Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज आत्महत्या करण्याच्या विचारात तो बियर बारमध्ये बियर पिण्यासाठी आला, त्याने बियर मागविली, अर्धी बियर पिला आणि उरलेली अर्धवट सोडून निघून गेला. नेमकं याचवेळी कोणी बघत नाही ही संधी साधून वेटरने ती अर्धी बियर फस्त केली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. प्रत्येकाचा मृत्यू विधीलिखित आहे. कोण किती वर्ष जगणार आणि केव्हा व कसा मारणार याची कोणीच कल्पना करू शकत नाही. बऱ्याचदा मनुष्य मृत्यूच्या दारातून परत आल्याची तर अनेकांना अनपेक्षितरित्या मृत्यूने गाठल्याची उदाहरणे आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजरू शहरात समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राजरू मधील सोमनाथपूर मटन मार्केट बाजूला असलेल्या एका बियर बारमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्या प्रवेश परीक्षेत संगमनेरची सानीया प्रफुल्ल खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे. जेईई ‘मेन’ आणि ‘एडव्हांस’ अशा दोन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्या या परीक्षेत देशभरातील बारा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात सानियाने 1244 वे मानांकन प्राप्त करीत संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर नोंदविले आहे. सानीया मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासात एकाग्र असलेल्या सानीयाचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झाले आहे. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत 99 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून तिने आपल्यातील गुणवत्तेची चुणूकही…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सेतूचे दाखले देण्याचा सर्व्हरमध्ये अडथळे असल्याने ईडब्लूएस विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. कोंढरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशाच्या दाखल्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस फिफो यंत्रणा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमाने निकाली काढावेत यासाठी निर्देश दिले होते. त्यामुळे प्रश्न सुटला असे वाटत असताना आता सर्व्हर बंद पडल्याने दाखले देण्याची प्रक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जूनला सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चाच्यावेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्चाच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुदर्शन चॅनलचे संपादक व भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश मनोहर सूर्यवंशी व विशाल भगवान वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर परवानगी…
महाराष्ट्र संवाद न्यूज विविध गुन्ह्यांच्या तपासाकामी जप्त करण्यात आलेल्या आणि पोलिसांच्या रखवालीत असलेल्या दुचाकींची आता चोरी होऊ लागले आहे. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याच्या तपासाकामे जप्त करण्यात आलेली वाहने ही पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाच्या आवारात लावली जातात. ज्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा अपुरे असल्याने ही वाहने शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या आवारामध्ये लावली जातात. तसेच काही दुचाकी वाहने ना दुरुस्त असलेल्या खोलीच्या वाड्यामध्ये लावण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या आठ वर्षापासून गणेश कारखान्याची प्रगती थांबल्याने ऊस उत्पादकांचे हाल होत होते. गणेश साखर कारखाना हा राहाता तालुक्याची कामधेनू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर हा कारखाना संगमनेर व संजीवनीप्रमाणे चालवून नवे संचालक मंडळ गणेशला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला गणेश कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे संचालक ॲड .नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी आनंद हासे, सेक्रेटरीपदी मधुसुदन करवा तर डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. क्लबच्या सन २०२३-२४ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये अमित पवार, महेश वाकचौरे, ऋषिकेश मोंढे, दिपक मणियार, डॉ. प्रमोद राजुस्कर, ओंकार सोमाणी, सुनिल कडलग, संजय लाहोटी, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, प्रमोद मणियार, दिलीप मालपाणी, भुषण नावंदर, मयुर मेहता, अजित काकडे, संजय राठी, मोहित मंडलिक, पवनकुमार वर्मा, रविंद्र पवार, सौरभ म्हाळस, विश्वनाथ मालाणी, डॉ. किशोर पोखरकर, नरेंद्र चांडक, योगेश गाडे, संदिप फटांगरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शेवगावमधील (अहमदनगर) बालाजी मंदिरासमोर असलेल्या भर वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन बलदवा कुटुंबीयांच्या घरावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पाताई आणि चुलते गोपीकिशन बलदवा यांचा मृत्यू झाला असून चुलती सुनिता यांना दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला देखील मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी किमती ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. दोघांचे मृतदेह…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुरुवारी येणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरे व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस रेकॉर्डवरील 71 जणांना गुरुवारपासून आठ दिवसांसाठी संगमनेर अकोले तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रवेश बंदी केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गुरुवार (ता.22 जून) ते शुक्रवार (ता. 