Author: अनंत पांगारकर

डिजिटल प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून घेण्याचे शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन शुक्रवार, २३ ऑगस्ट शिर्डी – महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरीत केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) यांचेविरूध्द भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट नाशिक – नाशिकच्या पंचवटीत पोलीस पुत्राच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चौघांना पकडले असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव आहे. पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे (२५) आणि भावना कदम (३९) यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी…

Read More

आजचे राशीभविष्य शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ मेष— बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थीक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ— रागावर नियंत्रण ठेवा. आज सर्व काम संथगतीने होतील. आज वाहन सांभाळा, चोरी होण्याची शक्यता. मिथुन— जितका लाभ तितकाच खर्चिक दिवस. चिडचिड, संताप यावर नियंत्रण ठेवा. कर्क— अतिशय फायदेशीर दिवस. जिथे जाल तिथे तुमचा सत्कार केला जाईल. भावबंदकीपासुन चार हात लांब रहा. सिंह— अतीशय प्रेमळ आपुलकीने जपणारी व्यक्ती आज आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करु नका. कन्या— रडका, रडविणारा दिवस. मित्रांपासून सावध रहा. पैशाचे व्यवहार करु नका. तुळ— मामाकडुन आर्थिक भेट मिळण्याचा दिवस. जे बोलाल ते खर होणारा दिवस,…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. बदलापूरच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना तीन पक्षांच्या युती सरकारच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचं वास्तव पुढे आलं आहे. बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही असं उघडपणे बोललं जातं. आजवरच्या अशा घटना भाजपाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग असल्याने गुन्हे दाखल करताना पोलीस आखडतं घेत असल्याच्या तक्रारी केल्या जातं होत्या. …

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट ‘हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो,’असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी गुरुवारी पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आरोपींचा येरवडा जेलमधील मुक्काम वाढला आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी, ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड हे सर्वजण सध्या येरवडा कारागृहात आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या सर्व आरोपींनी जामीनासाठी…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट  बदलापूर येथील नामांकित शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांतील सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र सीसीटीव्हीसाठी निधी न देता शिक्षण विभागाकडून शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे केवळ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. त्यातच शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदेही भरली जात नसल्याने, त्यासाठीही निधी दिला जात नसल्याने शाळांतील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बदलापूर येथील घटनेनंतर आता शाळांमध्ये विशाखा समितीची स्थापना, सीसीटीव्ही प्रणालीची सद्य:स्थिती याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागवण्यात येत आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शिक्षण विभागाने २०१६ मध्ये दिले…

Read More

शुक्रवार, २३ ऑगस्ट नगर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी वृद्धाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीत ज्याचा खून झाला त्याची पत्नी, फिर्यादी व पुतण्या असे दोन साक्षीदार फितूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. दिनकर अण्णाजी गव्हाणे (६५, अल्हणवाडी, पाथर्डी, नगर) या वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. दिनकर गव्हाणे व त्याचा भाऊ मधुकर गव्हाणे या दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून भांडण झाले होते. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी…

Read More

अहमदनगर, २२ ऑगस्ट –  लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा तसेच यासाठी स्वतःच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवत यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे गुरुवारी अहमदनगर दौऱ्यावर असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ. गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ओला यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील त्याचा उपयोग…

Read More

अहमदनगर, २२ ऑगस्ट महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी तुमची अडवणूक केली तर बँकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बँकांना दिला. मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. यानिमित्ताने अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. माजी महापौर शीला शिंदे, संपर्कप्रमुख उज्वला भोपळे, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, जिल्हाप्रमुख मीरा शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख…

Read More

नराधम आरोपींना चौकात जिवंत जाळा – दुर्गाताई तांबे गुरुवार, २२ ऑगस्ट संगमनेर – बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत या आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी केली. तर अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा, अशी मागणी महिला नेत्या दुर्गाताई तांबे यांनी केली. संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत, यांच्यासह ३ हजार मुली सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री…

Read More