Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नाशिक एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सुविधा, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. राज्य शासनाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले. बैठकीनंतर त्यांनी नाशिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डोंगराच्या कुशीत वेल्हाळे परिसरातील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय प्रांगणात नवनिर्मित आंतरराष्ट्रीय आकाराच्या ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदाना’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रियता असलेला फुटबॉल खेळ संगमनेरच्या मातीत रुजावा आणि येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली. या मैदानावर आता प्रत्येक रविवारी ‘संगमनेर संडे लीग’ अंतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी खेळाडूंना मेडल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्रात माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती मागवणे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महाग झाले आहे. राज्य शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवे नियम १२ जून २०२६ पासून संपूर्ण राज्यात लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार अर्ज प्रक्रियेपासून ते कागदपत्रांच्या प्रती मिळविण्यापर्यंतच्या सर्वच शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून, अर्जदारांना आता खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार माहिती मिळवण्यासाठी केला जाणारा पहिला अधिकृत अर्ज आता १० रुपयांऐवजी ३० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून करावा लागणार आहे. याशिवाय, आतापर्यंत माहिती मागण्याचे कारण देणे बंधनकारक नसताना, नव्या नियमात अर्जदाराने माहिती मागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या परिश्रमांचे योग्य फळ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. किरकोळ कारणांमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या आणि वडिलांच्या सल्ल्याचा मान ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास घडून येण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यावसायिक प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण आगामी काळात कठोर परिश्रमांची आवश्यकता भासणार आहे. मिथुन: आर्थिक आघाडीवर आज नशीब तुमची पूर्ण साथ देईल.…
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या सहा खासदारांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश करून जनतेचा आणि महाविकास आघाडीचा घोर विश्वासघात केला आहे. या राजकीय पक्षांतराच्या आणि संधीसाधूपणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) राज्यभरात तीव्र निदर्शने करणार असल्याची घोषणा पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. माकपच्या सर्व शाखा जनतेला सोबत घेऊन राज्यभर निदर्शने करतील आणि गद्दारांचे पुतळे जाळून या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतील. या सहाही खासदारांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर माकप आणि डाव्या जनसंघटनांनी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात जीवाची बाजी लावून या खासदारांना निवडून आणले होते. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, आमदारांचे…
शिवसेनेच्या उरल्यासुरल्या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या गटाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरता काळीमा फासला आहे. ५० कोटी रोख आणि मतदारसंघात काम करण्यासाठी १०० कोटी अशी ऑफर देऊन सहा खासदारांना शिवसेनेतून फोडण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. अशा मोहिमा राबवण्यामागची सत्ताधारी कुठला थर गाठू शकतात, याचं उत्तम उदाहरण सध्या सुरू असलेल्या मोहिमेने घालून दिलं आहे. हे सारं शिवसेनेसारख्या एका कडवट पक्षात होत आहे, हे त्यातच अजब म्हटलं पाहिजे. जशास तसं उत्तर जोवर दिलं जात नाही, तोवर हे असंच घडत राहणार, असं उगाच म्हटलं जात नाही. पहिल्या फुटीची सेना नेतृत्वाने अपेक्षित दखल न घेतल्याने मोहिमा राबवणारे माजोर झालेच, पण फुटणारेही…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला राहील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गती पकडतील आणि ती पूर्णत्वास जातील. आर्थिक लाभाची दाट शक्यता निर्माण होत असून रखडलेले पैसे परत मिळू शकतात. संततीच्या प्रकृतीची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल आणि कामाच्या ठिकाणी आपल्या गुप्त गोष्टी इतरांसमोर बोलणे टाळावे. वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन कामाची सुरुवात करताना त्याबाबतची संपूर्ण माहिती व्यवस्थित गोळा करूनच पुढील पाऊल टाकावे. बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नाहक गैरसमज निर्माण होऊ शकतात. पालकांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असल्याने संयम राखावा. मिथुन: जुन्या मित्रांच्या अनपेक्षित भेटीमुळे आजचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राहाता पोलिसांनी विवाह जुळवण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक व खंडणी मागणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून एका तरुण शेतकऱ्याला डांबून ठेवून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे विवाह जुळवणाऱ्या अशा बोगस टोळ्यांचे मोठे रॅकेट समोर आले असल्याची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका ३० वर्षीय शेतकरी तरुणाला विवाहासाठी मुलगी हवी होती. मध्यस्थांमार्फत त्याचा संपर्क पुणे येथील रेश्मा केशव काटे नावाच्या महिलेशी झाला. रेश्मा हिने त्याला राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी कमालीचा उत्साह आणि आनंद घेऊन येणारा ठरेल. व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक लाभाचे प्रमाण अतिशय समाधानकारक राहील. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी काही जुने सहकारी थोडे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण आपल्या समंजसपणाने त्यावर मात कराल. