Author: Annant Ppangarkar
शनिवार २० जुलै केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पूजा खेडकर प्रकरणामुळे सोनींनी राजीनामा तर दिला नाही ना, याबाबतदेखील आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोनी यांनी गेल्यावर्षीच यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्षांनी २०२९ मध्ये संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने यूपीएससी चर्चेत आली आहे. या राजीनाम्याचा अर्थ खेडकर प्रकरणाशीही लावला जात असल्याने खळबळ उडाली आहे. सोनी २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले.…
खासदारांच्या एलसीबी विरोधातील लेटर बॉम्बकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष अहमदनगर पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? एलसीबीला नेमका आशीर्वाद कोणाचा? एलसीबीतील हप्तेखोरांची नावानिशी तक्रार करून अद्यापही दखल नाही शनिवार २० जुलै | अनंत पांगारकर अहमदनगर पोलीस दलातील विशेषत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) भ्रष्टाचारा विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खासदार निलेश लंके यांनी एका पत्राद्वारे तक्रार करून देखील आठवडा उलट झाला तरी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून (२२ जुलै) लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर एलसीबीच्या विरोधात…
विशेष प्रतिनिधी / मुंबई पक्ष फुटीचे अनेक दरवाजे ओलांडणारे काँग्रेसचे बांद्रा येथील आमदार बाबा सिद्धिकी यांचे पुत्र झिशान सिद्धिकी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बांद्रा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीला सांगलीप्रमाणे धडा शिकवू असा इशारा दिला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता, याची आठवण झिशानने करून दिली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटात समावेश केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे पुत्रे झिशान सिद्दीकी हे एकटे पडले…
शनिवार २० जुलै चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या कळंब पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे व त्याचा साथीदार पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावानजीक उपळाई पाटी आहे. या ठिकाणी तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटसमोर काही दिवसांपूर्वी ३ शेळ्या व बोकड बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आले. शेळ्या आणि बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता…
प्रवीण पुरो | मुंबई महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पराभवाला कारण ठरलेल्या काँग्रेसच्या सात फुटीर गद्दारांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेचे निवडणुकीत काँग्रेसची मत फुटल्याचे समोर आले आहे. हे सगळे आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. फुटलेल्या सातही आमदारांची पक्षातून हकालपट्टी होणार असून त्यांना निलंबित करण्याची कारवाई दोन दिवसात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल या कारवाईची घोषणा करणार आहेत. विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची…
शुक्रवार, १९ जुलै आपापसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवारी (२७ जुलै) जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे (उदा. चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे), चेक बाऊन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रकरणे…
गुरुवार १८ जुलै संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त योग्य व पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता यशोधनच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात असून अनेक दिवस रखडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीकरता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर आज बैठकीला सुरूवात झाली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना योग्य व पात्र लाभार्थींना मिळाव्यात यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवकांच्या मार्फत तळागाळापर्यंत योजना पोहोचविल्या आहेत. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, निराधार, अपंग, विधवा, परीतक्त्या अशा अनेक पात्र व्यक्तींचे फॉर्म भरून तहसील कार्यालयात जमा…
गुरुवार १८ जुलै गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरप्रकारातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरात आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजाऱ्यांनी अत्याचार करत तिघा समाज विघातक आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संगमनेरमध्ये संविधान प्रेमी भारताचे नागरिक, ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजासह इतर धर्मियांनी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या नावाखाली हिंसाचारासंदर्भात गुन्हेगारांवर तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे महिलेवर केलेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना कठोर शासन केले जावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहन सात ते आठ किलोमीटर अंतरावरील गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते, घातक शस्त्र घेऊन विशिष्ट…
गुरुवार १८ जुलै शेत जमिनीचा फेरफार मंडल निरीक्षकांना सांगून प्रतिवादीच्या नावावर न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणे तलाठ्याच्या अंगलट आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तलाठ्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने विविध कलमांतर्गत अनुक्रमे तीन व दोन वर्ष कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उत्तमराव पांडुरंग तांबे असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्या विरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८/२०११ कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) ला.प्र. अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. या…
गुरुवार, १८ जुलै अवैध धंद्यांवर कारवाईचा थातूरमातूर फार्स करणाऱ्या संगमनेर पोलिसांनी केलेल्या दोन कारवाया चर्चेचा विषय ठरल्या आहे. शहर पोलिसांनी दोघा गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गांजा ओढणारे पोलिसांना सापडतात मात्र विकणारे पोलिसांना सापडत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ असलेल्या गांजाचे सेवन केल्याच्या कारणावरून पांडुरंग सावळीराम अस्वले (वय ४९ वर्ष नॅशनल शाळेजवळ, कोल्हेवाडी रोड, संगमनेर) आणि राजेश सोमनाथ दिघे (वय २९ वर्ष, शिवरामनगर, कासारवाडी रोड, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहे. या दोघांविरोधात अनुक्रमे पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास धर्मनाथ शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य…
लाडक्या बहिणींनंतर लाडक्या भावासाठी सरकारची स्टायपेंड, सात लाख कोटींच्या कर्जानंतर पैसा आणणार कुठून?
