Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून चार कैदी एकाच वेळी पळून जाण्याची घटना ताजी असताना आता येरवडा तुरुंगातूनही खुनाच्या प्रकरणातील शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याच समोर आलं. यामुळे संगमनेरतील घटनाही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधवच्या पळून जाण्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा…

Read More

आर्थिक गुन्हे शाखेचा तपास जैसे थे नेमकं पाणी मुरतय कुठे? महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरण समोर आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्या आहेत. आज ना उद्या आपले पैसे मिळतील या भरोश्यावर असलेल्या ठेवीदारांचा आशावाद आता मावळला आहे. त्यामुळे ठेवीदारांनी तिसऱ्यांदा आपले गाऱ्हाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दरबारी मांडले आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याचे मान्य केल्यानंतर विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राजकीय वलय असलेल्या आणि जिल्हा परिषदेचा माजी सदस्य भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – गेली आठ वर्ष प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा 200 ते 300 रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली, गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असा सवाल करत नऊ वर्ष सभासद, शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांनी गणेश कारखान्याचा कळवळा असल्याचा खोटा आव आणू नये, असा टोला गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी सदाफळ यांना लगावला. गणेशचे अध्यक्ष लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर दररोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, ज्येष्ठ नेते…

Read More

रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतात कोणताही नवा उद्योग सुरू करायचा असल्यास पूर्वी उद्योगपतींकडून सर्वाधिक पसंती ही महाराष्ट्राला असायची. गेल्या 35 वर्षांच्या काळात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात घेतलेली उडी, यासाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि त्याकरता आकारण्यात आलेले करांचे दर याची उत्तम मांडणी या आधारे महाराष्ट्र हे उद्योगाच्या क्षेत्रातील देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं. अगदी केंद्रातल्या मोदी सरकारने राज्यातील उद्योगांचा फडशा पाडण्याचं ठरवूनही महाराष्ट्राचं महत्व कमी झालं नाही. याला पूर्वजांच्या कर्तुत्वाची जोड हे एकमेव कारण आहे. सरकार कोणाचंही असलं राज्याने उद्योग प्रगतीचा आलेख कधी खाली आणला नाही. उद्योगांचं क्षेत्र असं फोफावत असताना राज्यातल्या राजकारण्यांनीही सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आलेख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्याने अनेक वर्षाची संगमनेरकर नागरीकांची इच्छा पूर्ण होणार असून स्मारकाच्या उभारणीबाबत पालकमंत्र्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून जागेबाबतचा निर्णय केला जाणार असल्याची माहीती अमोल खताळ पाटील यांनी दिली. संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या मागणीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्याकरीता निधीची उपलब्धता करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी संगमनेरमधून गणेश बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक व्यापक जगजागृतीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी व सक्षम अंमलबजावणी करण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित विभागांशी समन्वय करून स्थानिक पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. समितीचा कालावधी दोन वर्षांसाठी असेल. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या दोन प्रतिनिधींची निवड केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पदावर बोऱ्हाडे यांची एकमेव निवड केली आहे. बोऱ्हाडे यांच्याशिवाय या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिले आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरातच व्हावा, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा व भव्य दिव्य शहीद स्मारक बस स्थानक परिसरात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व तालुक्यांमध्ये शिवस्मारक बांधण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. याचे स्वागत करत तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरात व्हावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पालकमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शुक्रवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानकाच्यासमोर ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींचा जागर करत त्यांच्या प्रतिमेस शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी दिवंगत ठाकरे यांच्या आठवणींना पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला. अभिवादन कार्यक्रमावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, दिव्यांग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख योगेश बिचकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शिव आरोग्य सेनेचे शिर्डी लोकसभा प्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, युवा सेना शहर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील दुय्यम कारागृहातील गज कापून आश्चर्यकारकरीत्या पलायन करणाऱ्या चौघाही आरोपींना पुन्हा पकडल्यानंतर त्यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पळून जाणाऱ्या चारही आपल्या घरी जेवणाचा पाहुणचार देणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी मालेगावमधून अटक केली आहे. यामुळे चार मुख्य आरोपींसह आता अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रिजवान मोहम्मद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला असे या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महसुल विभागातील प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या नऊ वाहनांचे अहमदनगर व कर्जतच्या प्रांत अधिकाऱ्यांसह पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड व राहुरीच्या तहसीलदारांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी केली आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रभावळकर यांच्यासह सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशभरात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतातच