Author: Annant Ppangarkar
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांच्या कारवाया सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री देखील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उपअधीक्षक वाघचौरे यांना शहरातील जुना जोर्वे रोड लगत असलेल्या मदिना नगर मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या (MH17 BD4182) बोलेरोमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या…
मौलानासोबत मुलीचा विवाह करून देण्यास पित्याने दिला होता नकार साथीदारांच्या मदतीने खून करत मौलानाने घेतला बदला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदल्या गेलेल्या प्रकरणाची महिनाभरात पोलिसांनी केली उकल सोमवार, दि. २७ मे गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात असलेल्या जंगलामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा मृत्यू अकस्मात नसून संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानासह त्याला मदत करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचा मुलगा जुनेद आहातेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याप्रकरणी मौलाना…
सोमवार, दि. २७ मे नासिक पुणे महामार्ग लगत भर वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली. राजू कचरू मिसाळ (वय ४७, रा. गल्ली क्रमांक १५, गणेशनगर, संगमनेर), नितीन सुंदरलाल ठाणेकर ( वय ४५, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), राजेंद्र जिजाबा फटांगरे (वय ४७, रा. गल्ली क्रमांक ३, जनतानगर, संगमनेर) व नीलेश चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा. डेरे शाळेच्या पाठीमागे, रहाणे मळा, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चौघा जणांकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा…
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमध्ये कंटेनर चालकाने कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेरनजीक बुलेटस्वारांना दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक कंटेनर घेऊन फरार झाला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३ वर्ष) व गोरख सयाजी पर्वत (वय ४० वर्ष, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतक त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवरून (एम. एच. १४ एच. टी. ५००६) कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात असताना लोणी रस्त्यावर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातातील…
सोमवार, दि. २७ मे व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे.…
रविवार, दि. २५ मे अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि एसटी बसचा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोंची शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने येथील कुटे रुग्णालयाची रुग्णवाहिका (विंगर एम.एच. – १७ ए-जी ८००२) घटनास्थळी जखमींना आणण्याकरिता गेली होती. अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असताना या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बसचा (एम. एच. १४ बी.टी. ३८०३) कोकणगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमीत रुग्णवाहिकेच्या चालकाचाही समावेश आहे.…
संडे स्पेशल फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही…
रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…
संडे स्पेशल! पुण्यात झालेल्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये एका बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेत दीड ते दोन कोटी रुपयांच्या अतिशय महागड्या परदेशी बनावटीच्या कारने दोघांना चिरडले. त्यांचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अंत झाला. घटनेतील दोषीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोप असलेल्या बालगुन्हेगाराला (विधी संघर्षित बालक) ताब्यात घेऊन पोलिसांनी जुव्हेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर केले. त्याला बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ जामीन पुढील अटीवर दिला, अट ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, १५ दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची शिक्षा देऊन जामिनावर मोकळे केले. आरोपीला पोलिसांनी तसेच स्थानिक आमदारांनी मदत केली, असे आरोप करण्यात आले. ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली, अशा प्रवृत्तीला ताब्यात घेतल्यावर…
ईडीच्या अधिकार्यांनी देशभर मांडलेल्या उच्छादाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने चांगलंच उताणं पाडलंय. सत्ताधार्यांची मर्जी राखण्यासाठी लोकशाहीची उघड थट्टा उडवणार्या या विभागातल्या अधिकार्यांना आणि सत्तेसाठी निरपराधांवर खोटे गुन्हे लादणार्या सत्ताधार्यांच्या मस्तीला जमिनीवर आणणार्या सर्वोच्च न्यायालयाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. असे निवाडे देताना संबंधितांच्या कृतीची चिकित्सा करण्याचं फर्मान न्यायालय काढतं. मात्र यावेळी ते निघाले नाहीत. ते निघाले असते तर गब्बर झालेल्या ईडी अधिकार्यांच्या लुटीचे सारे फेरे बाहेर आले असते. या विभागात आल्यापासून कोण किती श्रीमंत झाला ते जगापुढे आलं असतं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला धरून आला असल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्यांनी किती कमाई केली, याचा लेखाजोखा बाहेर आणला…
शनिवार, दि. २५ मे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री यश आले असून उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पथकाने पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे. ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय २८ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), डेग विठ्ठल भोसले (वय २९ वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय ३३ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), व नागेश रेजा काळे (वय २५ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता.…
१० हजार रुपयांची लाच भोवली; न्यायालयाने लाचखोर महिला अधिकाऱ्याला दिली ५ वर्षाची शिक्षा आणि केला दंड!
