Author: Annant Ppangarkar

प्रवीण पूरो / मुंबई विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि नंतर विधानभवन येथे सत्कार केला. राज्य सरकारच्यावतीने भारतीय टीमला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तब्बल ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज…

Read More

शनिवार ६ जुलै  खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरण्यांची कामे पूर्णत्वास जात आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असून खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपन्या आणि विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधे घेण्याची शक्ती शेतकऱ्यांना करत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राजस्व सभागृहामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खत विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे,…

Read More

प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन शुक्रवार ५ जुलै थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ शनिवारी ६ जुलैपासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ…

Read More

गुरुवार, ५ जून  संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून सुविधा निर्माण करून दिली असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. इंद्रजीत थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सहा वर्षाच्या कृषीमंत्री पदाच्या काळात अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या असून याच कालावधीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक शेती उत्पन्न करणारे राज्य ठरले होते. कृषी विद्यापीठ बांधावर, महापीक अभियान, मागेल त्याला शेततळे, शिवार फेरी असे अनेक उपक्रम आमदार थोरात यांच्या कार्यकाळात राबवले गेले. शेती संबंधीच्या…

Read More

शुक्रवार, ५ जुलै  कर्जाच्या हप्त्यापोटी बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून धनादेशाची रक्कम स्वतःच्या खात्यावर गोठवून घेतल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून सोबत बावीस हजार रुपयांचा दंडही सुनावला. अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली. याबाबत अधिक माहिती अशी, राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या पंचवटी शाखेचे ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते.…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी  विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दूध भावाच्या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ असा हरीनाम गजर करत महायुतीच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शन करताना पाहायला मिळाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. “दूध भुकटी…

Read More

गुरुवार ४ जुलै  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मोरे यांनी आंबेडकरांचीही साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरे गटाकडून मोरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. https://x.com/vasantmore88/status/1808791238285668776?s=19 पुण्याच्या मोरे यांनी इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले आता तेथून खाली उतरत मशाल हाती घेण्याचा नवा राजकीय निर्णय मोरे यांनी घेतला आहे. राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली.…

Read More

गुरुवार ४ जुलै संगमनेरमधील प्रख्यात उद्योजक राजेश मालपाणी असल्याचे भासत फोनवरून अज्ञात आरोपीने तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नव्याने बदललेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारासंदर्भात राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी साडेनऊ वाजता मालपाणी हाऊस मध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एका मोबाईल क्रमांकावरून दुबे यांना फोन करत फोनवर राजेश मालपाणी असल्याचे भासवत तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगितले.…

Read More

गुरुवार ४ जुलै  काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नागपूर सहकारी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांच्या शिक्षेला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे केदार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्यात सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही…

Read More

गुरुवार ४ जुलै  गेल्या पावसाळी अधिवेशनात नासिक मुंबई मार्गाच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ३१ मार्चपूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ३१ मार्च उलटून गेल्यानंतर देखील या मार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक भीषण झाल्याचे वास्तव थोरात यांनी आज पुन्हा सभागृहात मांडल्याने सरकारचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून आले. थोरात यांनी गुरुवारी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय पुन्हा एकदा सभागृहासमोर मांडला. यासाठी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा देखील दाखला दिला. ते म्हणाले, पूर्वी या रस्त्याने मुंबईला येण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी…

Read More

गुरुवार, ४ जुलै  राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (६ जुलै) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली. बैठकीमध्ये ८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) मार्चअखेर खर्चास मान्यता, सन २०२४-२५ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) व जुनअखेरच्या खर्चाचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

Read More

गुरुवार, ४ जुलै भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती…

Read More

योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत बुधवार, ०३ जुलै  ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील…

Read More

सध्याच्या जागेवर होणार शहीद स्मारक बुधवार, ३ जुलै  गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ठरलेला आणि संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानकासमोर उभारणीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. राज्यात हायटेक ठरलेल्या बस स्थानकासमोर निर्माण होणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे, असे देखील तांबे म्हणाले. तांबे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा संगमनेरमधील बस स्थानकासमोर व्हावा ही तमाम संगमनेरकरांची मागणी होती. यानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सातत्याने…

Read More

बुधवार, ३ जुलै  अनेकदा संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केल्यानंतर भेसळखोरीचा आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीला त्यांची संघटना तत्परतेने धावली आहे. आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या खुलाश्या अगोदरच संघटना व्यापाऱ्यांना ‘क्लीन’ सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली. याशिवाय असोसिएशनने माध्यमांवर देखील या तेल व्यापाऱ्यांचा अपप्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांच्या खाद्य तेलाची पुण्यातील एका नामांकित लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर खाद्यतेलात भेसळ असल्याचे…

Read More

मंगळवार, २ जुलै अंबादास दानवे यांच्या निलंबनावरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. उपसभापतींनी घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आणि मनमानी असून विरोधी पक्ष नेत्यांना एका कटाचा भाग म्हणून निलंबित करण्यात आल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सोमवारी गदारोळ झाला. अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवे यांनी माफी मागावी, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी लाड यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी देखील दानवे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर उपसभापती नीलम…

Read More

मंगळवार, २ जुलै | अनंत पांगारकर संगमनेरमधील तीन खाद्यतेल कंपन्यातील खाद्यतेल भेसळीचे प्रकरण समोर आले असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये किराणा दुकानांवर छापेमारी करत खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मधील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच घुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपी मधून या तेल विक्रेत्यांकडून विक्रीसाठी बाजारात आलेल्या तेलाच्या नमुन्याची तपासणी सुरू केली असून उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा यांच्याकडून निर्मिती केल्या जात असलेल्या…

Read More

मंगळवार, २ जुलै  पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये दानवे यांनी लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली, असा आरोप भारतीय जनता पार्टीने करत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. भाजपकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर…

Read More

मंगळवार, २ जुलै राज्यातील महिलांना दिलासा देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने “मुख्यमंत्री –  बहिण माझी लाडकी”योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सतराशे साठ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर ही योजना नाही ना? असा प्रश्न संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे. राज्यभरातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी, तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार १८…

Read More

शनिवार २९ जून नगर जिल्ह्यातील पोलीस, पोलिसांची पथके यांच्या सततच्या हप्तेखोरीमुळे संगमनेर शहरातले आणि तालुक्यातले मटका अड्डे बंद करण्यात आले असल्याची राळ उठवत छुप्या पद्धतीने आणि मोबाईल ॲपद्वारे साधारण महिनाभर मटका सुरू ठेवल्यानंतर शनिवारपासून नव्या जोमाने धुमधडाक्यात संगमनेर शहर आणि तालुक्यात मटक्याच्या पेढ्या आणि अड्डे सुरू झाले आहेत. पोलीस आणि संगमनेरातल्या मटका किंगमध्ये पुन्हा जुळवाजुळव झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साधारण महिना भरापूर्वी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आणि एक नंबरचा अवैध धंदा असणाऱ्या काही मटका चालकांकडून पोलीस आणि पोलीस पथकांच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती. मटका बंद…

Read More