Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून खात्मा करण्यात येईल, अशी धमकी सावंत यांना दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून चार दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आहे. कोरटकर सध्या फरार आहे. यातच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी दिल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने…
राहुल जाधव पाटील रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो. सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा…
संगमनेर, दि. २८ फेब्रुवारी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या सीटवर गळ्यातील मंगळसूत्रामधील मनी पडले असता महिलेला आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) संगमनेर बस स्थानकावर हा प्रकार घडला. संगमनेर बस स्थानकामधून महिलांच्या गळ्यातील दागिने वारंवार चोरी जात आहे. दागिने चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून दिवसाढवळ्या ते महिलांच्या गळ्यातील दागिन्यांच्या चोऱ्या करत आहे. दागिने चोरट्यांसाठी संगमनेर बस स्थानक आणि बसस्थानकावरील गर्दी फायद्याची ठरत आहे. बस स्थानकावर असलेल्या एखाद-दोन पोलिसांचा डोळा चुकवून बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतही चोऱ्या होऊ लागल्याने संगमनेरचे बस स्थानक महिलांसाठी असुरक्षित बनू लागले आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील…
नागपूर : जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने याचिकाकर्ता मुलाच्या वडिलांना जातवैधता प्रमाणपत्र दिले, त्याच्या भावाला आणि बहिणीला देखील दिले. मात्र याचिकाकर्ता मुलाने समितीकडे अर्ज केल्यावर कागदपत्रे पुरेशी नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या या कृतीला बेकादेशीर ठरवत वडील, भाऊ-बहिणीकडे जातवैधता असताना समितीने इतर कागदपत्रे तपासण्याची गरजच नव्हती, असे निरीक्षण नोंदवले आणि समितीचा आदेश रद्द केला. तसेच एका महिन्यात याचिकाकर्त्याला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही मुख्य न्या. आलोक आराध्ये आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने समितीला दिले. ऋषी बळवंत दडमल या विद्यार्थ्याने नागपूरच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ‘माना’ जनजाती समूहाचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता.…
नीरज बाबासाहेब गाढे – साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहिल्यानगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येथे स्थापित केलेले वाळूचे शिवलिंग पुढे जाऊन कोल्हाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. याच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे ७ मे १९५९ रोजी राजेंद्र शिवाजीराव गाढे यांचा गाढे पाटील कुटुंबात जन्म झाला. पुढे “गाढे काका” या नावाने संगमनेर, घुलेवाडी परिसरात ओळखले जाणारे हे सुंदर नेतृत्व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने काळाआड गेले व सर्वांचे आवडते, सर्वाना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणारे, कुठेही भेटल्यावर पोटभरून गप्पा…
पुणे, दि. २८ फेब्रुवारी २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसांपासून फरार होता. फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बड्या राजकीय नेत्याच पोरग तीन तासात सापडतं आणि अत्याचार करणारा नराधम आरोपी…
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी विधान परिषदेच्या उपसभापती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी संगमनेरमध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमा दहन करण्यात आली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यावेळी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल…
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – मोठा गाजावाजा करत संगमनेर नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने संगमनेरमधील पाच कत्तलखाने नेस्तनाबूत केले असले तरी देखील संगमनेरात अद्यापही गोवंश हत्या सुरूच आहे. संगमनेरमधील कत्तलखान्यावर थेट अहिल्यानगर एलसीबीने कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत १२०० किलो गोमांसासह तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेरमधील जमजम कॉलनीमध्ये अब्दुल समद कुरेशी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातूरकर, विशाल तनपुरे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश जनावरे…
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील महिलांकडून जागृत महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचच्या अध्यक्षपदी तळेगाव येथील साक्षी दिघे, उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके, सचिव पदी पेमगिरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सुनिता रोहिदास खताळ (धांदरफळ खुर्द), मंदा निळे (मिर्झापूर), ज्योत्स्ना कदम (संगमनेर), लक्ष्मी तूपसुंदर (गुंजाळवाडी), शितल पांडे (पिंपळगाव माथा), मुक्ता सांगळे, लता सावंत (पिंपळगाव माथा), निर्मला दिघे (तळेगाव) यांचे तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत मंगळवारी संगमनेर खुर्द येथे झालेल्या बैठकीत या संगमनेर शाखेची स्थापना केली. बैठकीसाठी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. “आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या” असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची…
