Author: अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेरचे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीची छायाचित्रे…

Read More

जामखेड: शहराच्या शिवाजीनगर भागात एका 15 वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरात शोककळा पसरली आहे.  भक्ती गणेश गायकवाड (वय 15, रा. शिवाजीनगर, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली. भक्तीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नातेवाईक तुकाराम मोरे आणि इतरांनी तिला तातडीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण घेऊ नका. वृषभ (Taurus) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. मिथुन (Gemini) – आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कर्क (Cancer) – आजचा…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर  यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ आमदार झाले आहेत. खताळ यांच्या विजयाने संगमनेरमध्ये शिवसेनेला पहिल्यांदाच आमदारकी मिळाली आहे. तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा असलेल्या खताळ यांच्याकडे आता राजकीय सत्ताकेंद्र आल्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. मानाच्या मंडळांची मिरवणुकीतून माघार- यंदाच्या मिरवणुकीत आणखी एक लक्षणीय बदल दिसतोय. नेहरू चौक मित्र मंडळ आणि तानाजी युवक मित्र मंडळ यांसारख्या पाच प्रमुख मानाच्या गणेश मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. नवघर गल्ली…

Read More

संगमनेर-  व्यंगचित्रकार आणि साहित्यिक अरविंद गाडेकर यांच्या विविध ललित कथांचा संग्रह असलेले ‘मनातल पानावर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी, (७ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.  सह्याद्री कॉलेज येथील के. बी. दादा सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. लेखक गाडेकर यांनी या पुस्तकाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांमधून मनावर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि भावनांचा संग्रह या पुस्तकात ललित कथांच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. यापूर्वी त्यांचे ‘सासू वर्सेस सून’ हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले होते. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार…

Read More

आश्वी | वार्ताहर संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आश्वी बुद्रुक येथील ताजणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. विखे यांनी ताजणे यांच्या योगदानाला आदराने गौरवताना सांगितले, कै. एकनाथ ताजणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानदानाच्या कार्यात समर्पित केले. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, जे आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि…

Read More

संगमनेर-  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणाचा जाहीर केलेला अध्यादेश (जीआर) संभ्रम निर्माण करत असून, केवळ ‘गॅझेट’च्या आधारावर आरक्षण देणे शक्य नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण ते ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता स्वतंत्रपणे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जरांगे पाटलांच्या निर्णयाचे कौतुक- जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन थांबवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत परिपक्व आणि महत्त्वाचा असल्याचे थोरात म्हणाले. आंदोलन चिघळले असते, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागले…

Read More

मेष (Aries)- आज तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्ही उत्साही असाल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus)- आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी विचार करा. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मिथुन (Gemini)- तुमची कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्ये आज खूप प्रभावी असतील. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. जुन्या आठवणी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कौटुंबिक बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि वाद टाळा. सिंह (Leo)- तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला यश मिळेल. समाजात…

Read More

अहिल्यानगर –  गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, त्यांनी जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न (दबाव हॉर्न) आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर ८ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. हा आदेश बुधवारपासून (३ सप्टेंबर) लागू झाला आहे आणि तो ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अमलात राहणार आहे. मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या साधनांच्या वापरामुळे श्वसन संस्थेला हानी…

Read More

संगमनेर –  संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील गवंडीपुरा मशीद ते नगरपालिका चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अधिपत्याखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला गणेश मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये लेझरवर बंदी घातल्यानंतर डीजेचा मुद्दा उपस्थित झाला होता. मिरवणुकीमध्ये डीजेच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण होते, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर गणेश…

Read More