Author: Annant Ppangarkar

सोमवार, १४ ऑक्टोबर मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर या टोल नाक्यांवर ही माफी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला…

Read More

बाळासाहेब थोरातांची शिर्डी विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी, महाविकास आघाडीची ताकद वाढली सोमवार, १४ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पाडण्यात थोरात यशस्वी झाले आहे. अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  सोमवार, दि. १४ ऑक्टोंबर मेष – शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा. व्यावसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या. वृषभ – व्यावसायिकांना उत्साहाच वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल. तरुणांना नैराश्य घालवणारा दिवस. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनुकूल दिवस असणार आहे. प्रगती होईल. मिथुन – आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा. कागदपत्रे नियम अटी यांचा विचार नीट करा. कर्क – प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे. नातेवाईक…

Read More

रविवार, १३ ऑक्टोंबर जे मनाला येईल ते सांगितले जाते. शब्द दिले जात आहे. फुकट पैसे दिले जात आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे वाटतील. कारण ते तुमचेच पैसे आहे. इथूनच लुटलेले पैसे आहेत, ते पैसे नक्की घ्या, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मते द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झूकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभिमान आपणच जगावला पाहिजे. निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांवर टीका केली आहे.रविवारी ठाकरे गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले. ठाकरे…

Read More

संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि सहनही करणारही नाही… रविवार, १३ ऑक्टोंबर  सत्ता सामान्य माणसाच्या विकासासाठी असते मात्र याचा विसर पडलेली, सत्ता आणि पैशाच्या जीवावर राजकारण करणारी काही मंडळी सध्या आपल्या तालुक्यात फिरत आहे. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आयोजित एका संस्थेच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,…

Read More

देशातील सव्यासाची उद्योगपती, देशाभिमानी रतन टाटा यांची दोनच दिवसांपूर्वी एक्झीट झाली. देशासाठी सारंकाही करण्याची उमेद असलेला टाटांसारखा उद्योगपती झाला नाही होणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. तरूणांचं व्यासपीठ समजल्या जाणार्‍या सोशल मिडियावर नव्वदीतला हा उद्योगपती सामान्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो. प्रचंड संपत्तीचा मालक असलेल्या या महायोग्याला श्रीमंतीचा माज नाही की प्रसिध्दीचा सोस. या महान उद्योगपतीची एका विशीतल्या तरुणाशी दोस्ती होणं हे कल्पनेबाहेरील सत्य आहे. हीच दोस्ती भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतीला सोशल मीडियावरचा स्टार बनवून गेली.  शंतनू नायडू हे त्या तरूण दोस्ताचं नाव. शंतनूनेच टाटांना सोशल मिडियाच्या जगाशी जोडलं. या तरुणाच्या आग्रहामुळेच टाटा अखेरच्या काही वर्षांत सोशल मीडियावर तरूणाईच्या गळ्यातील…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  रविवार, दि. १३ ऑक्टोंबर मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा. दुरचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहाल. वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांचा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका. मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील. कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले, त्यासाठी स्वतःची जमीन दिली. मात्र शेजारच्यांनी गुंठाभरही जमीन दिली नाही. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडे साठी कवडीचेही योगदान नसल्याचे स्पष्ट करत निळवंडेचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात तळेगाव दिघे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्या नाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्यप्रदेश मधील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न असून बोल घेवड्यांच्या मागे न राहता काम…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर १९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि…

Read More

शनिवार १२ ऑक्टोंबर  मका तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या थोरात यांनी तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत नरभक्षक बिबट्याला मारण्यासंदर्भात मागणी करत वन विभागाचा हलगर्जीपणा विषद केला. मुनगंटीवार यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच नरभक्षक बिबट्याला तात्काळ करण्याचे आदेश देत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देत असल्याचे थोरात…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वरदहस्ताने पुणे जिल्ह्यातील कासारसाई धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली मावळ तालुक्यातील २०० कोटी रुपयांची ३१ एकर जमीन वाटप आदेश होण्यापूर्वीच नोंदणीकृत साठेखत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केला. दरम्यान या संदर्भात मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. धंगेकर म्हणाले, मावळ तालुक्यातील गट क्रमांक १५४ सह पाच ते सहा गटांतील शासकीय जागा लाटण्याचा हा प्रकार आहे. या जागेवर कासारसाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे अपेक्षित आहे. या जागेचा सातबाराही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर आहे. मात्र, मंत्री विखे पाटील यांच्या जवळचे असलेले सचिन शिंदे, श्वेता…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या…

