Author: Annant Ppangarkar

गुरुवार, २० जून  दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

Read More

गुरुवार, २० जून मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- २०२४ या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली असून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरतीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी…

Read More

गुरुवार, दि. २० जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष उद्या शुक्रवारी (२१ जून) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.…

Read More

गुरुवार, २० जून बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. आरक्षणाची व्याप्ती ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांसाठी राज्य सरकारच्या ६५ टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. राज्य सरकारने आणलेला कायदा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्ते गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर ११ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला होता, त्यावर पाटणा उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला.

Read More

गुरुवार, २० जून  लोकसभा निवडणुकीनंतर १२ जुलैला राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वीच ठाकरे गटाने ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासाठी ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशा परिस्थितीत आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आलेला नसताना या निवडणुका घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.…

Read More

गुरुवार, २० जून भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तलाठी महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ओढून नेल्याची घटना संगमनेर मध्ये समनापुर गावच्या शिवारात घडली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात चंदनापुरी (संगमनेर) येथे कार्यरत असलेल्या तलाठी भारती अशोक भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (१८ जून) सायंकाळी स्टाफच्या मैत्रिणी समवेत संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे जात होत्या. यावेळी त्या त्यांच्या दुचाकी वर एकटाच असताना कोल्हार-घोटी मार्गावर समनापुर गावचे हद्दीत किसान ट्रॅक्टरच्या समोरून जात असताना पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्ती पैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून तोडून घेऊन भरधाव…

Read More

गुरुवार, २० जून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून यांचा २९ हजार ३१७ मतांनी पराभूत झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विखे पाटील यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)आणि वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल युनिटची (VVPAT) चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला एकूण १० अर्ज मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांनी…

Read More

बुधवार, १९ जून  दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याने गावकऱ्यांनी वाढविलेल्या दबावानंतर या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. आई आणि तिच्या प्रियकराने हे खून केल्याचे निष्पन्न झाले. या भावंडांचा खून आई कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाची गाडे यांनी केला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे याला अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली. १७ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय…

Read More

बुधवार, १९ जून  महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर संस्थेच्या नाशिक येथे झालेल्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलपदी संगमनेर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश विश्वनाथ कलंत्री व उद्योजक निलेश चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद प्रगती पॅनलने ९० पैकी ८५ जागांवर विजय मिळवला असून ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रकाश कलंत्री यांनी यापूर्वी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश कलंत्री व निलेश चव्हान यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शीबोलताना सांगितले.…

Read More

बुधवार, १९ जून  न्यायालयीन कामकाजा दरम्यान ओळख निर्माण करत वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वृद्ध समाजसेविकेची जमिनीच्या व्यवहारात दोन कोटीची फसवणूक करत दहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात एका वकिलासह सहा जणांवर भादवि ४०६, ४२०, ३८५, ३८६, ३८७, ५०६, १२० (बी) ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. ५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरूणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या…

Read More

बुधवार, १९ जून संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या एका न्यायालयीन खटल्यात न्यायाधीशांनी माजी उपनगराध्यक्षासह आठ सामाजिक कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ९ वर्ष ४ महिने हा खटला न्यायालयात सुरू होता. प्रवीण गंगाधर मंडलिक, कल्पेश सोमनाथ पोगुल, सोमनाथ सुरेश गायकवाड, नरेंद्र रामेश्वर ओझा, लखन दीपक जेधे, सुदर्शन दत्तू इटप, राहुल शशिकांत नेहूलकर व शैलेश राजगोपाल कलंत्री या आठ जणांचा निर्दोष सुटलेल्यात समावेश आहे. ९ जानेवारी २०१४ रोजी संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना जय जवान चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास १०-१२ जणांच्या घोळक्याने अडवत दुचाकीवर पेट्रोल टाकत, दुचाकीवरील दोघांना खाली खेचत हॉकी स्टिक, लोखंडी गज व…

Read More

बुधवार, १९ जून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात महायुतीचा उमेदवार असताना देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार नरहरी झिरवाळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. झिरवाळ यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहे. नरहरी झिरवाळ महायुतीचे आमदार आहेत. तर संदीप गुळवे ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आहेत. झिरवाळ यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी झिरवाळ यांची भेट घेतली होती. त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा दिला आहे. झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळंवेगळं रिटर्न गिफ्ट मिळाल्यामुळे गुळवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. झिरवाळ यांनी आपल्या सर्व…

