Author: Annant Ppangarkar
निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ.…
रविवार, दि. ०१ सप्टेंबर जगाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारे, हिंदवी स्वराज्याचे कर्तेधर्ते, महाराष्ट्राचं अराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज छत्रपती शिवाजी महाराज जिथे असतील तिथे आज काय म्हणत असतील? ज्या राज्याच्या आणि देशाच्या कल्याणासाठी जिवाचं रान केलं त्या राज्यात होत असलेल्या अवहेलनेने राजे निश्चितच अश्रू ढाळत असतील. ते आज आहेत, अशी साधी कल्पनाही या सत्तेला चिरडून टाकण्याला कारण ठरली असती. ज्या छत्रपतींच्या अवमानतेची एकही संधी ज्यांनी सोडली नाही, ते आज चार-चारदा माफी मागायचं ढोंग करत आहेत. माफी मागितली म्हणजे सारी पापं धुवून निघाली, अशी त्यांची धारणा झालेली दिसते. यामुळे कोणीतरी चिरकूट वरळीत गोविंदांच्या नाच्यांमध्ये महाराजांची माफी मागतो. ह्यांना जनाची नाहीच पण मनाचीही…
आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ मेष – दशमेश स्वस्थानी असल्याने उत्साही दिवस. राहू नेपच्यून अचानक लांबचे प्रवास योग दर्शवतात. सगेसोयरे, नातलग आज तुमच्यावर अतिशय खुश असतील. वृषभ – जन्मस्थानी असलेले हर्षल गुरु आज भरभरून आर्थिक लाभ दर्शवतात. सप्तमेश मंगळ धनस्थानी डोळ्याला इजा दर्शवितो. डोळ्यांबाबत सावध राहा. मिथुन – आज कटकटीचा दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानातील चंद्र, बुध आर्थिक समस्या सोडवतील. कर्क – जन्मस्थानी असलेले चंद्र बुध मानसिक शांतता प्रदान करतील. भाऊबंद, सगेसोयरे मात्र आजच्या दिवशी त्रास देण्याची शक्यता. सिंह – स्वस्थानी असलेला रवी व सप्तमात असलेला शनि मंद गतीने प्रगती दर्शवितो. आजच्या दिवशी…
शनिवार, दि. ३१ ऑगस्ट संगमनेर – चुलत भावांमधील वादातील शेत जमीन नांगरल्याचा राग येऊन रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने वार करत तर अन्य आरोपींनी काठ्या, लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य पाच आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर या अन्य आरोपींचा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या…
शनिवार, ३१ ऑगस्ट “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच…
शनिवार ३१ ऑगस्ट शिर्डी – सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती…
शनिवार, दि. ३१ऑगस्ट पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात…
शनिवार, ३१ ऑगस्ट नागपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांच्या मृत भावाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार परिणय फुके, फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रमा (वय ६७), नितीन फुके (वय ४०), पत्नी डॉक्टर परिणीता फुके (वय ४१) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुके यांचे मृत भाऊ संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता. लग्नाच्या वेळी फुके…
शनिवार, ३१ ऑगस्ट शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येत असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंदोबस्तासाठीच्या ताफ्यातील पोलीस जीपला अपघात झाला. अपघातग्रस्त जीपने अन्य काही वाहनांना धडक दिल्याने या वाहनांचेदेखील नुकसान झाले तर अपघातात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण…
मेष – आज तुमच्याकडून होणारे काम कौतुकास पात्र ठरेल. धनस्थानातील गुरु हर्षल युतीमुळे आर्थिक समस्या सुटेल. वृषभ – आजचा दिवस खर्चिक असेल. मुबलक पैसा हाती येईल परंतु खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. मिथुन – आज आपल्या संतापावर नियंत्रण ठेवा. आर्थिक घडी विस्कटत चालल्याने आपली चिडचिड वाढेल. सांभाळा, मित्र धरून ठेवा. कर्क – नाही म्हणायला शिका, म्हणजे फसगत होणार नाही. आज वादावादी केल्याशिवाय पैसा मिळणार नाही. सिंह – प्रवास करू नका, खर्च वाढेल. जोडीदार संयमाची भूमिका बजावेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कन्या – कोर्ट कचेरीच्या खेपा वाढविणारा दिवस. मित्रमंडळी पासून दूर राहा. तुळ – सप्तमेश शुक्र केतूच्या युतीमध्ये आहे. आपल्या…
शनिवार, दि.३१ ऑगस्ट अहमदनगर – श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्याकरिता १० हजार रूपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहील. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील. लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवला आहे. लिलावात सहभाग घेण्याकरीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैध परवानाधारकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी केले आहे.
शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत ५३ हजार ८३० मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ३३ हजार ५१४ पेक्षा अधिक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाआधी…
शुक्रवार, ३० ऑगस्ट राज्य सरकार कर्जाच्या डोंगराखाली असल्याचे स्पष्ट करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह मोफत लाभ अदा करणाऱ्या विविध योजना विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. २०२२-२३ मध्ये राज्यावर ६ लाख २९ हजार २३५ कोटीचे कर्ज होते. २०२३-२४ मध्ये या कर्जाच्या रकमेत १३ टक्के वाढ होऊन ते ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर गेले. २०२४-२५ मध्ये कर्जाची ही रक्कम ७ लाख ८२ हजार कोटींवर जाऊ शकते, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्याने राज्याची बिकट झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अशा योजना संदर्भातील निर्णय असंवैधानिक, मनमानी व तर्कहीन घोषित…
शुक्रवार, ३० ऑगस्ट संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयात निघृणपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या संगमनेर शाखेच्यावतीने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काम बंद ठेवत निषेध करण्यात आला. संघटनेच्यावतीने तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी संगमनेर शाखेचे अध्यक्ष गणेश शिंदे, कार्याध्यक्षा योगिता शिंदे, उपाध्यक्ष अनिल कुंदेकर, सरचिटणीस बाबासाहेब नरवडे, सह सरचिटणीस संग्राम देशमुख, खजिनदार रोहिणी कोकाटे, हिशेब तपासणीस भीमराज काकड, संघटक प्रशांत हासे, सदस्य पोमल तोरणे, विक्रम ओतारी, अनिल आव्हाड, भालचंद्र वैद्य, आर. एम. मुळे, संतोष लंके, डी. बी. भालचिम, डी. ए. शेख, महिला प्रतिनिधी मंगल…
असा असेल आजचा दिवस मेष – मेष राशीचे लोक प्रिय व्यक्तीशी भांडण करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी नाते येऊ शकते. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना लवकरच नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आज, आपण बऱ्याच काळापासून आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत होते, ती संधी आज आहे. आज आपण आपल्या व्यवसायात नवीन योजना लागू करू शकता, जी आपल्याला भविष्यात उत्कृष्ट परिणाम देईल. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आज अति गोड लोकांपासून सावध राहा, हे लोक तुमची फसवणूक करू शकतात. कोणत्याही भांडणापासून स्वतःला दूर ठेवा.…
शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट मुंबई – आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी उशिराने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणास बसलेल्या जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी…
केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी, राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा
गुरुवार, दि. २९ ऑगस्ट मुंबई : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने आज…
