Author: अनंत पांगारकर
बुधवार, २१ ऑगस्ट पुणे : अल्पवयीन मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला दारूपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या मैत्रिणीचा तर आरोपीच्या मित्राचा देखील सहभाग समोर आला आहे. शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. नीचपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी मुलाने तिला अमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत तर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्याशी गोड…
बुधवार, २१ ऑगस्ट पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिक मूल्याची घसरण, व्यसनाधिनता यासारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले. कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने…
आजचे राशीभविष्य बुधवार २१ ऑगस्ट २०२४ या राशीसाठी आर्थिक लाभ तर इतर राशींसाठी… मेष— धनस्थानी गुरु, मंगळ, हर्षल युती आज छप्पर फाडके आर्थीक लाभ होण्याची शक्यता. तब्येतीला सांभाळा, पोटाचे आजार होण्याची शक्यता. वृषभ— नवीन वाहन घेण्याची ईच्छा असेल तर ती आज पुर्ण होईल. आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. मिथुन— राशी स्वामी बुध, रवी, शुक्राच्या युतीमधे पराक्रम स्थानी. आज आपल्या हातुन समाजासाठी काहीतरी मोठे कार्य होण्याची शक्यता. कर्क— आज राशीस्वामी अष्टमेशाबरोबर अष्टमस्थानी. सर्व स्वप्न पुर्ण होण्याचा दिवस. सिंह— आज तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तुमचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करेल. दुपारनंतर उत्साही वातावरण, घरातील सगळे आज तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. कन्या— कोर्ट…
मंगळवार, २० ऑगस्ट मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश देत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशीदेखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या…
आजचे राशीभविष्य – मंगळवार २० ऑगस्ट २०२४ मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका. वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस. मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा. कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता. सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या. कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका. तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता. वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज…
मंगळवार, २० ऑगस्ट थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाने मोठे यश मिळविले. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक मिळवत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचे नाव साता समुद्रापार नेले. बँकॉकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ५२ संघ सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजनदादा शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित नेण्या-आणण्याची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या स्वीकारून या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी…
उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापुर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचून शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा…
सोमवार, १९ ऑगस्ट पुणे – विरोधक राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे, मात्र याआधी ज्यांनी अनेक योजनांमध्ये कोट्यावधीच्या भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील जे नेते तुरुंगात जाऊन आले आहेत, तेच जनतेची दिशाभूल करून आपल्या माता भगिनींचा सरकारवरील विश्वास उडावा यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील सिल्वर रॉक्स येथे नीलम गोऱ्हे यांनी आपले उद्योजक बंधू मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. अपर्णा पाठक यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनात…
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान हे भाग्य, थोरात कारखान्याच्या नवीन इमारतीचे पूजन सोमवार, १९ ऑगस्ट संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवी इमारत ही या वैभवशाली परंपरेचा माईल्डस्टोन ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत महत्त्वाचे स्थान ही एकनिष्ठतेमुळे मिळालेली मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वास्तुशांती व पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीडब्ल्यूसीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे,…
सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई : आम्ही राजकारणात ३० ते ४० वर्षे काढली आहेत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री बनू नये का? केवळ प्रस्थापितांनीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे का? उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आमच्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते व यासाठी त्यांनी गुप्तपणे रणनीती आखली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपशी युती तोडून मविआचा पर्याय निवडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, याची त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली असती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले…
