Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली. याप्रसंगी जेष्ठ नेते सहकार महर्षी दिलीप देशमुख, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पद्मश्री तात्याराव लहाने उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  हिरालाल पगडाल  साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. आयुष्यभर अज्ञान, विषमता, पारतंत्र्य याच्याविरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. साने गुरुजी क्रांतिकारक होते, लढवय्ये होते, व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले. साने गुरुजी म्हंटले की सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आईमुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली. आजही मराठी सारस्वतात श्यामची आई हेच सर्वाधिक लोकांनी वाचलेले पुस्तक आहे. आचार्य अत्रेंनी १९५२ साली श्यामची आई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | ज्ञानेश्वर गायकर देशाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देऊन अन्य खासदारांना काय जबाबदारी देता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली असली तरी, संघटनात्मक जबाबदारीमध्ये अजित पवार यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी ह्या सर्व बाबींचे स्वागत केले आहे. पुढे अजितदादाच राज्याचे मुख्यमंत्री असणार हेही पवारसाहेबांनी अधोरेखित केले.  याबद्दल मीडिया, अंध भक्त आणि घाणेरडा आयटी सेल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  रविवार विशेष  | प्रवीण पुरो, मुंबई सारं काही माझ्यामुळेच घडतं. विश्‍वाचा निर्माता मीच, अशा अहंकारात वावरत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकार बालासोरच्या भीषण रेल्वे अपघाताने लोप पावला तर चांगलंच. पण घमेंडी माणसाची देहबोली तसं होऊ देत नाही. शाबासकी घ्यायची असेल तर मी आणि संकट आलं की दुसर्‍याला पुढे करण्याची हिकमत मोदींनाच शोभते. इतरांच्या ती अंगलट आली असती. स्वातंत्र्यानंतर आजवरच्या भीषण अपघातातील एक अशा बालासोरच्या तिहेरी रेल्वे अपघाताने हाह:कार माजला नसता तर नवलच. या घाताने भारत सरकारचा, सरकार चालवणार्‍या भाजपचा आणि भाजपचं नेतृत्व करणार्‍या मोदी-शहांच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटला.  तरी निर्लज्जासारखी ही माणसं लोकांना फसवताहेत. भाजप सत्तेच्या…

Read More

नासिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यात सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत तरुणांना विनंती केली आहे की… बघा व्हिडिओ

