Author: Annant Ppangarkar

गुरुवार, ०८ ऑगस्ट  संगमनेरमधील एचडीएफसी बँकेतून काढलेले दोन लाख रुपये अल्टो कारमधून लंपास करण्याची घटना घडवून आठ दिवसांचा कालावधी उलटला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश आले आहे. शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण संपले असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असून दागिने दुचाकी आणि रोकड रकमेच्या चोऱ्या देखील वाढल्या आहेत. पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश येत आहे. दुचाकी चोर, धूम स्टाईल दागिने पळविणारे आणि रोकड लंपास करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लागत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. २ ऑगस्ट रोजी वरवंडी येथील प्रवीण सोन्याबापु वर्पे हे आपला मित्र प्रमोद भाऊसाहेब शिंदे याच्यासोबत संगमनेर…

Read More

गुरुवार, ०८ ऑगस्ट  पुण्य कर्म करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने राम मंदिरासाठी तब्बल तीन कोटी रुपयांची देणगी दिली होती. आता अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेल्यानंतर दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी करोडोंची दिलेली देणगी चर्चेत आली आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्यात दर्शन घेतले. यावेळी अक्षयने दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी १.२१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचे दर्ग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हाजी अली दर्ग्यात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अक्षय कुमारने दिलेल्या देणगीनंतर दर्गा ट्रस्ट टीम आनंदी आहे.…

Read More

गुरुवार, ०८ ऑगस्ट अकोले तालुक्यातील एका खून खटल्यात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त करताना गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन वर्ष कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन पैकी एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले. नामदेव रामा सारोक्ते व नामदेव इंद्रभान सारोक्ते (रा. सोमलवाडी, ता. अकोले) यांनी केलेल्या मारहाणीत बुळेवाडी, (ता. अकोले) येथील ५५ वर्षीय प्रभाकर रामभाऊ गंभीरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजुर (अकोले) पोलीस ठाण्यात मृत प्रभाकर गंभीरे यांची सासू यमुनाबाई तुळशीराम सारोक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीं विरोधात खून केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक…

Read More

विशेष विमानांद्वारे बाधीत देशवासियांना आणणार परत मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती गुरुवार, ०८ ऑगस्ट बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते ईत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस.…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर देवदुताची उपाधी मिळालेल्या डॉक्टरनेच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यातील घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना ताप तसेच हातपाय दुखत असल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ. कुटे हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. तेथे असलेल्या कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ. रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले. तपासणी करत असताना डॉ. कुटे…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  चार मजली इमारतीचे दोन मजले अवैध असल्याने त्यावर निष्काशनाची कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या व त्यापोटी ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यासह आणखी दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार अशोक तारी, (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व मुंबई), मोहम्मद शहजादा मोहम्मद यासिन शहा (प्रॉपर्टी इस्टेट एजंट) आणि प्रतीक विजय पिसे (कंत्राटदार) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींची नावे आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली असून या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ७ आणि ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी अंतिम सामन्यात भाग घेण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश ५० किलो वजनी गटातील अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे विनेशला यापुढे ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. असे म्हटले जात आहे की सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेश फोगटचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. मंगळवारी विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जगातील नंबर वन खेळाडूचा आणि सेमीफायनलमध्ये क्युबाच्या खेळाडूचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो वजनी गटात विनेश फोगटचे किमान रौप्य पदक निश्चित झाले. पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या पीटीआय या वृत्तसंस्थेचे वार्ताहर अमनप्रीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेशचे वजन जास्त…

