Author: Annant Ppangarkar

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी जगन्नाथ पुरीचा रथ आणि कृषी संस्कृतीचा मिलाप साधणाऱ्या देखण्या आरासीत गणरायाची स्थापना झाली. तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानीही गणेशमूर्तीची अत्यंत उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळ आणि यशोधन जनसंपर्क कार्यालयातही श्रींची स्थापना करण्यात आली.  याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, आर्किटेक्ट राजवर्धन थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, टाटा कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. हसमुख जैन, डॉ. हर्षल तांबे, डॉ. वर्षा तांबे, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. शिवनगर आणि नेहरूनगर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून, या कारवाईत ८ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक हमीद चाँद शेख यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना शिवनगर आणि नेहरूनगर भागात काही व्यक्ती…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या संगमनेर येथील अमृत उद्योग समूहातील विविध प्रमुख सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, १७ सप्टेंबर ते रविवार, २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभा होणार आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी तालुक्याच्या ग्रामीण विकासासह शेतकरी, दूध उत्पादक, कामगार आणि व्यापाऱ्यांना बळ देऊन स्थानिक अर्थव्यवस्था भक्कम केली आहे. यंदाच्या सर्वसाधारण सभांच्या मालिकेत १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमचे विचार स्पष्ट ठेवा आणि घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची योग्य काळजी घ्या. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या योजना आता चांगला परतावा देऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने अनेक गैरसमज दूर होतील. संध्याकाळचा वेळ मनाला शांती देणारा ठरेल. मिथुन- आजच्या दिवशी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक ताण कमी होईल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. कामाच्या निमित्ताने छोटा…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची गरज विचारात घेऊन भंडारदरा धरणातून सोमवारपासून (१४ सप्टेंबर) पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांमुळे संगमनेर तालुक्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. यंदा तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेती पिके सुकू लागली असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. तसेच गणेश विसर्जन आणि उत्सवाच्या दिवसांत पाण्याची उपलब्धता व्हावी, अशी मागणी शेतकरी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांनंतर अण्णा नुकतेच राळेगणसिद्धी येथे परतले आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात व तांबे यांनी अण्णांच्या प्रकृतीची अत्यंत आपुलकीने चौकशी करत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. शनिवारी झालेल्या या भेटीदरम्यान अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पद्मभूषण अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहेत. सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांतील त्यांचे योगदान…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील बालिका विद्यालयाजवळ, शिवसर्कल चौक येथे काढण्यात आलेल्या गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी गणेश मंडळाचे अल्पवयीन अध्यक्ष आणि ‘शिवज्ञा साऊंड सिस्टीम’चे मालक निलेश दगडू पाटील यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० ते ९:३० वाजेच्या दरम्यान टाटा एस ट्रक (क्रमांक MH 46 AF 6580) वर साऊंड सिस्टीम लावून अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जात होती. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण निर्माण झाले होते. बंदोबस्तावर तैनात असलेल्या…

