Author: Annant Ppangarkar
गुरुवार, दि. २३ मे अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ…
गुरुवार, दि. २३ मे पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मधील अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीनावर सोडल्यानंतर त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. बड्या बापाच्या या दिवट्याने आता रॅप सॉंग तयार करत लोकांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने किमती कार चालवत दोन जणांचा बळी घेणाऱ्या या दिवट्याविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच त्याच्या या कृत्यामुळे आता त्याला नेमके कोणाचे आशीर्वाद आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक दिन मे मुझे मिल गयी बेल… फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, पुण्यातील बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप साँग ऐका…. (महाराष्ट्र संवाद न्यूज या…
गुरुवार, दि. २३ मे संगमनेरमधील पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल ८१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला प्रतिष्ठित राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य व दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून गेल्या नऊ महिन्यांपासून कुटे फरार होता. कुटे गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आले होते. कुटे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संगमनेरमधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती समजते.…
गुरुवार, दि. २३ मे इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा, उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याने पाच जणांचे मृतदेह हाती आल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघा तरुणांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट बुडून पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडालेल्यापैकी एका तरुणासह तिघा जवानांचे मृतदेह हाती लागले आहे. तर अद्यापही दोघे सापडले नसून दोघांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. अशी आहे घटना … सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास…
गुरुवार, दि. २३ मे दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कर्जदार आरोपी अमित वल्लभराय पंडितला औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्यायाधीश संजय देशमुख यांनी बुधवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून अटकेत असलेल्या पंडितचा कोठडीतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. या अटींवर जामीन मंजूर… १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी जामीन. आरोपी पंडित याला जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहेत. पासपोर्ट जमा करावा लागेल. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. जामिनावर सुटताच ईमेल आयडी…
बुधवार, दि. २२ मे वाळू तस्करांकडून श्रीरामपूरमध्ये पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांना महांकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधिक्षक बेनीवाल यांनी सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी…
मंगळवार, दि. २१ मे रिक्षातून फिरण्यासाठी धरणावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश असून हे सर्वजण नाशिकच्या नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील रहिवाशी आहेत. इगतपुरीच्या भावली धरणात मंगळवारी सायंकाळी या सर्वांचा बुडून मृत्यू झाला. समजलेल्या माहितीनुसार अनस खान दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (वय १५), मीजबाह दिलदार खान (वय १६), हनीफ अहमद शेख (वय २४), ईकरा दिलदार खान (वय १४) अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून…
मंगळवार, दि. २१ मे लोकसभा निवडणुकीच वारं शिर्डी लोकसभा मतदारसंघात थंडावलं असलं तरी समाज माध्यमात मात्र अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रात छेडछाड करून ते छायाचित्र समाज माध्यमात आक्षेपार्ह मेसेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून मंगळवारी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी असलेल्या दीपक भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. संगमनेर शहर पोलीस समाज माध्यमातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्राथमिक उपाययोजना करताना पोलिसांनी संबंधित व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला नोटीस बजावली असल्याची माहिती मिळते. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील सोशल…
मंगळवार, दि. २१ मे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये हजर राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स काढले आहे. यामुळे राहुल गांधी यांना रांचीच्या न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. काय आहे प्रकरण… कोणताही खुनी व्यक्ती काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. काँग्रेसवाले अशा व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये झालेल्या दिल्लीतील अधिवेशनात म्हटले होते. गांधी यांच्या या वक्तव्याला अपमानास्पद ठरवत भारतीय जनता पक्षाचे नेते नवीन झा यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात रांचीच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात…
मंगळवार, दि. २१ मे संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाखाचा न वटणारा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने काढलेल्या या आदेशामुळे नाहटा यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. नहाटा यांनी संगमनेरमधील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाने, सुरेश संपतराव सावरे व भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे या चौघा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा चौघांचा एकत्रित स्टेट बँक ऑफ इंडियाचा (शाखा लोणी व्यंकनाथ) ६० लाखाचा धनादेश दीपक काशिनाथ जाधव यांच्या नावाने…
मंगळवार, दि. २१ मे अकोले तालुक्याला मानवतावादी, उदात्त विचारांचा राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक वैभवशाली वारसा लाभला असला तरी सध्या राजकारणाचा घसरलेला स्तर खूपच चिंताजनक असून यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यात तातडीने सुधारणा होऊन सामाजिक सौहार्द टिकवून एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आणि त्याची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सौहार्द, एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटल्याचे सकारात्मक आणि आशादायी चित्र बघायला मिळाले. यांची उपस्थिती… अकोले तालुक्यातील सामाजिक सौहार्द आणि राजकारणाचा घसरलेला स्तर याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते.…
