Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा अद्भुत विक्रम येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्या उपस्थितीत समारंभ: रविवारी (दि. २४ सप्टेंबर) मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी झालेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखाताई पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या. येथील स्पर्धकांचा सहभाग: या स्पर्धेत अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असून मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथिल बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता. सायंकाळी अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. यांचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहणाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिप्रीं – लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवारी (26 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांनी चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, शैक्षणिक दृष्ट्या अन्यायकारक ठरणारा हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी छात्रभारतीच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. हा निर्णय मागे घेतला जावा, यासाठी छात्र भारतीच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या. शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवा. राज्यातील सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय गोरगरीब, आदिवासी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपविणारा आहे. सरकारच्या या एका निर्णयामुळे राज्यातील जवळपास 14 हजार पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहे. तर 65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालविण्यास दिल्या जातील. या निर्णयामुळे लाखावर शाळांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे…
संगमनेरकर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारा माणूस सापडण्यासाठी भाग्य लागतं. असा माणूस प्रत्येकालाच भेटेल असेही नाही; आणि भेटलाच तर तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचाही भरवसा नसतो. परंतु समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. त्यातील नात्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली तर ते तुटण्याचाही प्रश्न नसतो. असाच काहीसा संदेश देत रविवारी सादर झालेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप झाला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी,…
शाळा बंद करण्यापूर्वी स्थानिकांचा विचार घ्यावा शिक्षणाचा मूलभूत हक्काची पायमल्ली होऊ नये महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे गोरगरिबांची वाडी-वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मूलभूत शिक्षण हक्काची पायमल्ली होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विचार घेतला पाहिजे. सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. कमी पटसंख्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दिलेल्या प्रसिद्धी…
गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला : शिवाजीराव लहारे महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : स्वाभिमानी गणेश परिसरासाठी मंगळवारी (ता. २६ सप्टेंबर) घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सभा:…
न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते लक्ष महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या सहकारावर अविश्वासाचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सरकारी वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर फेटाळण्यात आला तर अन्य चौघांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी मंगळवारी मंजूर केला. तपास अधिकारी, ठेवीदारांच्या भूमिकेकडे लक्ष: गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुठे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर हरकत घेत युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे…
इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक रस्त्यावर लखलखाट होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवेचे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) सायंकाळी 5 वाजता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मार्गदर्शनातून इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा मॉडेल रस्ता तयार झाला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासह दुतर्फा पादचारी मार्ग आहेत. मध्यभागी डिव्हायडरसह विविध वृक्षांचे रोपण केले…
संगमनेर कारखाना देणार कार्यक्षेत्रातील ऊसाला 2835 रुपयांचा भाव महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सरकार गेलं आणि आपल्याला त्रास सुरू झाला. तालुक्यातील विकास काम बंद केले गेले. दहशत निर्माण करून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतीने येथील विकास थांबणार नाही. ते मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यांची उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्वास जपण्याचा संदेश देणार्या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय लोकशाहीचे चार खांब केव्हाच निखळले आहेत. अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेलच यावर जसा न्यायालयावर भरवसा राहिलेला नाही तसं प्रशासन मागणीप्रमाणे हलेल यावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही. सरकार मतलबी झाल्यावर शासनाकडूनही न्यायची अपेक्षा करण्यात अर्थ राहत नाही. एका स्तंभाकडून या अपेक्षा पूर्ण होतील, अशी धारणा होती त्या पत्रकारितेत घुसलेल्या अपप्रवृत्तीने लोकशाहीचे धिंडवडे उडवलेत. अखेरचं अस्त्र म्हणून लोकं माध्यमांकडे अपेक्षेने पाहत होती. पण काही अपवाद वगळता या माध्यमांची लेखणीही म्यान झालेली पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी आलंय. लोकशाहीची पावलोपावली टर उडवणार्या सत्तेच्या विरोधात तर माध्यमांनी अधिक जबाबदारीने आपली लेखणी चालवणं अपेक्षित असताना ज्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशनगर – प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला. त्या काळात संचालक मंडळांने आर्थिक व्यवहार करण्याकरता सह्यांचे अधिकार खासदार सुजय विखे पाटील यांना दिले. खासदार विखे पाटील हे गणेश कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का दिले गेले? गणेश कारखान्याचे जिल्हा बँक आणि सेंट्रल बँकेत नियमित अकाउंट असतानाही प्रवरा बँकेत नवीन खाते उघडून तिथूनच का व्यवहार करण्यात आला? गणेशच्या कारभारात जो सावळा गोंधळ झाला त्याची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटील घेणार का? असा सवाल गणेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली. येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक, पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते. दत्तगिरी महाराज म्हणाले, वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज ह्या फिरत्या नारळी म्हणजे महासप्ताचे आयोजन रविवारी (दि.१७ डिसेबर २०२३) केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे. यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथे शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) रात्री गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली आहे. गाईचा मृत्यू: गेल्या महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी तालुक्यात दमदार सुरुवात केली आहे. रात्री संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात गावातील आण्णासाहेब बाबुराव नेहे यांच्या गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली असून गोठ्यातील गव्हाच्या भुश्यानेही पेट घेतला होता. दुर्घटना टळली: या दुर्घटनेत सुदैवानं इतर फार मोठी जीवीत हानी झाली नसली तरी नेहे यांना यामुळे आपली गाय गमवावी लागले आहे. वरिष्ठांकडून पाहणी: ही माहिती आण्णासाहेब नेहे यांनी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळविली असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – क्षणाक्षणाला पडणार्या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोशपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला. विजेता: मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जीकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा: राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात विनापरवाना गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. वास्तविक या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी गणेश मंडळांनी अशा प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या भेटीत समोर आले आहे. पोलीस ठाण्यात करा अर्ज: सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असून वेळोवेळी सूचना देऊन देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांनी अद्याप पावतो पोलीस ठाण्यातून गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधी अर्ज केलेला नाही. परवानगी घ्या: या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दुचाकी, शेती औजारांच्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी एकाच वेळी चौदा भंगार दुकान, गोडाऊनची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तक्रारी: संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, राजुर आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती औजारे, शेती पंप, केबल, बॅटरी चोरीचे गुन्हे सातत्याने वाढत असून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. 14 छापे: गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्याबाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे. चोरट्यांकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मनामनात दरवळणारी गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. गणेश आरतीचा यांना मिळाला मान: राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. प्रेक्षकांना…
दराडे कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषाचा मृत्यू महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी – संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अझमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली. १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (२१ सप्टेंबर) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काकस्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) याचादेखील ह्रदय विकाराने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधीतच घडली घटना: पिप्रींलौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी त्यांच्या…
