Author: Annant Ppangarkar

असा असेल तुमचा आजचा दिवस  बुधवार, दि. ०९ ऑक्टोंबर मेष –  घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या-मोठ्या तक्रारी विचारविनिमयाने सोडवणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. वृषभ –  लहान भावंडांना मदत करावी लागेल. त्यामुळे घरामध्ये छोटी मोठी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचे कर्तव्य करा तुमच्यासाठी त्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होईल. मिथुन –  खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका मनोबल चांगले ठेवा. कर्क –  व्यवहार करताना भावनेचा विचार करू नका. आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात…

Read More

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर  सोलापूरमध्ये मंगळवारी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने समाधान व आनंद वाटतो. ही योजना पुढील पाच वर्षे शासन सुरु ठेवेल. राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी ३ हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. मुख्यमंत्री…

Read More

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर  संगमनेर – रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्त्राईल संघर्ष या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थिती अस्थिर झाली असतानाही भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र आहे. सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रेरणा कार्यक्रमात कडलग ‘चला अर्थ साक्षर होऊयात’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालचंद्र भावे, एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, प्रा. राजू शेख उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. नयना पंजे…

Read More

मंगळवार, ८ ऑक्टोबर  संगमनेरमध्ये बहुतांशी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानांमधून (medical Store) औषध घेण्याची सक्ती रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांना केली जाते. या औषध दुकानातून छापील किमतीवर औषधांची विक्री केली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या उलट रुग्णालयाशी संलग्न नसलेल्या अनेक औषधांच्या दुकानातून औषधांवर दहा ते पंचवीस ते टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने अशा प्रकारची सवलत सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातून देण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर शहर संघटक तथा युवा सेना उपजिल्हा समन्वयक रवींद्र कानकाटे यांनी केली आहे. रुग्णालयांशी संघटना असलेल्या औषध विक्रेत्यांनी अशा प्रकारची सवलत रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिली…

Read More

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर संगमनेर – संगमनेर बसस्थानकावरील प्लँटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सखुबाई महादू चव्हाण (वय ८४ रा आश्वी खुर्द) असे मयत महीलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक-पारनेर बस (क्रमांक एम. एच. ११ बी. एल. ९४०९) नाशिकहून संगमनेर बसस्थानकावर आली होती. याचवेळी सखुबाई चव्हाण ही जेष्ठ महीला आपल्या मुलीबरोबर बसस्थानकावर चालली होती. याच दरम्यान बसचालक प्लँटफार्मवर प्रवाशांची चढ उतार करण्याकरिता बस लावत असतांना अचानक ती पुढील बाजुच्या टायर खाली सापडली. यात टायर महिलेच्या…

Read More

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात सोमवारी रात्री एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून मुरकुटे यांना रात्रीच त्यांच्या श्रीरामपूर मधील निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती संध्याकाळी दिली जाणार आहे. दरम्यान मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पिडीता बँक कर्मचारी असल्याचे समजते. पीडित महिलेने सोमवारी संध्याकाळी राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी फिर्याद दिली होती. या दरम्यान कामानिमित्ताने मुरकुटे सोमवारी मुंबईत होते. ते रात्री उशिराने घरी परतल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. मुरकुटे यांच्यावरील…

Read More

सोमवार, ०७ ऑक्टोबर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियांना सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. यापूर्वी सरकारने ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली होती. आता ही मुदत ३१ डिसेंबर पर्यंत लांबविण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. दरम्यान न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याने त्यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. २०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २९,४२९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. त्यापैकी ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेत सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. आता या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस मंगळवार, दि. ०८ ऑक्टोंबर मेष – प्रकृतीची अपेक्षित साथ मिळेल. आज दिवस आनंदात घालवावा आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मित्र- मैत्रिणींबरोबर मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल. वृषभ – आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. खर्च वाढणार आहे. मनासारखी खरेदी पण कराल. आर्थिक प्राप्तिपण त्याच प्रमाणात राहील. मात्र विनाकारण प्रवास टाळा. मिथुन – आज आपण आनंदी व उत्साही रहा ल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वतः लक्ष देऊन काम करा निश्चित पूर्ण होतील. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल. कर्क – नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. नवीन संधी येतील कोणत्या विचारपूर्वक स्वीकारा यामधील करार नीट आहेत की नाही ते तपासून पाहावे…

Read More

इंदापूरमधून उमेदवारीही झाली निश्चित, पारंपरिक लढत रंगणार! सोमवार, ०७ ऑक्टोंबर काँग्रेस सरकारमधील तत्कालीन माजी मंत्री आणि इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतानाच त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता इंदापूरमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असतील. इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदींच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला. प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.…

Read More

सोमवार, ०७ ऑक्टोंबर मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांना प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांचं वय ८६ वर्षे इतकं आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलयात उपचार केले जात आहेत. त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाला होता, अशी माहिती समजते. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून अद्याप प्रकृतीबाबत काही अपडेट समोर आलेले नाहीत. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत.

