Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तक्रारी आणि प्रशासकीय वादाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. २५ सप्टेंबर २०२६ पासून पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होईपर्यंत जायभाये यांना रजेवर पाठविण्याचा आदेश २३ सप्टेंबर रोजी डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आला. जायभाये यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारी, मागवण्यात आलेले खुलासे आणि त्यानंतरही समाधानकारक खुलासा न आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीचा या आदेशात स्पष्ट संदर्भ आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून दररोज लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, चौकांमधील सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन, भरधाव वेगाने स्टंटबाजी करणारे तरुण, बेशिस्त रिक्षाचालक आणि फुटपाथवर झालेले प्रचंड अतिक्रमण यामुळे संगमनेरकरांची रोजची वाट बिकट झाली आहे. या रोजच्या कोंडीतून संगमनेरकरांची सुटका कधी होणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने दिल्ली नाका, अकोले नाका आणि बसस्थानक परिसरासह महत्त्वाच्या चौकांत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. मात्र, अंमलबजावणी अभावी ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अकोले नाका परिसरात घुलेवाडीकडे…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्य उत्तम राहील, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांतता बाळगण्याचा आहे. व्यवसायात घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजनानुसार काम करणे सोयीचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. संध्याकाळचा वेळ आत्मचिंतनात घालवावा. मिथुन- आज बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणाच्या जोरावर अनेक कठीण प्रसंगांवर मात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- निळवंडे धरण लाभक्षेत्राला पाण्याचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या पार्श्वभूमीवर चिंचोली गुरव व पंचक्रोशीतील उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपून त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला असल्याचे राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्च्यादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या दालनात बळजबरीने प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी विक्रम आत्माराम खांडरे (रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनियमित वीजपुरवठा, सक्तीचे भारनियमन, निळवंडे-भंडारदरा धरणातील पाण्याचा प्रश्न आणि दुष्काळी परिस्थिती यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेरात शेतकऱ्यांच्या महाआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन घेण्यासाठी येत नसल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख केंद्र असलेल्या आश्वी व परिसरात अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून उघडपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना शांतता व सुव्यवस्था राखण्याऐवजी परिसरात मटका, अवैध दारू, गुटखा विक्री आणि वाळू-मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक जोरात सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या संशयास्पद दुर्लक्षामुळे या माफियांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. परिसरातील चौकाचौकांत मटक्याचे अड्डे आणि बंदी असलेला गुटखा उघडपणे विकला जात असल्याने तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे. तसेच महसूल व पर्यावरणाची हानी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – चेक अनादर प्रकरणात संगमनेरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रसाद जोशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी संजय मालक सागर यास दोषी ठरवले आहे. न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस ॲक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपीला एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, फिर्यादी कंपनीस २ लाख रुपये नुकसान भरपाई आणि २ सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के साध्या व्याजासह रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हे प्रकरण श्री. गजानन महाराज शुगर लि. विरुद्ध संगमनेर येथील कंत्राटदार संजय मालक सागर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – मातृभाषेविषयी निष्ठा वृद्धिंगत करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि विद्यार्थी व पालकांमध्ये साहित्याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमनेरमध्ये सोमवारी (२८ सप्टेंबर) एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही एक प्रकारे नांदीच ठरणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था (शाखा संगमनेर), समर्थ युवा फाउंडेशन आणि मराठी भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक…
अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- एखाद्या थरारक सिनेमाला शोभेल असा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार संगमनेर शहरात समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात पॉलिसी वर्दीआडून झालेल्या कृत्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने मित्राच्याच विश्वासाघाताने एका निष्पाप तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा भीषण कट रचला असल्याचे समोर येत असून, याप्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कारभारावर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घडलेल्या घटनेनुसार, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी मित्रांनीच कट रचून काशिफ कुरेशी याच्या दुचाकीच्या डिकीत तब्बल ३९ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज लपवून ठेवले आणि पोलिसांना खबरीद्वारे माहिती देऊन शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून त्याला…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधींचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला आणि मेहनतीला चांगले यश मिळेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबींमध्ये अचानक फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस धीर धरणे आणि संयम बाळगण्याचा आहे. