Author: अनंत पांगारकर
बुधवार, २० नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते माध्यमांसमोर जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बेफामपणे खोटे आरोप करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या या कट कारस्थानाची आणि कपटनितीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही. भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील सुज्ञ जनता आज मतदानातून सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव…
बुधवार, २० नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघ बुधवारी झालेल्या मतदानात सरासरी ७४.५८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. अंतिम आकडेवारी येण्यास उशीर लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी काही मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात सलगपणे नवव्यांदा निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातून नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते. मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली नाही तसेच जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्यानंतर या जागेवर विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. या…
अहिल्यानगर – अनंत पांगारकर बुधवारी झालेल्या मतदानात नगर जिल्ह्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे आदी प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. २३ नोव्हेंबरला एकाच वेळी सर्व मतदारसंघात मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्याबरोबरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. तर आठ मतदारसंघात…
बुधवार २० नोव्हेंबर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने वीस वर्षं सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. रुझान समीर पठाण (वय २०, रा. जुना ओठा रोड, नाशिकरोड नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र विठोबा देवरे (२४) व रोशन नरेश कोमरे (१९) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०९ चे न्यायाधीश व्ही. एस. मलकापट्टे-रेड्डी यांनी सोमवारी या संदर्भातील निर्णय दिला. २७ मे २०२१ रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या नाशिकरोड येथील बिटको…
बुधवार २० नोव्हेंबर श्रीरामपूर – शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच अहिल्या नगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन परतत असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. कांबळे यांचे वाहन भरधाव वेगात असल्याने आणि हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने झाडलेल्या गोळ्या त्यांच्या वाहनाजवळून हवेत निघून गेल्या. या संदर्भात मंगळवारी रात्री कांबळे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी १९ नोव्हेंबर मध्यरात्री गोळीबाराचा हा प्रकार अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे…
बुधवार २० नोव्हेंबर मंगळवारी (ता. १९ नोव्हेंबर) भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजपा आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. विरारमध्ये घडलेल्या पैसे वाटपाच्या राजकीय नाट्याविषयी बोलताना थोरात म्हणाले की, निःपक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील…
विशेष प्रतिनिधी मुंबई – १९ नोव्हेंबर सत्यवचनाच्या आणि सुचिर्भुततेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पाय आणखी खोलात गेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रांगेहाथ पकडलं. तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही माहिती भाजपच्याच एका नेत्याने आपल्याला दिल्याचा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यामुळे भाजपची देशभर नाचक्की झाली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामे सुरु केले आहेत. बटेंगे तो कटेंगेच्या संकटाची तलवार समोर दिसत असताना अचानक हे प्रकरण पुढे आल्याने भाजपची बोलती बंद झाली आहे. विनोद तावडे हे…
पुणे: कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. आरोपींकडून तीन पिस्तुले आणि तीन कोयते जप्त करण्यात आले होते. तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी हा निकाल दिला. दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाशसिंग चंदनसिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हे महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. प्रकाश चव्हाण…
नाशिक – १९ नोव्हेंबर नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असून यामध्ये तब्बल पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. एका नेत्यालाही वाहनासोबत ताब्यात घेतलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची राज्यभर करडी नजर आहे. गस्तही वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आज नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मारला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी एका राजकीय नेत्याकडे ५ कोटीची रोकड आढळून आली. अधिकाऱ्यांनी लागलीच त्या नेत्याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतलं. दरम्यान त्याच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली कुठे घेऊन…
अहिल्यानगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागी महाविकास आघाडी निवडून येणार ३५ वर्ष सत्ता असून राहत्याचा विकास का नाही? एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान देऊ नये ते का स्वीकारले नाही? काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते शिर्डीच्या हॉस्पिटलला कोण अडथळे आणतय मंगळवार १९ नोव्हेंबर संगमनेर – आचारसंहिता काळातही जिल्हा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून एकतर्फीपणे वागत आहे. राजकारणासाठी जनतेच्या प्रश्नांची कोणी खेळू नये असे सांगत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तीन तक्रारी केल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष…