शनिवार, दि. २५ मे पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची घेणाऱ्या ग्रामसेवक महिलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. लाचेचे हे प्रकरण २०१७ मध्ये बारामतीच्या पंचायत समिती कार्यालयात घडले होते. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर करून देण्यासाठी सोनवडी-सुपेच्या (बारामती जि. पुणे) लोकसेवक ग्रामसेविका श्रीमती दिपाली जगन्नाथ कुतवळ (वय ३७ वर्ष) यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. लाच लुचपतच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी तपास करत बारामती न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. बारामतीच्या…
शनिवार, दि. २५ मे नगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी बडी मज्जित मुकुंद नगर परिसरात एक संशयित आल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताला पकडण्यासाठी या परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह अलगद अडकले. त्यांच्या चौकशीत त्यांनी नगरच्या सावेडी, तारकपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४) व जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय २१, दोघे रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जि. सोलापुर मुळ रा. कासीम बऱ्ही दर्गा, पढेगांव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख…
शुक्रवार, दि. २४ मे बुधवार-गुरुवारी दोन दिवसात अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्यांची संख्या सहावर गेली असताना संगमनेरमध्ये प्रवरा नदीपात्रात दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. प्रवरा नदीचे या वेळचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदीपात्रात आंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यामुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नदीपात्रात वाळू तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीव घेणे ठरत आहे. वाळू तस्करी थांबविण्यात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत कोणालाही यश आले नसल्याने तालुक्यातील सर्वच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे. सुगावमधील शोध कार्य…
शुक्रवार, दि. २४ मे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आता या घोटाळ्याच्या अनुषंगाने काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. दूधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख आरोपी असलेला कुटे पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व…
शुक्रवार, दि. २४ मे लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आणि नंतर पुढे ढकलण्यात आलेल्या दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून आता या निवडणुका २६ जूनला होणार आहे तर १ जुलैला मतमोजणी होईल. विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदारांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. यापूर्वी या जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती मात्र शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीचे कारण देत तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. असा आहे…
गुरुवार, दि. २३ मे अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ…
गुरुवार, दि. २३ मे पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मधील अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीनावर सोडल्यानंतर त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. बड्या बापाच्या या दिवट्याने आता रॅप सॉंग तयार करत लोकांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने किमती कार चालवत दोन जणांचा बळी घेणाऱ्या या दिवट्याविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच त्याच्या या कृत्यामुळे आता त्याला नेमके कोणाचे आशीर्वाद आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक दिन मे मुझे मिल गयी बेल… फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, पुण्यातील बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप साँग ऐका…. (महाराष्ट्र संवाद न्यूज या…
गुरुवार, दि. २३ मे संगमनेरमधील पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल ८१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला प्रतिष्ठित राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य व दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून गेल्या नऊ महिन्यांपासून कुटे फरार होता. कुटे गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आले होते. कुटे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संगमनेरमधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती समजते.…
गुरुवार, दि. २३ मे इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा, उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याने पाच जणांचे मृतदेह हाती आल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघा तरुणांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट बुडून पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडालेल्यापैकी एका तरुणासह तिघा जवानांचे मृतदेह हाती लागले आहे. तर अद्यापही दोघे सापडले नसून दोघांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. अशी आहे घटना … सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास…
