Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक देऊन जखमी केल्याच्या कारणावरून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई जखमी पोलीस कर्मचाऱ्याला देण्याची शिक्षा ठोठावली आहे. अमोल मारुती शिंदे वय 29 वर्ष (रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिंदे याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 333, 353, 279, 337, 338, मोटार वाहन अधिनियम कलम 184, 134 (अ) (ब) सह 177 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आणखी एका सह आरोपी असलेल्या कॅफे मॅझिकच्या मालकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कन्हैया दिलीप सोनवणे (वय 27 वर्षे, रा. काझीगढी, शितलादेवी मंदिर, अमरधाम रोड नाशिक, हल्ली रा. कासारवाडी रोड, संगमनेर ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे वयाच्या मुलीवर संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठल कडा, कऱ्हे घाट येथे आशिष नानासाहेब राऊत (वय २० वर्ष) व किरण सोपान राऊत (वय ३० वर्ष, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून विखे पाटील यांनी एक वर्षापुर्वी जबबादारी स्विकारली, तुम्ही तर चाळीस वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. प्रत्येक प्रश्नाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडल्याने तुमचे अपयश झाकले जाणार आहे का? असा सवाल अमोल खताळ यांनी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात केला आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात अमोल खताळ यांनी म्हणले आहे की, मालदाड रस्त्याचा प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला नाही. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या आहे. पण लोकप्रतिनीधीनी तालुक्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहीले नसल्यानेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वच प्रश्न ऐरणीवर आले आहेत. प्रश्न सोडविता न आल्याची उतर जनता आता आ. थोरांताकडे मागू लागल्याने केवळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली जावी, यासह विविध मागण्यांसाठी दूधगंगा पतसंस्थेतील ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीच्यावतीने जनआक्रोश व उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे. नेमके प्रकरण काय आहे : सुमारे 81 कोटी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचा चेअरमन आणि प्रतिष्ठित राजकारणी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात ऑगस्ट महिन्यात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास होता तोपर्यंत अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह तब्बल पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. राहता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जेष्ठ नेते थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महासचिव उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणारी खोटी आश्वासने, भुलथापा आणि फसव्या योजनांचा भांडाफोड संगमनेर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेल्या तीन दिवसात संगमनेरकर नागरिकांमध्ये जाऊन केला आहे. या योजनांचा भांडाफोड करताना शिवसेनेने एक प्रकारे “होऊ द्या चर्चे”च्या माध्यमातून संगमनेरकरांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकार विरोधात शिवसेनेकडून राज्यभर “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविला जात आहे. १ ते ३ ऑक्टोंबर दरम्यान संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने शहरातील १४ प्रभागांमध्ये गल्लो-गल्ली, चौका-चौकात शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या उपक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील पालकमंत्रीपदामध्ये मोठे फेरबदल केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी बुधवारी (ता. 