Read More

असा असेल तुमचा आजचा विजयादशमीचा दिवस  शनिवार, दि. १२ ऑक्टोंबर मेष-  महत्त्वाची कामे करू शकाल. संततीकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन कामाचा आनंद घ्याल. वृषभ –  आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. तत्त्वाप्रमाणे काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे. खोळंबलेली काम सुद्धा पूर्ण करा. मिथुन –  बहीण-भावामध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरण कमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल. कर्क –  प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्तीपण…

Read More

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर तोफेतून गोळा सोडत असताना तो जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवेरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक अग्निवीर गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमध्ये हा प्रकार घडला. गोहिल विश्वराज सिंग (वय २० वर्ष, मूळ रा. गुजरात ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) आणि शक्कींन शीत (वय २१ वर्ष, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह.मू. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड, नाशिक) असे मृत झालेल्या अग्निवीरांची नावे असून अप्पाला स्वामी (वय २० वर्ष) असे जखमी झालेल्या अग्निविराचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी देवळाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास इंडियन शील्ड गन या मैदानावर…

Read More

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर  संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह जिल्ह्यातील १६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर करण्यात आले असून शुक्रवारी राजापूर आयटीआयचे ‘शाहीर विठ्ठल उमप’ असे नामांतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राजापूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राजापूर येथे प्राचार्य यु. डी.पालवे, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी आयटीआय कार्यरत आहेत‌. यापैकी १०८ आयटीआयना त्या जिल्ह्यातील थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांची नावे देण्यात येत आहेत‌. आयटीआयचे नामांतर ही ऐतिहासिक घटना आहे. मुख्यमंत्री युवा…

Read More

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर जीआर, सरकारी जाहिराती आणि स्थानिक आमदार मंत्र्यांकडून उद्घाटनाच्या जाहिरातींचा माध्यमांना सपाटा सुरू आहे. या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत-जामखेडचे रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ट्विटमध्ये पवार म्हणाले, केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या…

Read More

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर सहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेची थकबाकी असताना संचालकपदावर राहता येत नाही, या नियमाचा आधार घेत संगमनेर मधील उद्योजक आणि काँग्रेसचे नेते कैलास पानसरे यांचे दोन संस्थांवरील संचालकपद सहकारी संस्था उपनिबंधक संतोष कोरे यांनी रद्द ठरविले आहे. यामुळे संगमनेरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रायते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि दुर्गामाता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या दोन संस्थांवरील संचालक पद कैलास बाळासाहेब पानसरे गमवावे लागले आहे. पानसरे हे रायते विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांनी शारदा पतसंस्थेमधून कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी आहे. सहकार कायद्यानुसार थकबाकी असताना संचालकपदासाठी काम करणे बेकायदेशीर आहे.…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर मेष – आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सुसंधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे तसेच प्रसिद्धीही आपणास मिळू शकते. नवीन कामास प्रारंभ करू शकता. वृषभ – आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल. आपणास सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मिथुन – कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल. सातत्याने काम करून यश मिळवा. परदेशातून काही संधी आपणास येण्याची अपेक्षा असेल तर, आज ती सुसंधी निश्चित येईल. कर्क – आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. कुटुंबामध्ये अचानक…

Read More

गुरुवार, १० ऑक्टोंबर  अहिल्यानगर – अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात २३ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये हे आदेश लागू करण्यात आले असून सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

गुरुवार, १० ऑक्टोबर  पुणे – सुनेने न्यायालयात केलेल्या फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे आणि न्यायालयाने काढलेल्या नोटीसीमुळे राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकरराव पिचड, पत्नी कमल आणि संबंधितांच्या यांच्या अडचणीत आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढ झाली आहे. पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमल या आदिवासी नसतांना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या सून श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात श्रीमती पिचड यांनी अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीचे सह आयुक्त यांच्याकडे २०१८ पासून तसेच शहापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे देखील तक्रारी केल्या मात्र…

Read More