विशेष प्रतिनिधी / मुंबई ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका भाऊ योजने’ची घोषणा केलीय. मात्र ‘लाडका भाऊ योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. राज्यभरातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर गाव-खेड्यात या योजनेचा अर्ज दखल करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनाची राज्यभरात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असताना, आता विद्यार्थ्यांसाठी ‘लाडका भाऊ’ योजना राज्य सरकारनं आणली आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे केली आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना आणि राज्यावर सात लाख हजार कोटी…
बुधवार, १७ जुलै पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम आहे. ही वसुंधरा अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरण व संवर्धनाच्या या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ व्या वर्षाचा शुभारंभ आज पेमगिरीच्या चंदनगड येथून थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल थोरात, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील,…
बुधवार,१७ जुलै भावाची मुलगी सून म्हणून घरात आणली. विवाह संबंधातून काही दिवसांनी ती गर्भवती राहिली. बाळंतपणासाठी तिला तीन-चार दिवसांपूर्वी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिला मुलगीदेखील झाली, मात्र त्यानंतर जे समोर आले त्यातून दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी येथील रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्र आणि इतर बाबींवरून गर्भवतीचे वय कमी असल्याचे व ती अल्पवयीन डॉक्टरांच्या लक्षात आले. ती अल्पवयीन असताना तिचा विवाह झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. दरम्यानच्या काळात तिचे बाळंतपण होऊन तिला मुलगीदेखील झाली. या…
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाच्या निधीतून उत्कृष्ट कामे सुरू बुधवार, १७ जुलै आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. “हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर” असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
बुधवार, १७ जुलै रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय थाटून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत. नव्याने आलेल्या भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९३ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अतुल दिनकर उंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव आदींनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरमधील मेनरोडवर, अशोक चौक, नवीन नगर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हातगाडी, दुकाने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उपद्रव होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पंधरा ते वीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यात या कारवाया करण्यात आल्याचे समोर आले असले तरी रस्त्यावरील व्यावसायिकांच्या वाहतुकीला…
विशेष प्रतिनिधी / मुंबई उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री खा. सुनील तटकरे यांच्या बरोबरच आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ३३ कोटी रुपयांच्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटमुळे शिंदे सरकारवर क्लीनचिट सरकार अशी शेरेबाजी केली जावू लागली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली असली तशीच याआधीही महायुतीतील अनेक नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. राज्यात तत्कालीन…
मंगळवार १६ जुलै | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत. यातील भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात…
मंगळवार, १६ जुलै ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ यावर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या चंदनगड डोंगरावर बुधवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. अभियानाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते…
मंगळवार, १६ जुलै म्युच्युअल फंड्स गुंतवणूक, जीवन विमा, मेडीक्लेम विमा क्षेत्रातील प्रथितयश ब्रँड म्हणून नावारूपास आलेल्या कडलग इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी माईंड एक्सलंस प्रोग्रामचे प्रशिक्षण माईंड एक्सलंस कोच व ट्रेनर सुधीर फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. माईंड एक्सलंस टेक्नॉलॉजीजद्वारे आयोजित हा १४ आठवड्यांचा कार्यक्रम अत्याधुनिक पद्धतीने संमोहन व NLP तंत्रांचा वापर करून व्यक्तिगत व व्यावसायिक क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी बनवला आहे. कडलग इन्व्हेस्टमेंट फर्मचे संचालक सुनील कडलग व आदित्य कडलग यांच्या प्रेरणेतून या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून, फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे कर्मचार्यांचे मानसिक ताण तणाव कमी…
मंगळवार, १६ जुलै सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सोमवारी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने एका बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकताच काही वेळातच या मार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या मार्गाची काही छायाचित्रे या परिसरातील स्थानिक जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठविली होती. संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूजने…
