Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – शेवगाव येथील आडत व्यापारी व त्यांच्या भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, खुनासह जबरी चोरी, चोरीच्या उद्देशाने खून करणे अशा स्वरूपाच्या सात गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. खेडकर टाबर चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेवगावमधील मारवाड गल्लीतील आडत व्यापारी गोपीकिसन गंगाबिसन बलदवा यांच्यासह त्यांच्या भावजयी पुष्पा हरिकिसन बलदवा यांची हत्या करून 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरुन नेण्यात आली होती. यासंदर्भात सुनिता गोपीकिसन बलदवा यांनी दिलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्याने राज्यात पसरू पाहणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाची वाट धरली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांनी पक्षप्रवेशाचा मुहूर्त निवडला आहे. भालकेंच्या बीआरएस प्रवेशामुळे या भागात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर येथील कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येणार आहेत. यावेळी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भालके त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र,…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवारी मध्यरात्री सालीमठ यांच्या मोबाईलवर आलेल्या आपत्कालीन फोनची दखल घेत पुढील सूत्रे फिरल्याने हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली. आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. शनिवारी (दि. 24 जून) अहमदनगर जिल्ह्यातील भातोडे या गावचे वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते, थोर स्वातंत्र्य सेनानी एस. एम. जोशी यांचे अनुयायी असलेले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते साथी विनायक माळवे यांची जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष साथी नाथाभाऊ शेवाळे यांनी साथी माळवे यांना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर नियुक्तीपत्र दिले. समाजवादी विचारांचा वडिलोपार्जित वारसा असलेले साथी विनायक माळवे आजही जनतेच्या प्रश्नाबाबत पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. माळवे यांनी पुणे जिल्ह्यात असताना जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. धरणग्रस्त, आदिवासी बांधवांचे प्रश्न, बेकारी, महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यासाठी तत्कालीन समाजवादी नेते साथी भाई वैद्य, श्रमिक नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. बापूसाहेब काळदाते, स्वातंत्र्य सैनिक…
रविवार विशेष | प्रवीण पुरो आपलं बस्तान डळमळीत झाल्याचं दिसू लागताच राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांकडून निवडणूकपूर्व सर्व्हे करून घेण्याचा सपाटा सुरू आहे. विरोधकांना फारसं स्थान न देणार्या या सर्व्हेत सत्तेतले पक्षच एकमेकांवर शिरजोरी करत आहेत. भाजप आणि शिंदेंची शिवसेना आपलंच घोडं या सर्व्हेतून दामटण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेबरोबरच मुख्यमंत्री पदाच्या बोलीलाही सर्व्हेत स्थान असल्याने हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील जनतेला वेडे समजत असावेत, असं दिसू लागलंय. गेल्या आठवड्यात सर्व्हेतून आलेले अनुमान म्हणजे लोकांची करमणूक बनली आहे. आजकाल सर्व्हे करून घेण्याची फॅशन झाली आहे. आपण किती शहाणे आहोत हे दाखवून देण्यासाठी कर्तुत्वाची आवश्यकता नाही. असे सर्व्हे करून घेतले की काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनधिकृत वीज चोरून वापरल्या प्रकरणी दिलेल्या वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या पठार भागातील दोघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता समाधान घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवे बुद्रुक येथील शशिकांत धोंडीबा कुटे आणि बिरेवाडी येथील बाळासाहेब पांडुरंग क्षीरसागर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात घुगे यांनी दिलेल्या तक्रार म्हटले आहे की, 8 मे 2023 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते आणि बाह्यश्रोत कर्मचारी के. के. गाडेकर वरिष्ठ तंत्रज्ञ डी. एस. शेळके यांच्या समवेत कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित…
महाराष्ट्र संवाद न्यूज आत्महत्या करण्याच्या विचारात तो बियर बारमध्ये बियर पिण्यासाठी आला, त्याने बियर मागविली, अर्धी बियर पिला आणि उरलेली अर्धवट सोडून निघून गेला. नेमकं याचवेळी कोणी बघत नाही ही संधी साधून वेटरने ती अर्धी बियर फस्त केली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. प्रत्येकाचा मृत्यू विधीलिखित आहे. कोण किती वर्ष जगणार आणि केव्हा व कसा मारणार याची कोणीच कल्पना करू शकत नाही. बऱ्याचदा मनुष्य मृत्यूच्या दारातून परत आल्याची तर अनेकांना अनपेक्षितरित्या मृत्यूने गाठल्याची उदाहरणे आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजरू शहरात समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राजरू मधील सोमनाथपूर मटन मार्केट बाजूला असलेल्या एका बियर बारमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्या प्रवेश परीक्षेत संगमनेरची सानीया प्रफुल्ल खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे. जेईई ‘मेन’ आणि ‘एडव्हांस’ अशा दोन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्या या परीक्षेत देशभरातील बारा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात सानियाने 1244 वे मानांकन प्राप्त करीत संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर नोंदविले आहे. सानीया मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासात एकाग्र असलेल्या सानीयाचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झाले आहे. