Author: Annant Ppangarkar

मंगळवार दि. ९ एप्रिल  पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ लाखापेक्षा अधिक तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बजावले आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांना न्यायासाठी राष्ट्रीय हरित…

Read More

मंगळवार दि. ९ एप्रिल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार राज्यभरातील ६०० हून अधिक न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. यात संगमनेरमधील चार न्यायाधीशांचा समावेश आहे. एस. यु. महादार (मालेगाव, नाशिक), श्रीमती एस. एम. वाघमारे (को-ऑपरेटिव कोर्ट, सातारा), एम. एम. गांगुर्डे (साक्री, धुळे) व पी. डी. देवरे (कारंजा, वाशिम) यांचा बदली झालेल्या न्यायाधीशात समावेश आहे. तर कोल्हापूर येथून श्रीमती व्ही. पी. गायकवाड, फलटण (सातारा) येथून श्रीमती एस. बी. ढवळे व कराड (सातारा) श्रीमती यु. डी. जाधव हे न्यायाधीश संगमनेर न्यायालयात बदलून येत आहे. उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात…

Read More

मंगळवार दि. ९ एप्रिल मंगळवारी शिवालयात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट २१ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष १७ लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० लोकसभा मतदार संघातील जागा लढणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत एकत्रितपणे करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह काही लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read More

मंगळवार दि. ९ एप्रिल  जवळ हत्यार बाळगल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोघाजणांना पकडले. हत्यारे कुठून, कशी आली याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि या चौकशीतून वेगळाच उलगडा झाला. प्रेम संबंधात अडथळा ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा तीन वर्षांपूर्वी खून करून फरार असलेले आरोपी पोलिसांच्या हाती सापडले. वसईच्या पेल्हार पोलिसांनी ३ एप्रिलला बेकायदा हत्यारे बाळगल्याप्रकरणी पोखरण परण साव (वय ५० वर्ष, रा. नालासोपारा) व अब्दुल मुबारकअली शहा उर्फ बड्डा (वय २३ वर्ष) या दोघा रिक्षा चालकांना अटक केली होती. त्यांच्याकडे सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आणि तपासात या दोघांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या हत्येचा उलगडा झाला. पोखन साव याचे नायगाव येथे राहणार्‍या महिलेशी…

Read More

सोमवार दि. ८ एप्रिल, मुंबई  महाविकास आघाडीतील मित्र पक्षांबाबत जे बोलाल ते विचार करून बोला, मित्र पक्षातील नेत्यांची मन दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे. थोरात म्हणाले, मित्र पक्षातील कार्यकर्त्यांबाबत राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते योग्य नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. आघाडीत एकत्र काम करायच आहे. त्यामुळे राऊतांनी काळजीपूर्वक बोलायला हवं. सांगली, भिवंडी, मुंबईसह काही जागांसाठी आमचा आग्रह आजही काय आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, यासंदर्भात आजच निर्णय होईल. जागावाटपाच्या अंतिम निर्णयासाठी उद्या ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद होणार…

Read More

सोमवार दि. ८ एप्रिल येत्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा कधीही निवडणुका होणार नाही. देशाचे संविधान बदलेल. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण करतील. लडाख मणिपूर सारखी परिस्थिती देशभरात सर्वत्र उद्भवेल असे खळबळ जनक विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी केले आहे. परकला प्रभाकर यांचे हे विधान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले असून प्रभाकर यांनी एका यूट्यूब चैनल वरील मुलाखतीत हे विधान केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत असून १ मिनिट ४० सेकंदाच्या या व्हिडिओत नेमकं काय आहे. यासाठी काँग्रेसने हा व्हिडिओ…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल वडापाव खाण्याच्या बहाण्याने पत्नीने घरी बोलाविलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणीवर पत्नीच्या मदतीने पतीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज येथे ३ मार्च रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शनिवारी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीच्या पीडित तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह करत आरोपी महिलेने आपल्या घरी बोलावलं होतं. आग्रहाने बोलविल्याने पीडित तरुणी या महिलेच्या घरी गेली होती. थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने आरोपी महिला घराबाहेर गेली. घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने घराची कडी बाहेरून लावून घेतली होती. पत्नी घराबाहेर…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल  ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण, संवर्धन व ग्राहकांच्या समस्याचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेवर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहे. अशासकीय सदस्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटक विलास जगदाळे, जिल्हा अध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, दिनेश थोरात, प्राचार्य शाहुराव औटी, प्रा. अमिता रानु, अशोक शेवाळे, रणजीत श्रीगोड, सुनील रूणवाल, उमा मेहत्रे, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, संतोष भुसारी, सुनील दळवी, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर, रबाजी सुळ व सुधीर भापकर यांचा…

Read More

रविवार दि. ७ एप्रिल पोलीस आणि संबंधितांशी असलेल्या मधुर संबंधामुळे संगमनेरात अवैध धंदे आता चोरून लपून नव्हे तर थेट उघड्यावर मोकळ्या मैदानात चालू असल्याचे समोर आले आहे. गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नेहमीप्रमाणे कारवाईदरम्यान महिला आरोपी पसार झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे हनुमान नगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह गावठी दारू बनविण्याचे साहित्य आणि रसायन जप्त केले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने ही गावठी दारू बनविण्याचे हातभट्टी उध्वस्त करून टाकली. ही कारवाई सुरू असताना…