30 जून) पर्यंत या सर्वांना संगमनेर-अकोले तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या 71 जणांवर सीआरपीसी कलम 144(2) अंतर्गत संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने हटविली जात असून ही मोहीम थांबविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. एका वादाच्या घटनेचा सूड म्हणून लघु व्यावसायिक, भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, टपरीधारक, स्टॉल धारक, धान्य विक्रेते, शेतकरी यांच्या विरोधात होत असलेल्या या अन्यायकारक मोहिमेबद्दल शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात गुरुवारी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेमुळे या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षापेक्षा जास्त काळ सर्व व्यवसाय ठप्प…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री करावी. खरेदीवेळी पक्के बील बियाण्यांची पिशवी व बियाण्यांचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असेल. महसूलमंत्री विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनाच्या आढावा बैठकीत वारकरी बांधवांना विमा योजना लागू करण्याबाबत सूतोवाच केले होते. याबाबत त्यांनी व्यक्तीश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. वारीत एखाद्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग पाच वर्ष या मुलीला धमकावत, घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, ब्लॅकमेलिंग करून हा प्रकार घडला आहे. विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरोधात एकोणवीस वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376, 376(2), (I,N), 506 कलमान्वये व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कोपरगावच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहे. संशयित आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झालेल्या दर्शनाचा मृतदेह काटवणामध्ये आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस तपासात ती मित्र राहुल हंडोरे यांच्यासोबत राजगडावर गेली होती. मात्र काही वेळानंतर राहुल हंडोरे हा एकटाच गडावरून खाली आल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर तो गायब झाल्याने या हत्याप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई राहुलच्या दिशेने…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – तक्रारदाराच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा लाचखोर पोलीस हवालदार चार हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे (नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. अहमदनगर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराने एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार त्याची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात 1 जून 2023 रोजी गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये 12 जून रोजी लाचखोर आरोपी…
समनापुर येथे दूध संघाच्या मेडिकल शुभारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादित होत असून साखर कारखाना व दूध संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. संगमनेर तालुक्याचा विकास व प्रगतीमुळे राज्यात सन्मान होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. समनापुर येथे दूध संघाच्यावतीने ‘राजहंस मेडिकल’च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक विलास वर्पे, संतोष मांडेकर, डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ जोंधळे, सरपंच कमलताई बर्डे, भास्कर शरमाळे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, वाळू व्यवसायातून सुरु असलेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात सेवा, समर्पण आणि गरीबाच्या कल्याणासाठी काम झाल्याने भारत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. सर्व समाजाचा विकास आणि उन्नती करण्याचे स्वप्न केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार साकारीत आहे. सरकारची नऊ वर्षातील ही कामगिरी सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन हिमाचल प्रदेशचे प्रभारी तथा चंदिगड प्रदेश अध्यक्ष संजय टंडन यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल @9 अभियानांतर्गत शिर्डीमध्ये ‘सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टंडन बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या व विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या मनात स्थान निर्माण करणार्या राजस्थान युवक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक मनीष मालपाणी यांची फेरनिवड करण्यात आली. तर मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सम्राट भंडारी, उपाध्यक्षपदी सुदर्शन नावंदर, खजिनदारपदी व्यंकटेश लाहोटी, सहखजिनदार आदित्य मालपाणी, सचिवपदी ओंकार इंदाणी व सहसचिवपदी आनंद लाहोटी यांच्या नावावर एकमत झाले. संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला विस्तृत करणारा, राज्यात नावारुपाला आलेला संगमनेर फेस्टिव्हल, शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी डास निर्मुलन मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, हायटेक पद्धतीचा अवलंब करुन दरवर्षी होणारेे माहेश्वरी वधु-वर परिचय संम्मेलन अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळाने शहराच्या सामाजिक क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. आगामी काळात येऊ घातलेले सण, उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रित रित्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव आश्वी अकोले आणि राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी…