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ. बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, गोकुळ दिघे, राहुल दिघे, राहुल भोईर, बापूसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जोर्वे आणि पंचक्रोशीतील गावांमधून संगमनेर शहरात येणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना होत असलेल्या त्रास तसेच संगमनेर मध्ये सुरु असलेले लव्ह जिहाद प्रकरणे, लँड जिहाद, पोलिसांवरील हल्ले, नुकतेच जोर्वे गावातील शेतकरी यांच्यावर झालेला हल्ला या त्रासाची स्वाभाविक प्रतिक्रिया…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही वर्षात संगमनेर गांजा विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी नगर-कल्याण हायवेवर ओतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक करताना संगमनेरातील दोघांना पकडले आहे. यातून गांजाचे पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले. सिद्धार्थ किशोर टेकाडे (वय ३१ वर्ष, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) आणि संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७ वर्ष, रा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाजवळ, संगमनेर) अशी पोलिसांनी गांजासह पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. नगरच्या दिशेकडून कल्याणकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती ओतूर पोलिसांना समजली होती. आळेफाटा पास झाल्यानंतर संशयित बोलेरो कल्याणच्या दिशेने मार्गस्थ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने राजरोसपणे सुरूच आहेत. याच कत्तलखान्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे सहाशे किलो गोमांस वावी (नाशिक) पोलिसांनी नासिक-पुणे महामार्गावर गोंदे फाटा शिवारात पकडले. समृद्धी मार्गाने हे गोमांस जाण्यापूर्वीच पोलिसांनी पकडत दोघांना ताब्यात घेतले. संगमनेरमधून मुंबईच्या दिशेने एका आलिशान कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना मिळाली होती. नाशिक-पुणे महामार्गावरून सिन्नर जवळील गोंदे फाटा येथील टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गाने ही कार जाणार होती. मात्र तत्पूर्वीच समृद्धी महामार्गावर चढणाऱ्या रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन जगताप, प्रवीण आढांगळे, भास्कर जाधव, एन. सी. मैंद, रत्नाकर तांबे, शैलेश शेलार आदींनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये मोठी पक्षीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी पवार यांनी सोपविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी दिल्लीमध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात पवार यांनी ही घोषणा केली. कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची निवड करताना या दोघांकडे त्यांनी वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्षात भाकरी फिरविण्याचे संकेत देणाऱ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सोलापूर – समाज माध्यमात अथवा एखाद्या ठिकाणी धार्मिक अथवा जातीय ते निर्माण होईल अशा पोस्ट वायरल केल्यास अथवा वक्तव्य केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम १५३ (अ), २९५ (अ) आणि कलम ५०५ व ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन संबंधितास किमान तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना विशेषतः तरुणांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या राज्यात सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून सायबर पोलिसांकडूनही संशयास्पद व्यक्तींच्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवरील खात्यांवर वॉच ठेवला जात आहे. सोशल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना आठ लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली. त्यात सीबीआयच्या हाती मोठे घबाड लागले. रामोड यांच्या पुण्यातील तीन घरांमध्ये सुमारे तब्बल ६ कोटी रुपयांची रोकड सीबीआयच्या हाती लागली आहे. हाती लागलेली रक्कम मोजण्यासाठी मशीन आणण्यात आले होते. अनेक तासानंतर हे पैसे मोजून झाले आहेत. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुण्यातील घरातच १४ स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली आहेत. रामोड यांच्या बँक खात्याची तपासणी अद्याप बाकी आहे. स्थावर मालमत्ता ही रामोड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – समनापुर (संगमनेर) येथील दगडफेक दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १७ आरोपींना शुक्रवारी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर संगमनेरच्या न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच जामीन अर्ज मंजूर करतांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांनी सर्व आरोपींना या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल होईस्तोवर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. संगमनेरमधील भगवा मोर्चा संपल्यानंतर पुन्हा परतणाऱ्या काही मोर्चेकर्‍यांनी शहराजवळील समनापुर मध्ये दुसऱ्या समुदायांच्या घरांवर दगडफेक मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यात तिघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे राहाता तालुक्यातील पाच जणांसह संगमनेर तालुक्यातील बारा जणांना अटक केली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध स्तरावर ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या बक्षीसांसाठी संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची निवड असून त्यांना राज्य सरकारच्यावतीने अडीच कोटीची बक्षिसे प्राप्त होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाते. माझी वसुंधरा अभियान ३ मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६ हजार ४१३ ग्रामपंचायती अशा एकूण १६ हजार ८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -भगवा मोर्चाच्या दिवशी तलवार घेऊन फिरणाऱ्यास नगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पकडण्याचा प्रकार समोर आला होता. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पथकाने तलवार घेऊन फिरणाऱ्यास आणखी एकाला ताब्यात घेतले असून तलवार बाळगणाऱ्या विरोधात भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र राधाकिसन डेंगळे (वय 38 वर्ष, रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे स्वतःच्या कब्जात धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात भगवा मोर्चाच्या दोन दिवस आधी ही घटना घडली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शहर पोलिसांनी याबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या कार्याध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड संगमनेर तालुक्यातील सांगवीचे रहिवासी असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. काँग्रेस पक्षाचा विचार ध्येयधोरणे यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गायकवाड यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली काम केले असून विविध योजना व विचारांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला आहे. या कामाची दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते व जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दुचाकी आणि दागिन्यांच्या चोऱ्या नित्याच्याच झालेल्या संगमनेरमध्ये आता दिवसाढवळ्या नागरिकांवर लक्ष ठेवत रोकड पळविण्याच्या घटना सुरू झाल्या आहे. अशीच सात लाखाची रोकड पळविण्याच्या नादात तिघांपैकी दोघा बिहारींना पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही वर्षातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संगमनेरमध्ये चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरी केल्यानंतर पकडले जात नसल्याने या चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. नव्याने पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेल्या निरीक्षक भगवान मथुरे यांना या चोरट्यांचा बिमोड करण्यासाठी पावले टाकावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताशी अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण लागेबंधे निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांना या पोलीस ठाण्याबाहेरचा रस्ता दाखवत नवी टीम त्यांना उभे करावी लागणार आहे. बस स्थानक, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखालील भाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- इंपिरियल चौक- माळीवाडा वेस- आयुर्वेद कॉर्नर- अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट या मार्गाच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या निश्चितीसाठी कोणाची सूचना अथवा हरकत असल्यास 30 जुन, 2023 पर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. अहमदनगर शहराच्या हद्दीत डीजे, डॉल्बी सिस्टिम लावून शोभा मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- माळीवाडा वेस- पंचपीर चावडी- तख्ती दरवाजा- कापड बाजार- टेलिखुद-चितळेरोड- चौपाटी कारंजा या मार्गाने काढण्यात येतात. या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत विविध मंडळाच्यावतीने ठेवण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकीकडे वर्षाच्या परिश्रमातून सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी येत असताना सर्वांनीच जल्लोष करावा असा दिवस असताना दुसरीकडे मात्र काही लोक संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, येथील वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांच्यावतीने बुधवारी आयोजित जलपूजन कार्यक्रमप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अविनाश सोनवणे, जगन्नाथ घुगरकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सावित्रीबाई फुले वसतीगृहात २१ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते व सुप्रदा फातर्पेकर यांनी आज वसतिगृहातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आयोग त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला. त्यानंतर आयोगाच्या या दोन्ही सदस्यांनी वस्तीगृहाची पाहणी करत संचालक आणि व्यवस्थापनाची भेट घेतली. या भेटीत अनेक त्रुटी आणि प्रशासकीय उणिवा समोर आल्या आहेत. यात प्रामुख्याने वस्तीगृहातील सीसीटीव्ही गेले वर्षभर बंद आहेत. मनुष्यबळाची कमतरता असून महिला सुरक्षा रक्षक नाही. मुलींना तक्रार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – तळागाळातील समाजघटकांसाठी योजना राबवितांना जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, निवासी आश्रम शाळा, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांचे समाज कल्याण विभागाला नेहमीच सहकार्य लाभले. या पाठबळामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे प्रतिपादन नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केले. नाशिक समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालय व अहमदनगर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्यावतीने समान संधी केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त अनिशा शेख,…

Read More