Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २७ ऑगस्ट पुणे : धडापासून हातपाय वेगळे केलेल्या आणि शिरच्छेद झालेला अवस्थेत पुण्याच्या खराडी भागात नदीपात्रात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २० या वयोगटातील असलेल्या या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटविण्याचे आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम चंदननगर पोलिसांनी सुरू केले आहे. खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळे करण्यात आले…
बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी ७१०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आणि अध्यक्ष शंकरराव खेमनर यांनी म्हटले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (२७ ऑगस्ट) डाळिंबाला चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबास २५१ ते ३५० रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५२८१ कांदा गोण्यांची आवक…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ मेष – आज आपल्यावर आलेल्या संकटात भावाची मोलाची मदत मिळेल. आपल्या संततीमुळे आज आपला मान सन्मान वाढेल. वृषभ – आपल्या राशीमध्ये असलेला राजयोग आज आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. मिथुन – अतिशय खर्चिक दिवस. आज स्वभाव चिडचिडा बनेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. कर्क – आज संततीसाठी किंवा संततीकडून अतिशय पैसा खर्च केला जाईल. आज आपलं भाग्य आपल्याला साथ देणार नाही. सिंह – आज तब्येत साथ देणार नाही. साथीच्या आजारामुळे वैतागून जाल. आज आराम करा. कन्या – लाभस्थानी असलेला राशी स्वामी बुध आज शेअर मार्केटमध्ये लाभ मिळवून देण्याची शक्यता. तूळ -…
मंगळवार, २७ ऑगस्ट नाशिक – मालेगाव महापालिका हद्दीत केलेल्या विविध विकास कामांची पडताळणी आणि मूल्यमापन न करता २० लाख ६७ हजार ६०७ रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक करत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा चौकशीअंती ठपका ठेवत नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या १५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या तक्रारीवरून २० लाख ६८ हजार ६०७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये छावणी पोलीस ठाण्यात शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव, सेवानिवृत्त तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर हरी देवरे, तत्कालीन कनिष्ठ अभियंता संजय जनार्दन जाधव, सेवानिवृत्त तत्कालीन उपअभियंता राजेंद्र काशिनाथ बाविस्कर, खाजगी व्यक्ती सोहेल अब्दुल रहमान…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मंगळवार, २७ ऑगस्ट ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. सत्ताधाऱ्यांच्या घिसाड घाईमुळेच पुतळा उध्वस्थ झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेने केंद्र सरकारबरोबरच नौदल आणि राज्यातल्या सरकारची छी थू होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना करण्याकरिता शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पंतप्रधानांनी अनावरण केलेला हा महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गचे आमदार…
आजचे राशीभविष्य मंगळवार २७ ऑगस्ट २०२४ मेष – तृतीयेमधील मंगळ आप्तस्वकीयांच्या रोषाला कारणीभूत होऊ नका. भाग्येश गुरु धनस्थानी असल्याने अजूनही भाग्य तुमच्या बाजूने आहे. वृषभ – मंगळाचे धनस्थानातील आगमन आर्थिक समस्या उद्भवू शकतात. आज नवीन वास्तूचे सुख अनुभवाल. मिथुन – आजचा दिवस संतापी. शांत राहून गोड बोलून काम करून घ्या. भाग्येश शनी मंद गतीने प्रगती दर्शवतो. कर्क – आज वाहन सांभाळून चालवा, अपघाताची शक्यता. आजच्या दिवशी आप्तस्वकीय विचित्र वागतील. सिंह – आज नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. खिसा, पाकीट सांभाळा आर्थिक नुकसानीचा दिवस. कन्या – आज खोट्याचा सामना होईल. तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुळ -…
मंगळवार, २७ ऑगस्ट इलेक्ट्रॉनिक व्यवसायासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यासाठी साडेपाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असलेल्या छत्रपती संभाजी नगरच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू आश्रुबा सांगळे याला सोमवारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून त्यांना सदर व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला होता. सदर कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाइन प्रकरण…
सोमवार, २५ ऑगस्ट अहमदनगर – मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे…
सोमवार, २६ ऑगस्ट पुणे – भांडण सोडविण्यास गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. पसार झालेल्या हल्लेखोरांना सोलापूर परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९ वर्ष, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २० वर्ष, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड…
सोमवार, २६ एप्रिल | अनंत पांगारकर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या काळात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती, मात्र संगमनेरकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दोन मटका टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना पंधरा दिवसाचा कार्यकाळ उलटून देखील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या ‘शक्तिमान टॉवर’चा पत्ता सापडलेला नाही. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात केलेल्या उपोषणानंतर जिल्हा पोलीस दलात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या जागेवर नगरहून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब…