Read More

बुधवार, ०७ ऑगस्ट  सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उपयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या समावेश असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या शहरातील अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात बदलीचे ठिकाण… ★ संदीप पालवे – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजी नगर (पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) ★ संदीप भाजीभाकरे – पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर) ★ विवेक विठ्ठल मासाळ – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १३, गडचिरोली…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट राहाता – सलग दुसर्‍या हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेने राजकिय दबावापोटी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्ज नाकारले, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभासद व शेतकर्‍यांच्यावतीने जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी दिली. या आंदोलना बाबतचे निवेदन सर्व संबंधितांना पाठविल्याचे सांगत अ‍ॅड. कार्ले म्हणाले, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला मागील हंगामात जिल्हा सहकारी बँकेने ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते. तसे पत्रही जिल्हा बँकेने कारखान्याला दिले होते. परंतु मंजुर केलेले कर्ज राजकिय सुडबुध्दीने बँकेने नाकारले.…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट  उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देताना सर्व बंधारे भरून द्यावे, मागणी काँग्रेस नेते निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. थोरात यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरणाची निर्मिती दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणार आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने लाभ क्षेत्रातील ओढे नाले…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट  दोन सख्या अल्पवयीन बहिणींना कळवण्यात त्यांच्यावर अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी २५ वर्ष सक्तमजुरी आणि साडेसात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. धनंजय सखाराम राजीवडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून पुण्याच्या वारजे येथे ४ आणि ५ एप्रिल २०१५ रोजी घडलेल्या या या प्रकाराशी संबंधित खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश या साळुंखे यांच्या न्यायालयासमोर सुरू होती. पीडित अल्पवयीन बहिणी वारजे येथे राहणाऱ्या मामाकडे आल्या होत्या. त्यावेळी आरोपी धनंजय राजीवडे त्याने दोन अल्पवयीन मुलांची मदत घेत त्यांच्या मदतीने या १४ आणि १६ वर्षे वयाच्या बहिणींसोबत लग्न करतो असे आमिष दाखवत त्यांना प्रेमाच्या…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट आगामी काळात पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाह क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाय योजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी इमारतीच्या समूह विकासाचे (क्लस्टर) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये पूर परिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.…

Read More

मंगळवार, ०६ ऑगस्ट बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास विरोध करतात आणि विद्यार्थ्यांना मारतात, असे शाळेतील विद्यार्थ्यांकडून समजल्याने शाळेच्या गेटवर आंदोलन करत निवेदन देण्यात आले. हिंदू संस्कृतीचा शाळा अनादर करत असून कपाळावरील गंधामुळे एकाग्रता वाढवणे, शितलता प्रदान करणे, असे अनेक वैज्ञानिक फायदे यात आहे. महाराष्ट्र सरकारचा शाळेत टिळा लावण्यांचा अध्यादेशही पारीत आहे. शाळा ही विद्येचे मंदिर आहे. त्या मंदिरात कपाळावर गंध लावण्यास विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. गंध लावण्यास विरोध करू नये. केल्यास आपल्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या निवेदनातून…

Read More

लहानपणी आई डबा करून दयायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलेव की खूप वाटायचं. आपणही खावं पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं. मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले. सुती कपडे महाग झाले. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले. लहान होतो…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट पुणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट अहमदनगर – कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट  अज्ञात व्यक्तीने घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षे वयाच्या वृद्धाचा डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालत खून केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. साहेबराव भिमाजी उनवणे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावात ही घटना घडली असून या वृद्धाचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. साहेबराव उनवणे हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून घराबाहेर असलेल्या पडवीमध्ये झोपले होते. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खुनाचा हा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला. सकाळी घराबाहेर आलेल्या उनवणे यांच्या सुनेला ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. उनवणे…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट संगमनेरमधील एका अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राजू पवार (रा. वडगाव गुप्ता रस्त्यावरील आठरे पाटील शाळेजवळ, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने पीडित फिर्यादी अल्पवयीन मुलीवर ९ मार्च २०२४ रोजी दुपारच्या वेळी व २७ जुलै २०२४ रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ती’ विवाहिता पती आणि मुलासोबत बँक खात्याची केवायसी करण्यासाठी बँकेत आली. बँकेत गर्दी असल्याने नवऱ्याला मुलासाठी खाऊ आणण्यास पाठविले आणि बँकेत असे काही घडले की नवऱ्याला बायकोच्या शोधासाठी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती पाहून पोलिसांसोबत सर्वच चक्रावले. सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगवा सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची धावाधाव सुरू आहे. अशा स्थितीत या योजनेच्या नावाखाली महिलेने आपल्या पती मुलासह बँकेत येत प्रियकरासोबत भुर्र होण्याचा प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये समोर आला आहे. घडलं असं की, नांदेडच्या…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्ध विचारांचे वारसदार असलेले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनालयाकरिता अध्यायावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता संगमनेर तालुक्यातील बारा गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयाकरता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. थोरात म्हणाल्या, तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. याकरता आमदार थोरात व आपण पाठपुरावा केला. संगमनेरमध्ये वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक…

Read More