Author: अनंत पांगारकर

सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मनोबल पण उत्तम राहणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. वृषभ – मन आज हलके होणार आहे. कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. कामही सहजतेने होणार आहेत. सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल. मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत. आपले खिसा पाकीट सांभाळा. कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर मुंबई – राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर  संगमनेर – अनेक वर्षांपासून वापरात असलेला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता दादागिरीने बंद करून कुटुंबाला रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि तहसीलदार यांनी हा रस्ता वहिवाटिस मोकळा करून द्यावा असा आदेश दिलेला असतानाही कुठलीही दखल न घेणाऱ्या संगमनेरच्या प्रशासनाच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील संपूर्ण कुटुंबाने आपल्या अडीच वर्षाच्या बालकासह गेल्या तीन ते चार दिवसापासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे. ऊन, वारा, पावसात हे उपोषण चालू असून प्रांत कार्यालयाकडून या संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाचे उपोषणकर्ते जागेवरच असल्याने माणसे मेल्यानंतर न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर  मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपले पहिले उमेदवार यादी जाहीर केले असून या यादीत राज्यभरातून ९९ जणांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांना पहिल्या यादीत संधी मिळाली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदार संघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड मतदार संघातून आमदार राम शिंदे यांच्यासह राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले आणि पाथर्डी मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. नगर दक्षिणमधून पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात…

Read More

रविवार, २० ऑक्टोंबर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बार उडतो असं दिसताच सत्ताधारी युती सरकारने जणू महाराष्ट्रच विकायला काढलाय असे निर्णय घेऊन टाकले आहेत. यापूर्वी विधानसभा वा लोकसभेच्या निवडणुकीआधी असे निर्णय घेतले गेले. पण यावेळचे निर्णय म्हणजे अतिरेकाचा कळस म्हणता येईल. महाराष्ट्र कंगाल झाला तरी चालेल पण सत्ता मिळालीच पाहिजे, ही मनिषा बाळगलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र विकायला काढलाय, अशीच ही परिस्थिती आहे. जो मागेल त्याला रमणा वाटायचा असा खेळ सरकारने खेळला आणि राज्याला रिकामं खोकं बनवून टाकलं. हा सारा तात्पुरता मामला असावा, असं वाटत असताना या योजना कायम सुरू राहतील, असं जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्य विक्रीचा परवानाच मिळवलाय, असंच जणू सांगून…

Read More

रविवार, २० ऑक्टोबर २०२४ मेष – आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही कामाला विलंब होत नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाचा वेग वाढणार आहे. आपणास सामाजिक कामे मिळतील. वृषभ – आपणास भरपूर काम आहे. मनाची तशी तयारी ठेवा, मात्र काम करताना मन शांत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाहीतर कामामध्ये चुका होऊ शकतील. पेंडिंग कामे करून घ्या. मिथुन – आपणास आजचे ग्रहमान चांगले आहे. दैनंदिन व्यवहार चालू राहतील. आर्थिक व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे होतील. काम जास्त असल्यामुळे जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कर्क – आजचा आपला दिवस नोकरदारांसाठी खूपच चांगला आहे. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार…

Read More

शनिवार, १९ ऑक्टोबर  संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नाम फलक ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तानंतर काढण्यात आला आहे. कापडाने झाकलेला नाम फलक वाऱ्यामुळे उघडा पडला होता तो काढून टाकल्याची माहिती प्रांताधिकारी तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे आणि खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रमोद कुलट यांनी दिली. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात १५ ऑक्टोंबरपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे संगमनेरमधील राजकीय पक्षाच्या कार्यालयांवर लावण्यात आलेले नामफलक कापडाने तात्पुरत्या स्वरूपात झाकण्यात आले आहेत. मात्र बस स्थानकाच्या मालकीच्या गाळ्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाचा नामफलकदेखील कापडाने…

Read More

शनिवार, १९ ऑक्टोबर  विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे कठोरपणे पालन केले जात असल्याचे भासविले जात असल्याचे समोर आले आहे. संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदारांचे संपर्क कार्यालय असून या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र आचारसंहितेतून वगळला गेला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यासह संगमनेर मतदार संघात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. राजकीय पक्षांचे फलक आचारसंहिता लागू होतात तातडीने काढण्यात आले असले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र अद्यापही दर्शनी भागावर आहे त्या स्थितीत आहे. हा…

Read More

शनिवार, १९ ऑक्टोबर शिर्डी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आले. माध्यम प्रतिनिधींना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त असल्याचे श्रीमती सौनिक यावेळी म्हणाल्या.याप्रसंगी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते. आहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींच्या सुलभ संदर्भासाठी या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक…

Read More

शनिवार, १९ ऑक्टोबर संगमनेर – रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने आयोजित फुलझडी एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १८) आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तसेच या एक्स्पोला आर्थिक रुपाने सहकार्य करणारे महालक्ष्मी नेक्सा शोरुमचे मॅनेजर तेजस पवार, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनिल कडलग, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. रविवारपर्यंत (२० ऑक्टोबर) मालपाणी लॉन्स येथे फुलझडीचे आयोजन केलेले आहे. पार पडलेल्या अनोख्या फुलझडी प्रकल्पाला संगमनेरकरांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या प्रकल्पात महिला, पुरुष व लहान मुलांचा विचार करुन…

Read More