Read More

प्रवीण पुरो – राज्यात आणि देशात होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये विघ्न आणणाऱ्या प्रवृत्तींना ठेचण्याचं काम ज्यांनी करायचं ते करत नाही आहेत. यामुळे चांगल्या सणांमध्ये बाधा येण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. सरकार म्हणून आपली जबाबदारी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पार पाडली असती तर अशा घटना घडल्या नसत्या. सरकारच कमजोर पडलं की कोणीही उगवतं आणि फतवे काढून मोकळा होतो. यात मग कान उपटू शकतील अशा व्यक्तींना हस्तक्षेप करावा लागतो. अनेकदा हे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार करत असतात. ते विरोधी पक्षात असल्याने त्यांच्या आव्हानांना मर्यादा पडू लागल्या आहेत. सत्ता असताना तुम्ही काय केलंत, असं वाह्यातपणे विचारणाऱ्या मंदांना तेव्हाच्या आणि आजच्या परिस्थितीची जाणीव नाही. त्याकाळी…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला संयम आणि शांती बाळगण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवू शकतो, त्यामुळे वादाचे प्रसंग टाळा. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. घरातील मोठ्या मंडळींच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. मिथुन – आजचा दिवस अत्यंत फलदायी सिद्ध…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने अध्यापनावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. सातत्याने निवेदने देऊनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज धांदरफळ खुर्द येथील सबस्टेशनवर धडक देत जोरदार आक्रोश मोर्चा काढला. महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेताला पाणी द्यावे लागत असल्याने आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सबस्टेशनवर जमलेल्या शेतकरी आणि युवकांच्या शिष्टमंडळाने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवला व थेट निवेदन सुपूर्द केले. या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे, ज्युनिअर इंजिनिअर पवार…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसेस मुंबई आणि कोकण मार्गावर वळवल्या आहेत. या धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील नियमित वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महामंडळाच्या या तुघलकी कारभारावर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, रद्द झालेल्या फेऱ्या तातडीने पूर्ववत न झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा परिवहन विभागाला दिला आहे. कोकणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेसची सोय करणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र, एका भागातील प्रवाशांची सोय करताना ग्रामीण…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘शांतता समिती बैठक’ आयोजित करण्याचा विसर प्रशासनाला पडला की बैठक जाणीवपूर्वक टाळली आहे. शांतता समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या उणिवांवर बोट ठेवून जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न, जाब विचारण्याचा संगमनेरकरांचा हक्कच प्रशासनाने हिरावून घेतल्याचा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असताना संगमनेर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतिहासात संगमनेर शहराची अतिसंवेदनशील म्हणून नोंद असल्याने कोणत्याही मोठ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मुलींचे शिक्षण ही समाजाची सर्वांत मोठी ताकद आहे. नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींना कोणत्याही सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शाळेसंदर्भात शिक्षकांनी मांडलेल्या समस्या रास्त असून, नगरपालिकेच्या आगामी बैठकीत हा विषय मांडून शाळेसाठी आवश्यक तो निधी आणि भौतिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील. शाळा प्रशासनाला जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल, तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी दिला. नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याच भावनेतून शिवसेना नगरसेविका सूर्यवंशी यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या घासबाजार येथील अहिल्यादेवी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. कोपरगाव ते शिर्डी रस्त्यावरील कोकमठाण शिवारात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास राहता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी आणि व्यावसायिक मॅकेनिक अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ जवळ एका आयशर कंपनीच्या गाडीची दुरुस्ती करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या चार वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १०५० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे, वजनकाटा आणि कत्तलखान्यातून ९ जिवंत लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सुनील पवार, विशाल तनपुरे, अजिनाथ पाखरे आणि अमीरराजा आतार यांच्या…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना वाहने तोडून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांना अटक केली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, संशयित भंगार दुकानांमधून २१ हून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ व विशेष मोहीम राबवून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. श्रीरामपूर शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री आणि तोडफोड (Scrap) केली जात असल्याचा संशय पोलिसांना होता.…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवी आव्हाने मिळतील, ज्यांचे तुम्ही यशस्वीपणे निवारण कराल. आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सलोखा टिकून राहील. आरोग्य उत्तम राहील, मात्र वाहन चालवताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ – आज आपल्याला कौटुंबिक बाबींवर थोडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या मौलिक सल्ल्याचा व्यवसायात मोठा फायदा होईल. नाहक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन व्यवस्थित करा. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक गोडवा आणि जवळीक निर्माण होईल. सायंकाळचा वेळ मानसिक शांततेसाठी अत्यंत उत्तम ठरेल. मिथुन – आजचा दिवस नवीन संधी…

Read More

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) अहिल्यानगरमध्ये एक मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किंमतीचे ७५ हजार ३५६ किलो वजनाचे संशयास्पद बटर जप्त केले आहे.  एमआयडीसी भागातील एका शीतगृहावर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास टाकलेली ही धाड शुक्रवारी सकाळी संपली. जप्त करण्यात आलेले बटर कमी दर्जाचे असल्याचा संशय असून त्यावर मुदत संपण्याच्या तारखेचा उल्लेख नसल्याने लेबल वर्णनाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पाटस (ता. दौंड) येथील ‘मधुरमा क्रिमी डिलाईट’ या कंपनीने या पाश्चराईज्ड कुकिंग (अनसोल्टेड) बटरची निर्मिती केली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवात प्रसिद्ध कलाकारांची नाटके, मनोरंजक स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता…

Read More