Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाखेर १६ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात, महायुतीकडून अमोल खताळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज व्होरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश सूर्यवंशी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीकडून संगमनेरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली असून या जागेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या विठ्ठल घोरपडे यांनी बंडखोरी केली आहे. नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या…
मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर – सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. ती मी स्वीकारली नाही. शिंदे गटाची जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रामाणिक सैनिक असल्याने मी या ऑफर नाकारल्याने विखे यांनी रागातून माझ्यावर सूड भावनेतून कारवाई केली असल्याची टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. अमर कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मी एकनिष्ठ शिवसैनिक असलेले ती ऑफर नाकारली. काही दिवस गेल्यानंतर लोकसभेच्या काळामध्ये मला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर…
ज्यांनी तालुक्याला त्रास दिला त्यांना माफी नाही नवव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करताच पहिलीच विक्रमी सभा मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर – निवडणुकीतील समोरचा उमेदवार हा मुख्य खबऱ्या आहे, तू आता जनतेच्या कचाट्यामध्ये सापडला आहे त्याचा बंदोबस्त आपण मतपेटीतून कराच, असे आवाहन करताना धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी होती. महिलांचा अपमान होत असताना त्यावेळी जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या या घटनेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. अडीच वर्षात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. गोरगरीब आणि मजुरांच्या अन्नात माती कालविली. तालुक्याला त्रास देणाऱ्यांना आता माफी नाही. दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्ती पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम…
मंगळवार, २९ ऑक्टोंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी गावठी पिस्तुलासह पकडले असून या कारवाईत ३१ लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संबंधित आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आशिष सुनीलदत्त महिरे (वय २८, मूळ रा. सातपूर, नाशिक हल्ली राहणार गोल्डन सिटी संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील कुरणरोड भागात एक व्यक्ती गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती सहाय्यक…
मंगळवार, २९ ऑक्टोबर एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर नवीन नगर रस्त्यावर ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आणि भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख श्रीराम गणपुले यांच्यात वाद झाले. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी शहरात आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस ठाण्यात जात पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आणि आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या या वादाचे वृत्त शहरात पसरल्याने पोलीस ठाण्यात अनेकांनी गर्दी केली होती. दुपारी गणपुले नवीन नगर रस्त्यावर असताना तेथे आलेल्या कतारी यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यासाठी…
मंगळवार, २८ ऑक्टोंबर संगमनेर – राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोरात या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असून नवव्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आतापर्यंत सलगपणे आठ वेळा त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. थोरात यांच्या विरोधात मतदार संघात मोठ्या सभा घेत टायगर अभी… म्हणत नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांनी मोठ्या डरकाळ्या फोडल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने या डरकाळ्या फोल ठरल्या. टायगर अभी… नव्हे तर मैदान छोडके भाग गया! अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. थोरात…
मंगळवार, २९ ऑक्टोबर मला माहिती नाही, राजकारणात नेते निष्ठावंत असतील का नाही, ते सांगता येत नाही. पण कार्यकर्ता कायम निष्ठावंत असतो. ५०० कोटींची संपत्ती असणारा नेता तिकिटासाठी बाप बदलल्यासारखा रात्रीच पक्ष बदलतो, मग अन्याय होतो तो कार्यकर्त्यांवर, कारण त्यांची भूमिका प्रामाणिक असते. पण नेत्यांनी केलेली तडजोड ही कार्यकर्त्यांच्या भावनेवर अत्याचार करणारी असतांना परिस्थितीअभावी त्याला शांत बसल्याशिवाय पर्याय नसतो. हल्ली राजकारणात “निष्ठावंत” राजकारणी बोटांवर मोजण्याइतके आहे, खरंतर आधुनिक राजकारणात निष्ठावंतापेक्षा “विष्ठावंत” नेत्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. नाईलाजाने जागरूक कार्यकर्त्यांलासुध्दा पर्याय नसल्याने या विष्ठावंत नेत्यांच्या भूमिकेशी समरस व्हावे लागते. तो कार्यकर्त्यांच्या भावनेवर अत्याचार ठरतो. हल्ली राजकारणात सत्ता…
मंगळवार, २९ ऑक्टोबर संगमनेर – टाटा एआयए लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा कोर्ट ऑफ द टेबल (सीओटी) हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील वर्षी २२ ते २५ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी मियामी बीच, फ्लोरिडा या अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्समधील किनारपट्टीवरील शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत ते सहभागी होतील. आदित्य यास कोर्ट ऑफ द टेबल होण्यासाठी वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २८ वर्षापासून जीवन विमा सल्लागार, १५ वर्षांपासून म्युच्युअल फंड वितरक व आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या…
आजच्या दिवसाचे राशिभविष्य मेष – एखादी महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंद द्विगुणित होईल. उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. धनलाभाचे योग. वृषभ – एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल. कुटुंबात शुभवार्ता मिळतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल. मिथुन – व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. जुने मित्रमंडळी भेटतील. काही महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते. कर्क – अनेकांशी सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल. सिंह…
सोमवार, २८ ऑक्टोबर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध मैदानात शड्डू ठोकत टायगर अभी… म्हणत विधानसभा लढविण्याचे संकेत देणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे अपेक्षेप्रमाणे लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपकडून उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक असलेले खासदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अमोल खताळ शिवसेनेकडून मैदानात उतरणार असल्याचे रात्री स्पष्ट झाले. शिवसेनेकडून रात्री उशिराने सहयोगी पक्षाच्या उमेदवारांसह पंधरा उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात अपेक्षेप्रमाणे नेवासे आणि संगमनेर या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. तर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच पाच जागांवर अनुक्रमे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. उशिराने जाहीर करण्यात आलेल्या यादीत संगमनेर मधून अमोल खताळ यांना उमेदवारी…