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत 99 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून तिने आपल्यातील गुणवत्तेची चुणूकही…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सेतूचे दाखले देण्याचा सर्व्हरमध्ये अडथळे असल्याने ईडब्लूएस विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. कोंढरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशाच्या दाखल्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस फिफो यंत्रणा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमाने निकाली काढावेत यासाठी निर्देश दिले होते. त्यामुळे प्रश्न सुटला असे वाटत असताना आता सर्व्हर बंद पडल्याने दाखले देण्याची प्रक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जूनला सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चाच्यावेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्चाच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुदर्शन चॅनलचे संपादक व भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश मनोहर सूर्यवंशी व विशाल भगवान वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर परवानगी…
महाराष्ट्र संवाद न्यूज विविध गुन्ह्यांच्या तपासाकामी जप्त करण्यात आलेल्या आणि पोलिसांच्या रखवालीत असलेल्या दुचाकींची आता चोरी होऊ लागले आहे. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याच्या तपासाकामे जप्त करण्यात आलेली वाहने ही पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाच्या आवारात लावली जातात. ज्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा अपुरे असल्याने ही वाहने शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या आवारामध्ये लावली जातात. तसेच काही दुचाकी वाहने ना दुरुस्त असलेल्या खोलीच्या वाड्यामध्ये लावण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या आठ वर्षापासून गणेश कारखान्याची प्रगती थांबल्याने ऊस उत्पादकांचे हाल होत होते. गणेश साखर कारखाना हा राहाता तालुक्याची कामधेनू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर हा कारखाना संगमनेर व संजीवनीप्रमाणे चालवून नवे संचालक मंडळ गणेशला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला गणेश कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे संचालक ॲड .नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी आनंद हासे, सेक्रेटरीपदी मधुसुदन करवा तर डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. क्लबच्या सन २०२३-२४ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये अमित पवार, महेश वाकचौरे, ऋषिकेश मोंढे, दिपक मणियार, डॉ. प्रमोद राजुस्कर, ओंकार सोमाणी, सुनिल कडलग, संजय लाहोटी, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, प्रमोद मणियार, दिलीप मालपाणी, भुषण नावंदर, मयुर मेहता, अजित काकडे, संजय राठी, मोहित मंडलिक, पवनकुमार वर्मा, रविंद्र पवार, सौरभ म्हाळस, विश्वनाथ मालाणी, डॉ. किशोर पोखरकर, नरेंद्र चांडक, योगेश गाडे, संदिप फटांगरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शेवगावमधील (अहमदनगर) बालाजी मंदिरासमोर असलेल्या भर वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन बलदवा कुटुंबीयांच्या घरावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पाताई आणि चुलते गोपीकिशन बलदवा यांचा मृत्यू झाला असून चुलती सुनिता यांना दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला देखील मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी किमती ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. दोघांचे मृतदेह…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुरुवारी येणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरे व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस रेकॉर्डवरील 71 जणांना गुरुवारपासून आठ दिवसांसाठी संगमनेर अकोले तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रवेश बंदी केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गुरुवार (ता.22 जून) ते शुक्रवार (ता. 30 जून) पर्यंत या सर्वांना संगमनेर-अकोले तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या 71 जणांवर सीआरपीसी कलम 144(2) अंतर्गत संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने हटविली जात असून ही मोहीम थांबविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. एका वादाच्या घटनेचा सूड म्हणून लघु व्यावसायिक, भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, टपरीधारक, स्टॉल धारक, धान्य विक्रेते, शेतकरी यांच्या विरोधात होत असलेल्या या अन्यायकारक मोहिमेबद्दल शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात गुरुवारी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेमुळे या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षापेक्षा जास्त काळ सर्व व्यवसाय ठप्प…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री करावी. खरेदीवेळी पक्के बील बियाण्यांची पिशवी व बियाण्यांचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असेल. महसूलमंत्री विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत सूतोवाच केले होते. याबाबत त्यांनी व्यक्तीश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. वारीत एखाद्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग पाच वर्ष या मुलीला धमकावत, घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, ब्लॅकमेलिंग करून हा प्रकार घडला आहे. विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरोधात एकोणवीस वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376, 376(2), (I,N), 506 कलमान्वये व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कोपरगावच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहे. संशयित आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झालेल्या दर्शनाचा मृतदेह काटवणामध्ये आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस तपासात ती मित्र राहुल हंडोरे यांच्यासोबत राजगडावर गेली होती. मात्र काही वेळानंतर राहुल हंडोरे हा एकटाच गडावरून खाली आल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर तो गायब झाल्याने या हत्याप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई राहुलच्या दिशेने…
