Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि.११ डिसेंबर आत्तापर्यंत आपण शिक्षण आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करून जीवन जगत आलो आहोत, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेशी (Artificial Intelligence) स्पर्धा करून, आपल्याला स्वतःची व्यावसायिक उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. भारतीय मुले ही कष्टाळू व बुद्धिमान आहेत, ती हे आव्हान लीलया पेलतील. मात्र त्यांना या परिस्थितीत ताणतणावाचे व्यवस्थापन करणारे आनंददायी शिक्षण द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. गुरु एज्युकेशन पुणे व एक्सपर्ट अबॅकस फाउंडेशन संगमनेर-अकोले यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग, उद्योजक सुदीप वाकळे, प्रकाश नवले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ओझर टाऊनशिप – दि. ११ डिसेंबर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी दहावी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. प्रदर्शनामध्ये १०३ मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. संस्थेचे ओझर विभागाचे अध्यक्ष के. एन. पाटील, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य रमेश कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. विज्ञान प्रदर्शनासाठी शालेय स्तरावर इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचा एक गट तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट करण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यानी भूगोल, अवकाशिय, शेती, संगणक, सेन्सर, भूकंप मापन, चांद्रयान मोहीम आदीं विविध विषयांवर आधारीत सुमारे १०३ मॉडेल्स सूरेख पद्धतीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ११ डिसेंबर दूध भाव वाढ करावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नव्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने दुधाचे भाव १२ ते १३ रुपयांनी कमी केले असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. याबरोबरच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहे. निर्यात बंदी केल्याने सर्वत्र कांद्याचे भाव पडले आहेत. राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयांचा भाव द्यावा तसेच कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली निर्यात बंदी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले (अहमदनगर) -अकोले तालुक्यातील सिरीयल किलर म्हणून परिचित असलेल्या क्रूरकर्मा अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली. चार महिलांच्या खून प्रकरणानंतर क्रूरकर्मा म्हणून राज्यात परिचित असलेल्या मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (अण्णा वैद्य) याने रविवारी सायंकाळी सुगाव खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत घाबरलेली मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर नेहरू गार्डनमध्ये लहान मुलांना खेळविण्यासाठी असलेली चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात एक सात वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्या नेहरू गार्डनमध्ये ही घटना घडली. विराज मारुती शिंदे (वय ७ वर्ष, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) असे अपघातात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. गार्डनमध्ये लहान मुलांसाठी एक चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे आहे. गार्डनमध्ये येणारी लहान बालके या एक्सप्रेस रेल्वेतून सफरीचा आनंद घेत असतात. सायंकाळी सहा वाजता नियमितपणे लहान बालकांना खेळविण्यासाठी ही रेल्वे गाडी बालकांना घेऊन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्यावतीने कै. चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जाणारे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा निवड समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी केली. संगमनेर येथील ज्येष्ठ संपादक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल शेवाळे यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठीचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नगर येथील महाराष्ट्रातील नामवंत नाट्यकर्मी आयुब शेख व अकोले येथील डॉ. उल्हास कुलकर्णी यांना नाट्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विठ्ठल शेवाळे हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांनी उज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. शासनाच्यावतीने आढळा नदीच्या अभ्यास प्रकल्पासाठी…

