Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर दि. १ – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांचे चार आमदार निवडून येण्याची पात्रता नव्हती त्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागा कशा मिळाल्या या राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेस हैराण झाली आहे. राज यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने तिरकस सवाल करत महाराष्ट्राने राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका पाहिली आहे असं त्या पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विचारलं आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलं. विधानसभेत महायुतीत येणार की नाही, अशी गोंधळलेली स्थ‍िती मनसेची झाली होती. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा…

Read More

शिर्डी दि. १ – मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकाऱ्यांनाही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गावभेटी देत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे पुढील प्रमाणे सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी. यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे. दौऱ्यामध्ये सकारात्मक फलित निघेल…

Read More

संगमनेर दि. ३० – शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल तीन-चार तासांपासून गायब असलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनेक घरांमधून सुरू आहे. त्यामुळे महिलांचे सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने व त्यातच शहरातील महावितरण लाईटच्या बत्या गुल केल्याने अंधारातच हे कार्यक्रम सुरू होते. दरम्यान गायब झालेल्या विजेचा परिणाम शहरात तसेच उपनगरात जाणवत असून अनेक नागरिकांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यासाठी दूरध्वनी केले असता नागरिकांचे दूरध्वनी घेण्याचे टाळण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी देखील फोन घेतले नाही. अंधाराचा…

Read More

संगमनेर दि. ३१- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार असून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत संतापाची लाट… संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये…

Read More

अहिल्यानगर दि. ३१- निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन बंद झाले असून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर थकीत रक्कम मिळणार असल्याचा फसवा दूरध्वनी संदेश अज्ञात व्यक्तीकडून निवृत्ती वेतनधारकांना येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कुठल्याही फसव्या संदेशाला निवृत्तीवेतनधारकांनी प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्धन हरी सहारे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदान करताना कुठल्याही वसुली अथवा प्रदानाबाबत कोषागार कार्यालयामार्फत दूरध्वनी करुन संपर्क साधला जात नाही अथवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सांगितले जात नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी अशा कुठल्याही प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये. अशाप्रकारचे संदेश प्राप्त झाल्यास, शंका आल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार करण्यापूर्वी त्याची माहिती कोषागार कार्यालयास द्यावी. निवृत्तीवेतनधारकांनी…

Read More

संगमनेर दि. ३१ –  संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आश्वीला अपर तहसील कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे, मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अपर तहसीलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली असल्याचे माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाबाबत जनतेत गैरसमज पसरविण्यात येत असून खुलासा करण्यासाठी गुरूवारी शासकिय विश्रामगृहामध्ये काही पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा विभाजनाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील २१ जिल्ह्यांच्या विभाजनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्ट नंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशातून जिल्हा विभाजना ऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीन नवीन अपर तहसील कार्यालय सुरू केली जाणार आहेत. या योजनेला विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गती दिली आहे. संगमनेर, अकोले आणि नेवासे तालुक्याच्या तीनही तहसीलदारांनी…

Read More

अहिल्यानगर दि. ३१-  ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२५ मधील पुढील नमूद १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. हे आहेत ते दिवस… १९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १, २ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर…

Read More