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु तुमच्या नियोजनाने सर्व कामे पूर्ण होतील. नातेसंबंधात गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या, विशेषतः जोडीदाराशी संभाषण करताना शब्दांचा वापर जपून करा. व्यापारी वर्गासाठी नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) जिल्ह्यात व्यापक मोहीम उघडली असून संगमनेर तालुक्यातील एका खाद्य आस्थापनेवर अचानक छापा टाकून २ लाख ६० हजार ८२० रुपये किंमतीचा संशयास्पद ‘काऊ घी’चा साठा जप्त केला आहे. याचबरोबर बीड जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील एका दूध संकलन केंद्राचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट अन्नपदार्थांची वाहतूक किंवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उद्या बुधवारी (२३ सप्टेंबर) आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या अंतर्गत चिंचोली गुरव येथे ४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन होणार असून यामुळे परिसरातील शेतीला सिंचनाचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच समनापूर येथील गणपती मंदिर परिसरात ९७ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या संगमनेर ते वडगाव पान फाटा आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यासह राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती, महावितरणकडून होणारा विजेचा खेळखंडोबा आणि डोळ्यांदेखत वाहून जाणारे हक्काचे पाणी या प्रश्नांवरून आज संपूर्ण संगमनेर तालुका रस्त्यावर उतरला. हजारो शेतकरी, नागरिक आणि महिलांच्या उपस्थितीत निघालेल्या अभूतपूर्व ‘जनआक्रोश मोर्चा’ने प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच हादरवून सोडले. पूर्वकल्पना देऊनही निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा मोडून काढत थेट प्रांताधिकारी कार्यालयाचे गेट ओलांडून आत प्रवेश केला. आंदोलकांनी प्रांत अधिकारी कार्यालयात घुसत प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची देखील फेकून दिली. तसेच कार्यालयात नुकसान करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी संतप्त आंदोलकांना नुकसान करण्यापासून थांबविले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सलग अठरा वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेला ‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा खरा मानबिंदू ठरला आहे. हा महोत्सव दरवर्षी यशाची नवी शिखरे सर करत आहे, त्याचे मूळ कारण संगमनेरकर कलारसिकांचा भक्कम पाठिंबा आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आहे. रसिकांच्या या प्रेमामुळे आमचा उत्साह कैक पटीने वाढला असून पुढील वर्षी आणखी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नवे बळ मिळाले आहे, असे प्रतिपादन राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष आणि फेस्टिव्हलचे प्रमुख मनीष मालपाणी यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय संगमनेर फेस्टिव्हलचा सोमवारी ‘नाना थोडं थांबा…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाच्या ठिकाणी संयमाने निर्णय घ्या. वृषभ – आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा राहील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबींमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्यासाठी वादाचे प्रसंग टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागतील. मिथुन – आजच्या दिवशी तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. नवीन लोकांशी होणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोटा परिसरामध्ये पुणे-नाशिक महामार्गाने एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH 14 CS 4602) बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोटा गावाजवळील बोगद्याच्या साईड रोडला सापळा रचून सदर कार थांबवली. गाडीची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या सीलबंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्या तालुक्याने अत्यंत कष्टातून, घामाच्या धारा गाळून आपले वैभव उभे केले, त्या समृद्ध संगमनेरला उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव रचला जात आहे. हक्काचे पाणी रोखण्यासाठी आणि पुढे पळवण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू करण्यात आला असून, या सुलतानी कारभाराविरोधात संपूर्ण संगमनेर तालुका आता रस्त्यावर उतरणार आहे. हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने वीज मिळावी या मागणीसाठी मंगळवारी (२२ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता यशोधन कार्यालयाच्या प्रांगणातून प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ धडकणार आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर उपस्थितीत हा ऐतिहासिक मोर्चा निघणार असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, काही अपरिपक्व आणि दिशाभूल करणारे सल्लागार चुकीच्या माहितीचा प्रसार करत असून, अशा प्रकारे अफवा व गैरसमज पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे, असा रोखठोक इशारा देत विकासकामे करण्याऐवजी केवळ फ्लेक्सचे राजकारण केले जात आहे. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी, विजेसाठी आणि आर्थिक समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी होते.…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत केलेले नियोजन भविष्यात मोठा फायदा मिळवून देईल. आरोग्य उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सायंकाळी एखाद्या जुन्या मित्राशी झालेली भेट मन प्रसन्न करेल. वृषभ- आज दिवसभर तुमचे मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. व्यवसायात धनलाभाची उत्तम संधी निर्माण होत आहे. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. जोडीदारासोबत घालवलेला वेळ नात्यात अधिक गोडवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी (दिनांक २० सप्टेंबर) पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे. पत्रकार अंकुश बुब यांचे ते चुलते होते. गेल्या काही दशकांपासून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून संगमनेर आणि परिसरातील विविध समस्यांवर सातत्याने प्रकाश टाकला. अभ्यासू वृत्ती, समाजकार्याची आवड आणि नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची त्यांची शैली यामुळे पत्रकारिता क्षेत्रात ते परिचित होते. त्यांच्या निधनाने एका मार्गदर्शक आणि अभ्यासू पत्रकाराला समाज मुकला आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (२१ सप्टेंबर) २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघून…