सोमवार, दि. २० मे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने विना अन्न पाण्यावाचून एका पीकअपमध्ये नेल्या जात असलेल्या १८ गोवंश जनावरांची संगमनेर पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी जिवंत जनावरांसह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एका पीकअपमध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे आणली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने यासंदर्भात आपल्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. घटनास्थळी गेलेल्या पोलीस पथकाने संशयित पीकअप (एम. एच. १२…
सोमवार, दि. २० मे पुण्याच्या वानवडीतील महंमदवाडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात शिरूर दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या सात दरोडेखोरांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या पोलीस शाखेने वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. काही तासांच्या आतच या टोळीकडून पोलिसांनी ६०१ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी, ६ मोबाईल असा सुमारे ५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरोडेखोरांच्या टोळीने शनिवारी महंमदवाडी रस्त्यावरील बीजीएस ज्वेलर्स येथे खरेदीच्या बहाण्याने चेहऱ्याला मास्क लावून सराफी पेढीत जात मालक आणि कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हे…
सोमवार, दि. २० मे देशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ झाला आहे. राज्यातील १३ जागांसह एकूण ४९ जागांवर आज मतदान होत आहे. आतापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. आजच्या मतदानानंतर राज्यातील सर्व जागांवरील मतदान झाल्याने मतदान प्रक्रिया संपणार आहे. शेवटचे दोन टप्पे उरले असून ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर देशात कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल. या राज्यात आज मतदान… महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात येथे सुरू आहे आज मतदान… धुळे,…
रविवार, दि. १९ मे बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेट १०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी करण्याची भीती दाखवून बिल्डरकडे १ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर आर्थिक गणेश शाखेचा पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता त्या पाठोपाठ या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. १ कोटीच्या लाचेचे प्रकरण समोर आल्यानंतर हे दोघेही अधिकारी फरार झाले आहेत. अद्यापही हे दोघे सापडू शकलेले नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांच्या…
रविवार, दि. १९ मे छात्रभारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वरी सातपुते, कार्याध्यक्षपदी मोहम्मद कैफ तांबोळी यांची निवड करण्यात आली. संघटनेची अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे… सुरेश गाडे (तालुका संघटक), सुहानी गुंजाळ (तालुका उपाध्यक्ष), निकिता शिंदे (तालुका युवती संघटक), सुमित खरात, आकांक्षा जमधडे (तालुका सदस्य), अपेक्षा गुंजाळ (अभ्यास मंडळ प्रमुख), श्रेया शिंदे (सह्याद्री कॉलेज अध्यक्ष) छात्रभारतीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर साथी भास्कर दुर्वे नाना स्मारक या ठिकाणी पार पडले. येथे या निवडी करण्यात आल्या. प्रा. तुळशीराम जाधव, डॉ. सागर भालेराव, राजाभाऊ अवसक, अनिकेत घुले यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, कृष्णामाई जाधव,…
प्रवीण पूरो | मुंबई राजकारणात खरं सांगायला काही नसेल तर खोट्याचा आसरा घेण्याशिवाय पर्याय नसतो. लोकसभेच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खोटेपणाची हद्द पार करून टाकली. विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान तोडलेले तारे पाहिले की इतकं खोटं बोलण्याचा सराव या मंडळींनी केला तरी कधी, असं राहून वाटतं. बरं खोटं किती बोलावं याला काही मर्यादा? या सार्या मर्यादा पार केल्याने या मंडळींचा समाचार घेण्यावाचून पर्याय नाही. घरातली प्रमुख कर्ती व्यक्ती जेव्हा खोटेपणाचा आसरा घेते, तेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते खोटेपणाचा बेमालूम वापर करतात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी हेच दाखवून दिलंय. २०१४ च्या…
रविवार, दि. १९ मे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केल्याचा प्रकार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांना शुक्रवारी (दि. १७) मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी…
शनिवार, दि. १८ मे पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने शनिवारी संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला तब्बल चार लाख रुपयांचा दंड आणि एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रुपेश सुभाष वर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणाऱ्यांमध्ये चपराक बसली असल्याचे मानले जाते. संगमनेरच्या बाजारपेठेतील सुवर्ण व्यावसायिक रुपेश सुभाष वर्मा यांनी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून तीस लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज २०१८ मध्ये घेतले होते. आज अखेर या कर्जाची थकबाकी ६७ लाखावर गेली आहे. संस्थेने वारंवार त्यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केल्यानंतर वर्मा…
शनिवार दि. १८ मे दुचाकीवरून आपले चेहरे रुमालाने झाकून आलेल्या आलेल्या सात जणांनी सोनाराला शस्त्राचा भाग दाखवत दरोडा टाकत सराफी पेढी लुटण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील वानवडीत मोहम्मदवाडी रोडवर ही घटना घडली. शनिवारी दुपारी सराफी पेढी लुटण्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली असून चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याने पोलिसांनी हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरात नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती. महम्मदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात असलेल्या बी.जी.एस. ज्वेलर्स सराफी पेढीमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दरोड्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी खरेदीच्या बहाण्याने चोरटे सराफी पेढीमध्ये शिरले होते. त्यांनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा…
