Author: अनंत पांगारकर

शनिवार, १४ डिसेंबर  संगमनेर – शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावीत, आपली कार्य संस्कृती आणि आधुनिक व्यवसाय याविषयी माहिती तसेच स्वतःचे करिअर निवडण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सवाच्या दरम्यान ७२०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवसाय पूर्व कौशल्य शिकविली जाणार आहे. महोत्सवादरम्यान २३ डिसेंबरला एकाच वेळी पाचवी ते नववी दरम्यान शिकणारे ७,२०० विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे गायन देखील करणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य उपक्रमाची माहिती एका पत्रकार…

Read More

शनिवार १४ डिसेंबर  मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. प्रदेश कमिटी बरखास्त करा!… मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे.…

Read More

शनिवार १४ डिसेंबर  मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता…

Read More

प्रवीण पुरो / मुंबई शुक्रवार १३ डिसेंबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहेत. प्राप्त वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे मिळतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, असंही सांगितलं जातं. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश असेल. यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होईल असं मानलं जातं. अडीच वर्षांच्या कार्यकाळात…

Read More

शुक्रवार १३ डिसेंबर  सहा वर्षाच्या मुलीसह चित्रपट पाहून स्कुटीवरून घरी परतत असलेल्या संगमनेर महाविद्यालयातील महिला प्रोफेसरला शहरालगतच्या घुलेवाडी फाट्याजवळ चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत माय-लेकी जखमी झाल्या आहे. जखमी मायलेकींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात जखमी असलेल्या प्रोफेसर ललिता बाबुलाल मालुसरे सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. 05 – 8886 या चार चाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, बुधवारी (११ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर मालुसरे या आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीसह घुलेवाडी येथील छोटू महाराज टॉकीजमध्ये चित्रपट पाहून आपल्या स्कुटीवरून गोल्डन…

Read More

शुक्रवार १३ डिसेंबर  मुंबई – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला असून यात भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आणि समोर आलेल्या संभाव्य २१ मंत्र्यांच्या नावाच्या यादीत अहिल्यानगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून आता मंत्रिपदासाठी फिल्डींग लावली जाण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे चिन्ह असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई  गुरुवार १२ डिसेंबर – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीत मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यामुळे आणि कोणाला किती मंत्रिपद द्यायची? कुठली खाती द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय.  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. पण भाजपा हे खाते सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेला शांत करण्यासाठी शिंदे यांच्या पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरविकास (UD) खात्यांची…

Read More

गुरुवार १२ डिसेंबर संगमनेर – संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या तपासानंतर ही चोरी उघड करण्यात पोलिसांना यश आले. हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टने ही चोरी केल्याच्या समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. काय होती घटना – शहरालगत असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून रविवारी सकाळी सात ते मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान व्यवस्थापक सचिन सदाशिव गाडे यांच्या केबिनमधील तिजोरीतून सहा लाख रुपयांची रोकड चोरी गेली होती. यांच्यावर व्यक्त केला होता संशय…

Read More

गुरुवार १२ डिसेंबर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या सातत्याने सुरू आहे. शहरातील मालपाणी हेल्थ क्लबच्या रिसॉर्टमधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संदर्भात रिसॉर्टचे कर्मचारी सचिन सदाशिव गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडे यांच्या तिजोरीत सहा लाख रुपयांची रोकड जमा होती. तिजोरीतील ही रोख रक्कम चोरी गेली आहे. याप्रकरणी तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांनी ही रोकड चोरल्याचा आरोप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी विशाल चंद्रकांत शिंदे, सचिन अशोक काळे व प्रथमेश संजय मिसाळ या तिघांविरुद्ध…

Read More

गुरुवार १२ डिसेंबर जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी येरवड्याच्या खुल्या कारागृहातून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल मेघदास पटोनिया (वय ३५) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावातील आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील…

Read More