Read More

सोमवार, ०७ ऑक्टोबर  असुरक्षित बनलेल्या संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याची मालिका नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात अद्यापही सुरूच आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्यानंतर शनिवारीदेखील एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दागिने घालून घराबाहेर पडणाऱ्या महिला असुरक्षित बनल्या असून दागिने चोरांना लगाम घालण्यात संगमनेर शहर पोलीस यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याची, सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. निर्मला जयराम आंबरे (वय ७१ वर्ष रा. शिवाजी चौक, अकोले, ता. अकोले जि. अहमदनगर) या वृद्ध…

Read More

राशिभविष्य – सोमवार, ०७ ऑक्टोंबर मेष- परिस्थिती प्रतिकूल आहे. दुखापत होऊ शकते. तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. जगा आणि पार करा. आरोग्य मध्यम. प्रेम आणि मुलांची स्थिती देखील मध्यम आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालला आहे. सूर्याला पाणी देत ​​राहा. वृषभ – तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य सौम्य आणि उबदार राहील. प्रेम आणि मुलांची स्थिती खूप चांगली आहे. व्यवसाय खूप चांगला आहे. मिथुन – शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण विजय तुमचाच होईल. आरोग्य मध्यम. प्रेम, मुलांची स्थिती चांगली आहे. व्यवसायही चांगला आहे. लाल वस्तू दान करा. कर्क – भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून पवार यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांची पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारी अकोला येथे पोहोचली होती. येथील सभेत बोलताना विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपच्या कमळाचे चिन्ह असेल, असे सांगत त्यांनी या मतदारसंघात घड्याळ चिन्ह असल्याचे स्पष्ट करत लहामटे यांच्या नावाची घोषणा करत त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यास सांगितले. पवार म्हणाले, मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत केवळ तीन वर्षे काम करायला मिळाले. या काळात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर अकोले – अकोले तालुक्यातील सर्व गाव-वाड्या, वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ आज येथे दिली. अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम गायकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गरिबांना‌ आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या‌ योजनेचा फायदा अकोलेतील नागरिकांना होणार आहे. आदिवासी बांधव हे लोक परंपरा, संस्कृतीचे जतन करतात. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागण्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), परीस गुप्ता (७ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) अशी आहेत. समोर आलेली माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यात ७ वर्षांच्या आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश शनिवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीसाना दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी.…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर निवडणुका आल्या की लोकांच्या भावनेला हात घालायचा हा उद्योग आजचा नाही. लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी बेकामी नेत्यांना असे निर्णय हे घ्यावेच लागतात. मात्र अशा निर्णयांची स्वत:ला शुचिर्भूत मानणारे री ओढतात तेव्हा त्याची चिंता अधिक वाटते. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेली १५०० रुपये जमा करण्याची योजना असो वा ६० वर्षांवरील ज्येष्ठाला तीर्थक्षेत्राचं दर्शन असो. जे काम एखाद्या संस्थेने करायचं ते सरकार करू लागल्याने शासन म्हणून गाडा चालायचा कसा, असा साधा प्रश्‍न आहे. बहिणींना काहीही न करता १५०० रुपये देण्याच्या निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर सुमारे ३५ हजार कोटींचं ओझं निर्माण होऊनही सरकारला आपण काही गैर करतो, असं वाटत नसेल तर…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी वेळ काढा. तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगा. व्यावसायिक जीवनात सक्रिय व्हा. बचतीवर भर द्या. अनावश्यक खर्च करू नका. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. सुख समृद्धी येईल. तुमचे मनोबल उंच राहील. व्यवसायात गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि आनंदी राहतील. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीची चिंता आहे, परंतु यावेळी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. जास्त उत्तेजित होऊ नका. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा प्रयत्न करा. गोष्टी समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या.…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर नाशिक – दररोजच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच या गुंडाराजची प्रचिती गुन्हे शाखेच्या अंमलदाराला आली आहे. आता चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास पकडत असताना त्यांनी अंमलदाराच्या पोटात चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७ वर्ष, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) असे हल्ला झालेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदाराचे नाव असून विकी संजय जाधव उर्फ गट्ट्या (रा. अवधूतवाडी, पंचवटी) असे हल्लेखोर संशयिताचे नाव आहे. संशयित विकी जाधव हा हातात चाकू घेऊन शुक्रवारी रात्री अवधूत वाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. रस्त्याने जाणाऱ्या अंमलदार सोनवणे यांनी हा प्रकार…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर मुंबई – राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या अनुदानाचे १२९ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यभरात पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहे. कापूस…

Read More