Read More

प्रवीण पुरो विश्‍वगुरू व्हायला निघालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर भारत देशाचे नवे अवतार निघाले. स्वत:मागे असंख्य उपाध्या लावणार्‍या मोदींना त्यांच्या समर्थकांनी इतकं चढवलं की ज्याचं नाव ते. हजार पापं करूनही एखाद्याला साव मानलं जातं तेव्हा पापं करणारा सुटतो. खोटं बोलतो. होत्याचं नव्हतं करतो. मोदींचं तसंच झालंय. सत्ता मिळाल्यापासून हे विश्‍वगुरू देशाचे कर्दनकाळ ठरू लागले आहेत. ना खाऊंगा, ना खाने दुंगा! या पंक्तींचा पुरेपूर वापर करत स्वत:ला स्वच्छ छबीची उपमा देणार्‍या मोदींनी स्वत: खाल्लं नाही, असं कोणीही सांगत असेल तर त्याला तपासावं लागेल. या देण्या-घेण्यापासून मोदींनी स्वत:ला असं दूर ठेवलं की कोणीही त्यांच्यावर पापभिरू म्हणून विश्‍वास ठेवावा. प्रत्यक्षात मात्र त्यांनी…

Read More

शनिवार दिनांक ६ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी मी इच्छुक होतो. मात्र माझ्या उमेदवारीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विरोध केल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला. शिर्डीच्या जागे संदर्भात आठवले म्हणाले, मी शिर्डीतून लढण्यास तयार होतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा दाखला देत भाजपने शिवसेनेच्या (शिंदे गट) अनेक नेत्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी द्यावी, याच्या सूचना भाजप नेतृत्वाने त्यांना केल्या. निवडणूक जिंकू शकणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी हा प्रमुख…

Read More

शनिवार दि. ६ एप्रिल, अहमदनगर  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, मात्र बदल्या होऊन देखील वर्षभराचा कालावधी उलटूनही या कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अद्यापही कार्यमुक्त न केल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत. अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती. शेख यांनी केलेली तक्रार गंभीर स्वरूपाचे असल्याने यासंदर्भात नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. बदली होऊन देखील या सतरा कर्मचाऱ्यांना पुन्हा स्थानिक गुन्हे…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल, अहमदनगर  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून पकडलेला ७३ लाख २४ हजार ५०० रुपयांपैकी ६९ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या रकमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे ही रक्कम सोपविण्यात आली तर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपयांसंदर्भात योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने हे रक्कम बोल्हेगाव (नगर) येथील संबंधित व्यक्ती विजय कृष्णा भगत यांना सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. यादरम्यान नगरच्या स्थानिक…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल लोकसभा निवडणुक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश दिले आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजेच ११ ते १३ मे या कालावधीत व मतमोजणीच्या दिवशी ४ जूनला पूर्ण दिवस कोरडा पाळण्याचा आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्याच्या सीमेसह लगतच्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहे.…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मनसे भाजप युती होऊ शकते ही चर्चा अद्यापही कायम आहे. मात्र अद्यापही त्यासंदर्भात निर्णय होताना दिसत नाही. ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर नेमकं “काय घडलंय आणि काय घडतय” याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या व मनसेच्या एक्स (X) हँडलवरून मनसैनिकांना साद घातली आहे. येत्या नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी दादर मधील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या…

Read More

शुक्रवार दि. ५ एप्रिल आदिवासी कुटुंबातील १ वर्षाच्या चिमुरडीचे झोपेत झोळीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अहमदनगरच्या अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी सुनील मेंगाळ असे अपहरण झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. आदिवासी समाजातील शेतमजूर असलेले सुनील मेंगाळ हे आपल्या कुटुंबीयांसह बेलापूर (ता. अकोले) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण उरकल्यानंतर त्यांच्या पत्नीने चिमुरड्या वैष्णवीस दूध पाजल्यानंतर घरात बांधलेल्या झोळीत तिला झोपविले होते. त्यानंतर मेंगाळ दांपत्यही झोपी गेले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या सुनील मेंगाळ यांना झोळीमध्ये वैष्णवी झोपलेली असल्याचे दिसून आले. तर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वैष्णवीला…

Read More

गुरुवार दि. ४ एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आले यात आणखी दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून मेटे यांच्या ऐवजी बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेटे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र पवार यांच्या भेटीनंतर लगेचच…

Read More

गुरुवार दि. ४ एप्रिल दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व…

Read More

गुरूवार दि. ४ एप्रिल भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत असतात. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा बंद पडतात. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप करण्यात आलेल्या २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील तिघांना तर पूर्णतः क्लीन चिट मिळाली तर २० जणांच्या चौकशा थांबल्या आहेत. पार्टी विथ डिफरन्स, न खाऊंगा न खाणे दूंगा! या भाजपाच्या भूमिकेचा बुरखा यामुळे फाटला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने भाजप प्रवेशानंतर स्वच्छ झालेल्या नेत्यांसंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात देखील गेले. यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या विरोधी…

Read More

मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे. अंबादास शांताराम शिंदे, (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून…

Read More