Author: अनंत पांगारकर
लाचेचा पहिला हप्ता घेताना नगर जिल्ह्यात भूमी अभिलेखच्या निमतानदारास रंगेहाथ पकडले गुरुवार, ०३ ऑक्टोंबर अहमदनगर – क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणारा पाथर्डीच्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर निमतानदारास लाचेचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून संजय भीमराव मनवरे (वय ५६ वर्ष,रा. भगवाननगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट व…
गुरुवार, दि. ०३ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तथापि, व्यावसायिक कामात व्यस्त राहू शकतात. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. कुटुंबातील एखाद्या महिलेकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. वाहनांच्या सोयी वाढू शकतात. आर्थिकदृष्ट्या चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ- आज संयमाने कामे पूर्ण करा. शिस्त आणि प्रामाणिकपणाने तुमचे काम करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही प्रभावित करू शकाल. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रियजनांची साथ असेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगली कामगिरी कराल. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना…
बुधवार, २ ऑक्टोंबर वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांचा रविवारी मुंबईत राज्यपाल सीपी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. नाईकवाडी यांना २०२० या वर्षीचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणा-या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. सेंद्रिय शेतीतील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आजवरच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. नाईकवाडी यांचे सेंद्रिय तसेच अवशेष मुक्त शेतीतील कार्य हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असल्यामुळे त्यांची निवड ह्या पुरस्कारासाठी झाली. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरणावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्याचे कृषी…
बुधवार, २ ऑक्टोंबर पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बावधन परिसरात घडलेल्या या घटनेत तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली असून या धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या आधीही मुळशीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता…
बुधवार, २ ऑक्टोंबर महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला पैसे द्यावे लागत असल्याने अनुदानांच्या पैशांची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांनीही सरकारवर यापूर्वी टीका केली होती. उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असू द्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवले पाहिजे. सरकार हे ‘विषकन्या’ असते. ज्यांच्याबरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरवशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचे आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरवसा नसतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले…
बुधवार, दि. ०२ ऑक्टोंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. प्रेम जीवन जगणारे लोक खूप रोमँटिक मूडमध्ये असतील आणि त्यांच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग स्वीकारतील. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक समस्यांपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला तिच्या मातृपक्षातील लोकांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकता. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे आणि व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका, कारण त्यात नंतर अडचणी येण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही चांगले लाभ मिळू…
राज्यभरातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवार, ०१ आक्टोंबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेरच्या डीवायएसपी पदाचा तात्पुरता पदभार घेतलेल्या हरीश दत्तात्रय खेडकर यांची नाशिकला बदली झाली असून त्यांच्या जागेवर कुणाल शंकर सोनवणे यांची शासनाने बदली केली आहे. खेडकर आणि सोनवणे यांच्यासह राज्यातील बारा पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुणाल सोनवणे यांची संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बढतीवर दौंडला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर संगमनेरचा पदभार हरीश खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला…
मंगळवार, ०१ आक्टोंबर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डीक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये लांबविण्याचा प्रकार सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वर्दळीच्या लिंक रोड रस्त्यावर घडलेल्या या घटने संदर्भात अधिक माहिती अशी, जेधे कॉलनी येथील आकाश कैलास जेधे या तरुणाने यासंदर्भात मंगळवारी (०१ आक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान शहरातील नवीन नगर रस्त्यालगतच्या लिंक रोड येथे असलेल्या एचडीएफसी बँकेबाहेर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले आहे. या संदर्भात संगमनेर…
मंगळवार, ०१ ऑक्टोबर मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश… मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक…
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना मंगळवार, ०१ ऑक्टोंबर यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय होणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता तालुक्यात नऊ गावांमध्ये युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे. येथे होणार अभ्यासिका व ग्रंथालय… कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री…
