवारी न्यायालयाने संस्थापक अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली तर त्याची संचालक पत्नी आणि पतसंस्थेचे महिला व्यवस्थापक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या कोठडीत वाढ झाल्याने पोलीस चौकशीतून काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र आधारे फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूक,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली. निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनाला उभारी मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण निर्णय घेणे सोपे जाईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: आज आपणास आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो, परंतु संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश नक्की मिळेल. कर्क: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग जुळून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत हा तालुका विभागलेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची आपली परंपरा थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे. संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नव्या पिढीतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची प्रभावी मांडणी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या आमदार तांबे यांनी या अधिवेशनात युवकांची बेरोजगारी, महिला सुरक्षा, नाशिक-पुणे रेल्वे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. १९ दिवसांच्या कामकाजापैकी १७ दिवस…

Read More

नाशिक: ​नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. खरातची कोठडी संपल्याने रविवारी त्यास न्यायाधीश एम. व्ही. भराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासासाठी आणखी वेळ हवा असल्याचे सांगत तीन दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयात ​सरकारी पक्षाच्या वतीने वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये. खरातवर आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीचा मोबाईल डेटा रिकव्हर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेरच्या वतीने आयोजित ‘बोलक्या बाहुल्या’ या पपेट शो कार्यक्रमास पालक आणि बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सह्याद्री कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांनी आपल्या बाहुल्यांच्या माध्यमातून नागपंचमी, होळी, अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग, लावणी, हिंदी गीते आणि देशभक्तीपर गीतांची जोड देऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन आणि प्रबोधनाचा हा अनोखा मिलाफ बालकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, डॉ. विवेक वाकचौरे, अरविंद गाडेकर, प्रा. अरुण लेले, दर्शन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अखेर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षसह यांची पत्नी आणि व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे. पोलीस चौकशीमध्ये याप्रकरणी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर वाळे, संचालक असलेल्या त्यांच्या पत्नी कुसुम वाळे आणि व्यवस्थापक सविता हासे यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून, तारण खताऐवजी परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे…

Read More

आपला मित्र कोण, यावरही एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची ओळख सांगितली जाते. ज्याशी मित्रत्व करावं त्याने संकटात साथ द्यावी. स्वत:चं संकट म्हणून त्याने ते आपल्या शिरावर घ्यावं. पण मित्र तगला पाहिजे, तो जगला पाहिजे यासाठी जो प्रयत्न करतो तो खरा मित्र. याच मित्राने त्या मित्राला संकटात टाकलं तर..? तर अशी दोस्ती नसलेलीच बरी. असं राजकीय पक्षाबाबत घडलं तर ते अधिकच वाईट. उघड शत्रुत्व कधीही चांगलं. मात्र मागून वार हा कपटीपणा झाला. अशा कपटी मित्राची संगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सातारात चांगलीच महाग पडली. ज्यांच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता राबवली त्या पक्षाच्या खांद्यावर बसून नको ते उद्योग केले की त्याची चर्चा ही होणारच. दुर्देवाने…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील आणि त्या तुम्ही समर्थपणे पेलू शकाल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर आहार घेणे आवश्यक आहे. ​वृषभ आज मनातील जुन्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. व्यापारात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि एखादे शुभ कार्य ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा हा काळ आहे. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल. ​मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी या प्रकरणातील एकूण १४ आरोपींपैकी ११ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, संस्थापक मधुकर वाळे यांच्यासह तिघांचा अर्ज मात्र फेटाळून लावला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पतसंस्थेच्या अध्यक्षांनी आणि व्यवस्थापनाने त्यांना कर्ज देण्यासाठी शेतजमिनीचा गहाणखत करण्याऐवजी फसवणुकीने खरेदीखत लिहून घेतले. तसेच, काही कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर करत सहकार कायद्याच्या कलम १०१ अन्वये वसुलीची कारवाई केली व जामीनदाराची मालमत्ता जप्त केली. संबंधित प्रकरणात कर्ज वसुलीच्या वादातून फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) संगमनेर तालुका…

Read More

अहिल्यानगर – पारनेर तालुक्यातील निघोज येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन लोखंडी हत्याराच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंजाबमधील एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (वय ४०, रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने चेहऱ्यावर रुमाल बांधून ओळख लपवत आत प्रवेश करून लोखंडी हत्याराचे सहाय्याने एटीएम मशीन फोडून एटीएम मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

दरवर्षी युनेस्को या जागतिक संघटनेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक जागतिक दर्जाचे रंगकर्मी जगाला उद्देशून एक संदेश देत असत्तात. जागतिक रंगभूमी दिन संदेश २०२६: – मी एक अभिनेता आहे, जो प्रामुख्याने चित्रपट अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण माझी मुळे रंगभूमीशी खोलवर जोडलेली आहेत. मी १९७७ ते २००३ पर्यंत वूस्टर ग्रुपचा सदस्य होतो, जिथे मी न्यूयॉर्क शहरातील ‘द परफॉर्मिंग गॅरेज’मध्ये मूळ कलाकृतींची निर्मिती आणि सादरीकरण केले, तसेच जगभर दौरे केले. मी रिचर्ड फोरमन, रॉबर्ट विल्सन आणि रोमियो कॅस्टेलुची यांच्यासोबतही काम केले आहे. आता, मी व्हेनिस थिएटर बिएनालेचा कलात्मक संचालक आहे. ही नियुक्ती, जगातील घडामोडी आणि रंगभूमीवर परतण्याची माझी इच्छा, या…

Read More

आजचे राशीभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेण्यावर भर द्याल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी बदला. वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखकर आणि लाभदायक ठरेल. मिथुन आज…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी- खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार किंवा कोणत्याही गैरकृत्याशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याची भूमिका त्यांनी पहिल्या दिवसापासून मांडली असून आजही त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुराव्याविना माध्यमांमधून होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचे सांगत, भविष्यात सत्य प्रखरतेने समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी चाकणकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली होती. तपासादरम्यान सर्व बाबी स्पष्ट होतीलच, असेही त्यांनी नमूद केले आहे. आज सकाळी आदरणीय सुनेत्रा पवार…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांसाठी वापरलेली आणि चोरीच्या तपासात जप्त केलेली अनेक वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. सन २०१० मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यापासून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील वाहने आहेत: दुचाकी वाहने: MH 17 Q 8396, MH 17 AH 8488, MH 17 N 4920, MH 19 AF 2025, MH 17 DX 7285, MH 17 X 2175, MH 12 WY 0164,…

Read More

पाथर्डी: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौजे कासार पिंपळगाव येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत दोरीने बांधलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कासार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरीजवळील कॅनॉलमध्ये एक संशयास्पद गोणी तरंगताना नागरिकांना दिसली. याबाबतची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल बंकट जवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोणी उघडली असता त्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक, एकतर्फी आणि भेदभाव करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी (राजपूत) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. अमर कतारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने केवळ नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमणे हटवून गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे, मात्र शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. ज्या मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सुविधा नाही, अशा ठिकाणी धनदांडगे…

Read More

नाशिक/कोपरगाव: नाशिक येथील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सध्या ‘विशेष तपास पथक’ (SIT) करत आहे. या तपासादरम्यान एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात असून, यामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलांच्या सन्मानाला ठेच पोहचवणारी ही विकृती रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने तांत्रिक शोधमोहीम हाती घेतली आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या तपासाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावपर्यंत पोहोचले आहेत. कोपरगाव येथील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे…

Read More