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीमुळे मन थोडे भावूक होऊ शकते. वृषभ: आज समाजात आणि जवळच्या नातेसंबंधांमध्ये आपली प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने मान-सन्मान मिळेल. जुन्या विरोधकांवर किंवा स्पर्धकांवर मात करण्यात आपल्याला यश येईल, मात्र आपल्या अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील गोष्टी इतरांशी शेअर करणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाशी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. याचा निषेध नोंदविणाऱ्या ठाकरेंच्या शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे इतर आंदोलकांना सवलत आणि काहींवर गुन्हा, या प्रकाराबद्दल शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर येथील बसस्थानकासमोरील जुना पुणे-नाशिक महामार्गावर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर रस्ता रोको, आंदोलन केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विधानांचा आणि प्रतिमेचे विटंबन केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ७…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना नफा-तोट्याच्या पुढचे सामाजिक आणि आर्थिक गणित समजत नसल्याचा थेट आरोप करत नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेण्याच्या केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा गळा घोटणारा असल्याचा संताप व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी अत्यंत तीव्र शब्दांत घणाघाती टीका केली आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी पसरली असून, याविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, हा निर्णय एका सरळ आणि सोप्या प्रकल्पाला जाणीवपूर्वक गुंतागुंतीचे करण्याचे उत्तम…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सुकेवाडी रोड येथे अनिकेत अशोक इथापे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता आणि प्रशासनाने नोटीस बजावूनही बेकायदेशीरपणे पाच मजली (जी प्लस फोर) इमारतीचे बांधकाम केले आहे. या धोकादायक अवैध बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणी इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना दोन पत्रे देऊन दोन आठवडे उलटले आहेत, तरीही अद्याप संगमनेर शहर पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. नगरपालिका प्रशासनाने संगमनेर शहर पोलिसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, अनिकेत अशोक इथापे यांनी सर्वे नंबर १५३/१/१ येथील जागेवर कोणत्याही…
आजचे राशिभविष्य मेष: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन आणि उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळेल, त्यामुळे केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहारात मात्र थोडा संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील सदस्यांशी सुसंवाद वाढेल आणि वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे आज थोडे अधिक लक्ष देणे फायदेशीर ठरेल. वृषभ: तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नको असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आर्थिक हिताचे राहील. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे मानसिक प्रसन्नता टिकून राहील. मिथुन: व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचे आणि सकारात्मक बदलांचे संकेत मिळत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राहाता: शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर आणि बांधकामावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली असून, यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राहता येथील एका कार्यक्रमात माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मतदारसंघात महिलांची छेड काढणाऱ्यांच्या घरावर थेट जेसीबी चालवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. गुरुवारी झालेल्या या धडक कारवाईमुळे विखे पाटील यांनी आपला शब्द कृतीत आणल्याची जोरदार चर्चा…
विशेष प्रतिनिधी / मुंबई शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यासाठी सत्ताधारी आघाडीने आखलेली ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम म्हणजे राज्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचा संताप राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर शिवसेनेत फूट पडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा तीच गोष्ट शिवसेनेसोबत होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेली ही अधोगती म्हणजे एक काळा इतिहास ठरेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “लोटस, टायगर, लायन… मला त्या जनावरांची नावे माहिती नाहीत; पण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत.…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस घरातील कामांच्या व्यापात आणि धावपळीत व्यतीत होईल. अनेक कामे एकाच वेळी समोर आल्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो, म्हणूनच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे हिताचे ठरेल. मुलांकडून एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक थकवा जाणवण्याची शक्यता असल्याने विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज आळस झटकून पूर्ण उत्साहाने काम करण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या वाढल्यामुळे सुरुवातीला काहीशी चिंता वाटेल, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि तुमची जिद्द व चिकाटी वाढीस लागेल. बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा कुटुंबात विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा पक्ष बदल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्या आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांविरोधात भविष्यातही यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी व शहर प्रमुख अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी साडेचार वाजता शिवसैनिकांनी एकत्र येत खासदार वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी खासदार वाकचौरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी…
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी गद्दारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अखेर दिल्लीत लोटांगण घातले आहे. यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश असून, त्यांनी आपल्या दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या फुटीर खासदारांनी काल रात्रीपासूनच दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा अध्यक्षांनी या गटाला तात्काळ मंजुरी दिली असून, आता हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. काल रात्रीपासूनच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. संघटनेत संगमनेरमधून दोघांची वर्णी लागली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निकालांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तिन्ही नेत्यांची निवड बिनविरोध झाली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे – अध्यक्ष: सांगली जिल्ह्यातील रवींद्र परिसा माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष: मुंबईतून करुणाकर शेखर शेट्टी हे या…