संगमनेरात मात्र हे कायदेशीर कत्तलखान्यांमधून जनावरांची अमानुष कत्तल सुरूच असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी शहरातील अलकानगर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करत ऐंशी हजार रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले. बुधवारी रात्री पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे हे दोघेजण पेट्रोलिंग करत असताना साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांना अलका नगर मध्ये सुरू असलेल्या रेहान गुलाम नबी कुरेशी व त्याच्यासोबत आणखी दोघे अवैधपणे गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करत असल्याची माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज धांदरफळ बुद्रुक येथील ५०० गरीब व कुटुंबीयांना दीपावलीचा फराळ व भाऊबीज निमित्त साड्यांचे वाटप करत या कुटुंबीयांचा दीपावली सण आनंदी व गोड करण्यात आला. या कुटुंबीयांसमवेत व बालगोपाळांसोबत फटाके फोडत दिवाळी साजरी करत संगमनेरमधील स्वदेश सेवाभावी सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी यावर्षीही जोपासली. वाढती महागाई समवेत शेतीतील कमी होत असलेले उत्पन्न, या अनुषंगाने निर्माण होणारे ग्रामीण भागातील अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्यांची दिवाळी आर्थिक अडचणीची ठरत असते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षापासून स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांच्या माध्यमातून धांदरफळ गावातील हिंदू-मुस्लिम समाजातील गरीब, होतकरू, विधवा, अपंग, निराधार अश्या ५०० परिवारात दीपावलीनिमित्त फराळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील एकत्र आलेल्या “जिगरी मित्र परिवारातील” युवक मित्रांनी यावर्षीची आपली दिवाळी अकोल्यातील राजुर-भंडारदरा रस्त्यावरील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरी केली. उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी निमित्त फराळाचे विविध पदार्थ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘केअर किट’ भेट म्हणून देण्यात आली. इथे असणाऱ्या आजी-आजोबांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करण्याची आणि भेटवस्तू देण्याची प्रथा ह्या मित्रांनी सुरु केली. दिवाळी म्हणजे आनंद व उत्साहाचा सण, आनंद हा खऱ्या अर्थाने वाटल्याने द्विगुणित होतो, या भावनेने समाजातील एका दुर्लक्षित घटकासोबत आनंदाचे काही क्षण वाटण्यासाठी ह्या वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याची संकल्पना असल्याचे प्रथमेश बेल्हेकर यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी देशमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दीपावलीची धामधूम सुरू असतानाच भाऊबीजेच्या दिवशी पोलीस शिपायाने स्वतःवर रायफलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल शिरसट (वय 35 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून आत्महत्येचे निश्चित कारण लगेच समजू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील केशवनगर पोलीस वसाहतीत ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले राहुल शिरसाट हे पोलीस आयुक्त बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सुरक्षेसाठी शिरसट यांच्याकडे एसआरएल रायफल होती. ड्युटी संपल्यावर ते आपल्याकडील रायफल जमा करत असत. बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी आपल्याकडील रायफल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या कुरकुटवाडी येथे २७ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री तरुणाच्या झालेल्या मृत्यूची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा तर्क अखेर खोटा ठरला. पोलीस तपासात मित्रानेच त्याच्या मैत्रिणीला पाठविलेल्या समाज माध्यमातील फ्रेंड रिक्वेस्टच्या कारणावरून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून गणेश बबन कुरकुटे (वय २१ वर्ष, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने या खुनाची कबुली दिली असल्याचे संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आयोजित व गुरुमाऊली सदिच्छा महिला आघाडीतर्फे सुरेल सुमधुर भावगीताने सोमवारची (दि. १४ नोव्हेंबर) दिवाळी पाडवा पहाट ऑनलाइन झूमव्दारे सुमधुर गीतांनी रंगली. शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या संकल्पनेतून महिला शिक्षक भगिनींसाठी दीपावली पहाट पाडवा या कार्यक्रमाचे झूम मीटिंगद्वारे आयोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव व जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुषमा वाळुंज यांच्या सुमधुर गणेश स्तवनाने या दिवाळी पाडवा पहाटेची सुरुवात करण्यात आली. या पहाट गाण्यांसाठी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, गुरुमाऊली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुणा -अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणण्याचा आरोप करत मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार निवडून दिल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दिले. केंद्रीय मंत्री अमित शहा सोमवारी मध्यप्रदेशच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. ते गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. शहा म्हणाले, तीन डिसेंबरला भाजपचे सरकार आणा. तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा सर्व खर्च भाजप सरकार करेल. साडेपाचशे वर्षांपासून रामलल्ला अपमानित अवस्थेत होते. काँग्रेस सत्तर वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत आणि विलंब करत होते. काँग्रेसने राम मंदिराचे बांधकामही रोखण्याचा आरोप केला आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले -उत्तर नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अकोलेचे भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा कार्यकारणी घोषित केली. यात जिल्हाध्यक्ष पदानंतरच्या महत्त्वाच्या पदावर भांगरे यांची निवड करण्यात आली. भांगरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असून अकोले तालुक्यात भारतीय जनता पार्टीची स्थापना त्यांनी केली आहे. भाजपा तालुका अध्यक्ष, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजप युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप प्रदेश परिषद सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले असून गेली नऊ वर्षापासून ते पुन्हा भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात स्थानिक स्वराज्य…

Read More