4 ऑक्टोंबर) जाहीर केली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्री पदामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्री पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. याच पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पवारांवर पुण्याची जबाबदारी सोपविली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेले पालकमंत्री पुढील प्रमाणे, (कंसात सोपविलेला जिल्हा) उपमुख्यमंत्री अजित पवार (पुणे) महसूल मंत्री राधाकृष्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगरमध्ये झालेल्या अठराव्या जिल्हा स्पोर्ट्स व फिटनेस एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला. एरोबिक्सच्या फिटनेस आणि एरो या दोन्ही प्रकारात विविध गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतांना ध्रुवच्या खेळाडूंनी २५ सुवर्ण व प्रत्येकी ३ रौप्य व कांस्य पदकांसह एकूण ३१ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील १० ते १४ वर्षांखालील मुलांच्या स्पोर्ट्स एरोबिक्स गटात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ईशान उगले, शौर्य मणियार, रचित कासट यांनी सुवर्ण कामगिरी करतांना शाळेला तीन सुवर्ण पदके मिळवून दिली. रुद्र हुलवान, राजवीर आवारी आणि साईराज बालोडे यांनी…
आरोपी औरंगाबाद खंडपीठात जाण्याच्या तयारीत, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका आरोपींच्या पथ्यावर ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचा विसर पडू देऊ नये, नागरिकांची अपेक्षा! महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर शेकडो ठेवीदारांचे लक्ष लागलेल्या आणि तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजकीय पुढारी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून आठ दिवसांचा कालावधी उलटत आला आहे. शिवाय सलगपणे आलेल्या सुट्ट्यामुळे अद्याप आरोपी औरंगाबाद खंडपीठात पोहोचू शकलेले नाही अशा स्थितीत अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील एकाही व्हाईट कॉलर क्रिमिनलपर्यंत अद्यापही पोहोचता आले नाही. संगमनेर शहर पोलिसांकडून हा गुन्हा जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भूखंडाचा व्यवहार न झाल्याने तक्रारदाराला दिलेले धनादेश वटला नाही म्हणून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावला. मात्र या निर्णयाविरोधात अपिलात गेलेल्या आरोपीला वरिष्ठ न्यायालयाने दंडाच्या रकमेच्या पंचवीस टक्के एक लाख रुपये पंधरा दिवसांच्या आत न्यायालयात भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर या खटल्याचे कामकाज चालणार आहे. याने घेतली वरिष्ठ न्यायालयात धाव : प्रकाश प्रभू अरगडे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या व वरिष्ठ न्यायालयात या निर्णया विरोधात अपील दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. या न्यायालयासमोर सुनावणी : अरगडे यांच्या विरोधात प्रशांत चंद्रकांत डहाळे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जेव्हा व्यापाराची भरभराट होते, तेव्हाच विकास साधला जावू शकतो. संगमनेर शहराकडेे जिल्ह्यातील आघाडीची बाजारपेठ म्हणून बघितले जाते. संगमनेरची बाजारपेठ समृद्ध होण्यात तालुक्यातील विविध आर्थिक संस्थांचा वाटा असून त्यात महेश नागरी सहकारी पतसंस्था अग्रणी आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला असून सुमारे ७५ कोटींचे कर्ज वितरण करतांना व्यापारी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. याच बळावर गेल्या आर्थिक संस्थेने २ कोटी ११ लाखांचा निव्वळ नफा कमावला असून थकबाकीही नगन्य असल्याची माहिती महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सीए कैलास सोमाणी यांनी दिली. संगमनेरच्या अर्थकारणातील अग्रगण्य व पतसंस्था चळवळीत आघाडीवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :‘अटक कारवाई अत्यावश्यक असेल तरच करावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट दिशानिर्देश असूनही ताडदेव पोलिसांनी जामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपीचा जामीन स्वीकारला नाही आणि त्याला त्याचे कपडे उतरवून अन्य गुन्हेगारांसोबत रात्रभर कोठडीत बेकायदा डांबून ठेवले, हे पोलिसांच्या मनमानी व बेदरकारपणा आणि असंवेदनशीलतचे दर्शन आहे. पोलिसांची अशी मनमानी खपवून घेतला जाऊ शकत नाही’, असे अत्यंत कठोर निरीक्षण नोंदवत मुंबईतील संगीत शिक्षकाला ८ नोव्हेंबरपर्यंत दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. न्यायालयाने दिले हे आदेश : बेकायदा अटक कारवाई आणि सात रस्ता लॉक-अपमध्ये घडलेला प्रकार यासाठी जबाबदार असलेल्या ताडदेव पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिसांची चौकशी करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भूखंड व्यवहारापोटी अनामत म्हणून आरोपीला तक्रारदाराने पाच लाख रुपये दिले. मात्र नंतर सदर भूखंडाचा व्यवहार न झाल्याने आरोपीने तक्रारदाराला त्या व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावला आहे. प्रकाश प्रभू अरगडे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रशांत चंद्रकांत डहाळे यांनी यासंदर्भात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांच्यासमोर झाली. डहाळे यांच्यावतीने ॲड. सैफुद्दीन शेख यांनी ॲड. संजय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली काम बघितले. मजुरीचे काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज कंत्राटी तहसीलदार भरतीच्या जाहिरातीवरून मोठे रणकंदन माजले असतानाच आता ही जाहिरात रद्द करण्याची आफत राज्य सरकारवर ओढावली आहे. कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करा, असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कुठलही धोरण नाही, असा खुलासा विखे पाटील यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले विखे पाटील : कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. वसंत टेकडी येथे असलेल्या भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री क्षीरसागर, उद्योजक पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पध्दती लयास चालली आहे. आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो वकूब नसलेल्या व्यक्तीला एखाद्या पक्षाचा अध्यक्ष बनवला की तो कसा वाह्यात वागतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे यांचं देता येईल. प्रदेशाध्यक्ष कसा नसावा याचे दाखले या प्रदेशाध्यक्षाने भाजपला घालून दिले आहेत. पात्रता नसताना मोठी जबाबदारी आल्यावर अशी माणसं सगळ्यांनाच मोजतात. बावनकुळे यांची गत तशीच झाली आहे. त्यांच्या या वाह्यातपणाचे भाजप वगळता सगळ्याच पक्षाचे नेते बळी ठरले आहेत. त्यांनी पत्रकारांनाही सोडलेलं नाही. आपल्या पक्षाला टिकेपासून दूर ठेवायचं असेल तर पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षाच्या तालुका आणि जिल्हा पदाधिकार्यांना दिला आहे. तिथे त्यांना काळा चहा पाजायचा की दुधाचा, हे ठरवून…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्वररंग युवक महोत्सवमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेऊन ९ कला प्रकारात यश संपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळामार्फत स्वररंग या विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कला अविष्कार सादर करण्याची संधी मिळते. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलावंताना आगामी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून संधी दिली जाते. या युवक महोत्सवातून अनेक नामवंत कलाकार तयार होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेली आहे. समूह गीत गायनमध्ये समृद्धी अभंग, कार्तिक सोनवणे, प्रथमेश बिडवे, आदित्य साळवे, संज्योत कोल्हे, कावेरी बोऱ्हाडे यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज “आगामी निवडणुकीत आपण कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावणार नाही. कोणालाही लक्ष्मी दर्शन करणार नाही. मी कधीही लाच घेतली नाही, कोणाला घेऊही देणार नाही. इतकच काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचं” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल आहे. यांची उपस्थिती : यावेळी खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी भाजपा चंद्रशेखर बावनकुळेंना घरचा आहेर दिल्याची चर्चा यामुळे केली जात आहे. लोकार्पण सोहळा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशीम येथे 3655 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये १२ ऑक्टोबर,२०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हॅलोजन लावत असताना अचानकपणे वायरमनला विजेचा धक्का बसला आणि तो वायरला चिकटला. गर्दीमुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही मात्र विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या सारिका दावणपल्लीच्या प्रसंगावधानामुळे या वायरमनचा जीव वाचला. काय होती घटना: गुरुवारी संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुक चालु असताना नगरपालिकेसमोर एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर वायरमन हॅलोजन लावायचे काम करत असताना शॉक लागून तो वायरला चिटकला. सारिकाच्या लक्षात आला प्रकार: मदत मिळण्यासाठी खुप प्रयत्न करीत होता पण मिरवणुकीच्या धाम-धुमीमुळे कोणाच्याच ते लक्षात आले नाही. मिरवणुक बघण्यासाठी महाराणा प्रताप महिला मंडळाच्या सदस्या सारिका दावनपल्ली नगरपालिकेजवळ आपल्या परिवाराबरोबर उभी होती. सारिकाचे लक्ष…