Read More

प्रवीण पुरो (मो. 9869991868) आपल्या खोटारडेपणाला ठेस पोहोचली की माणसं कासावीस होतात. ते कसल्याही गोष्टीचा आधार घेत होत्याचं नव्हतं करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असेच काहीसे कासावीस झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक हे देशद्रोही असल्याने त्यांना सत्तेत सहभागी करून घेता येणार नाही, असा रेटा त्यांनी लावला आहे. त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्र पाठवून त्यांनी नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव पॅरोलवर सोडण्यात आल्याने ते सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित आहेत. त्यांनी आपला विधिमंडळात उपस्थित राहण्याचा हक्क बजावला आहे. पण यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. यात पहिले आहेत देवेंद्र फडणवीस. एखाद्याविषयी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ९ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकावर बसविण्यात यावा, यासाठी नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी, विश्वयुध्दात सहभागी असलेले व व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह वैभवशाली स्मारके होण्याचा मार्ग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. 9 डिसेंबर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांच्यावतीने मेरिटवर दिला जाणारा स्टार एज्युकेशन अवार्ड (Star Education Award 2023, only on Merit ) ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल दिला जाणारे या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. प्राचार्य डॉ. गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहे. ते संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य पदाबरोबरच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापरीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यासमंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इत्यादी अधिकार मंडळामध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, दि. ८ डिसेंबर – शुक्रवारी संगमनेरमध्ये झालेल्या कांदा लिलावात भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर नाशिक पुणे महामार्गावर तब्बल दीड तास ठिय्या देत आंदोलन केले. कांद्याचे फेर लिलाव करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले मात्र तरी देखील व्यापाऱ्यांकडून लिलाव सुरू होत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सभापतींच्या दालना बाहेर आंदोलन सुरू केले अखेरीस सायंकाळी पाच वाजता सुमारास बाजार समितीच्या पदाधिकारी आणि सचिवांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कांद्याचे फेर लिलाव पुन्हा सुरू झाले. गेल्या काही दिवसांपासून वधारलेल्या कांद्याला शुक्रवारी थेट दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळू लागल्याने अचानकपणे व्यापाऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर, दि. ८ – दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावरून राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू सुरू असताना सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करत आहे. त्यामुळे राज्यातील दुधाकडे संशयित नजरेने पाहिले जात असून खाजगी दूध संस्थांची चंगळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला घेरल्याचे दिसून आले. थोरात म्हणाले, दूध दरावरून राज्यभर आंदोलने सुरू आहे. शेतकऱ्यांना २४ ते २५ रुपये दराने दूध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस-पवारांच्या महायुती सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांकरिता पुरवणी मागण्यांमध्ये प्रत्येकी 40 कोटी रुपयांची तरतूद केली. निधी वाटपावरून असलेली सत्ताधारी आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना विरोधी आमदारांना मात्र या निधीतून धावण्यात आल्याने त्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. पाच राज्यातील निवडणुका नंतर आता लोकसभेच्या तयारीला लागलेल्या महायुतीच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतदारांना खुश करण्यासाठी तब्बल ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते आणि अन्य कामांसाठी या सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये केलेली ५५ हजार ५२० कोटींची तरतूद हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. यात सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी ४० कोटींचा निधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – दि. ७ डिसेंबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही. असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नागपूर येथील अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. पायर्‍यांवर आंदोलन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – लोणी, दि. ७ डिसेंबर पोलीस पथकासह बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांवर पिस्टलने फायरिंग करत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ जणांवर लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटने संदर्भात गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात ही घटना घडली. या संदर्भात प्राणी कल्याण समिती मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र शासन या संस्थेत अधिकारी असलेल्या अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (वय 39 वर्ष, रा. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजिद कुरेशी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ७ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संगमनेरच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारणार असल्याचे सांगत आणखीही महापुरुषांची स्मारके उभारणार असल्याची ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, श्रीमती कुसुम माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ५ डिसेंबर पोलीस दप्तरी बंद असलेले संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अहमदनगर एलसीबीच्या छाप्यात समोर आले आहे. अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या संगमनेर पोलिसांच्या हद्दीत थेट एलसीबी छापेमारी करत कारवाया करत आहे. यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडत असले तरी एलसीबीच्या कारवाया देखील अनेकदा संशयाच्या वलयात अडकलेल्या दिसतात. बुधवारी सकाळी साडेसात वाजता मोगलपुऱ्यातील बेकायदेशीर कत्तल खानावर अहमदनगर एलसीबी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले सहाशे किलो गोमांस ताब्यात घेतले. याशिवाय कत्तरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अहमदनगर एलसीबीचे पोलीस नाईक सचिन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ६ डिसेंबर संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संगमनेर येथे डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली. मागील महिन्यात विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात उभारला जाईल, अशी घोषणा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर दि. ६, संगमनेर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते अमोल खताळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी खताळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी खताळ यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या समितीत सदस्य म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तर सचिव म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार काम बघतात. शासनाच्या विशेष सहाय्य योजना अंतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई, दि. ५ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून देण्यात आली. जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा); शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख – सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख – राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा), दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह सतीश देशमुख, सदाशिव साबळे, ज्योतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वदक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे या प्रमुख नेत्यांसह शेकडो दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने दूध…

Read More