Read More

बुधवार, १९ जून छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ उलटला. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम दिला. बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बोलत होते. लोकसभेसाठी नाशिकमधून व त्या पाठोपाठ राज्यसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले…

Read More

बुधवार, १९ जून  नगर जिल्ह्यात कॅफेंचे पेव फुटले आहे. या कॅफे हाऊसमध्ये जोडप्यांना अश्लील जाळे करण्यासाठी प्रायव्हसी मिळत असल्याने हे कॅफे अश्लील चाळ्यांच्या उद्योगाचे केंद्र बनले आहे. नगर पोलिसांनी उपनगरातील दोन केंद्रांवर छापे टाकत कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सोमवारी सावेडी उपनगरातील डौले रुग्णालयाजवळील स्टेला कॅफेवर टाकलेल्या छाप्यात कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. तसेच तेथे अश्लील चाळे करताना काही मुला-मुलींना पकडण्यात…

Read More

मंगळवार, १८ जून २०२४ मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात ‘श्रीकृष्णाची’ भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अमृत उद्योग समूहाच्यावतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, प्रभावतीताई घोगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.…

Read More

मंगळवार, १८ जून २०२४ जिल्हयात दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात १०४ एकर क्षेत्रावर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यात आली होती. ज्या पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची आवश्यकता आहे, त्यांनी विद्यापीठातून चारा घेऊन जाण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. विद्यापीठात लागवड करण्यात आलेला हिरवा चारा सद्यस्थितीत कापणीच्या अवस्थेमध्ये आहे. ज्या पशुपालकांना चाऱ्याची आवश्यकता असेल अशा पशुपालकांनी प्रमुख शास्‍त्रज्ञ (बियाणे), बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संपर्क साधावा. पशुपालकांनी हिरव्या चाऱ्याची स्वत: कापणी करुन व प्रती टन १ हजार २०० रुपये रक्कम विद्यापीठाकडे जमा करुन चारा घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Read More

मंगळवार, १८ जून २०२४ प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणात समोर आलेल्या नव्या खुलासामुळे खळबळ उडाली आहे. रेवन्ना याची आई भवानी रेवन्ना देखील त्याच्या पापात सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कर्नाटकात लैंगिक प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेवन्ना भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जेडीएस पक्षाने निलंबनाची कारवाई केली. पण त्याने काही दिवसांनी भारतात येत सरेंडर केले. आता या प्रकरणी समोर आलेल्या नव्या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण प्रज्वल रेवण्णा हा ज्या कोणा महिलेवर अत्याचार करत होता, त्यामधील जी कोणी महिला रेवण्णा विरोधात तक्रार करण्यास जात असायची, अशा महिलांचे प्रज्वल रेवण्णाची आई भवानी रेवण्णा ही अपहरण करत होती, अशी माहिती…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याकारणाने या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या निवडणुकीची चुरस रंगणार आहे. या ११ जणांमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचाही समावेश आहे. विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. विधानसभेतून निवडून द्यायच्या या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान…

Read More

मंगळवार, १८ जून २०२४ राज्यभरातून २८ विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये १५० पैकी १३६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या साई घुगे याचादेखील यात समावेश आहे. एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा (बीटीएस) २०२४ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय असणारी ही परीक्षा राज्यात सुमारे २५० पेक्षा अधिक केंद्रांवर घेण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवीचे २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. साई सध्या नामांकित अशा सातारा सैनिक स्कूल येथे शिक्षण घेत असून त्याने आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक, मंथन, नवोदय तसेच बऱ्याच स्पर्धा…

Read More

तरुणांच्या भवितव्याशी सरकारचा पुन्हा खेळ; पोलीस भरतीची शारिरीक परिक्षा पावसाळ्यात घेऊ नका, सरकारने फेरविचार करावा. बोगस बियाणे व खतांचा राज्यात सुळसुळात, शेतकऱ्यांची फसवणूक व लूट, पण सरकारकडून मात्र दुर्लक्ष. काँग्रेसच्या यशामुळे घाबरलेल्या विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न मंगळवार, दि. १८ जून राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ॲड. उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा…

Read More