Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बड्या राजकीय नेत्यांची धक्क्यांची मालिका संपण्याची चिन्हे नाहीत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अधिपत्याखाली असलेला जळगाव दूध संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आहे. यामुळे दूध संघाची निवडणूक गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे, चव्हाण यांच्या उमेदवारीला हरकत घेणारी ही याचिका फेटाळल्याने दूध संघाच्या निवडणूकीत खडसे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे मानले जाते. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी दाखल केलेली उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी मंदाकिनी खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एकापाठोपाठ एक मोठे उद्योग राज्याबाहेर निघून गेल्यानंतर टिकेचे धनी बनलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने रोजगाराच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. प्रकल्पाच्या प्रश्नावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकारण रंगलेले असतांना आता सरकारने बेरोजगार युवकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील कौशल्य विभागाच्या पुढाकारातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सामंजस्य करार करण्यात आले आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला. या सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. उद्योगांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण द्यावे. यातून…
भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर बळी पडणार नाही महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर विकासातून वैभवशाली शहर ठरले आहे. तत्कालिन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी त्यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जागेचीही निश्चीती केली आहे. त्यामुळे शहरात लवकरच अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असून यासंदर्भातत भाजपचे पदाधिकारी जनतेला भुलथापा देवून दिशाभुल करत असल्याची टीका कॉग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली. अश्वारूढ पुतळ्याबाबत बोलताना दिवटे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले आणि सय्यद जावेदभाई जहागिरदार यांनी आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही छत्रपती…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरात स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्यात आता हुक्का पार्लरचा समावेश झाला आहे. शहरालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संगमनेरात येत टाकलेल्या या छाप्यामुळे प्रतिष्ठीतांचे हुक्का पिण्याचे शौक समोर आले आहेत. पथकाच्या छाप्यात ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हाती लागला असून नऊ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नंतर आरोपींची मुक्तता करण्यात आली. शहरालगत गुंजाळवाडी शिवारात सुरु असलेल्या या हुक्का पार्लरकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असतांना याची माहिती थेट नगरच्या गुन्हे विभागाला मिळाल्यावर त्यांचे पथकच मंगळवारी रात्री संगमनेरात दाखल झाले. या पथकाने हॉटेल ग्रीन लीप शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम न्यायालयाने दिले आहेत. यामुळे मलिक यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्यात. एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी मलिक यांनी कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज वाशिम सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वाशिम पोलिसांना मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मलिक यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात उद्या हा गुन्हा दाखल होईल. वानखेडे यांच्या आयुष्यातील जुने फोटो आणि पुरावे मलिकांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया वरून प्रसारित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीचे सरकारकडून मी बदला घेतला. अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे. ‘कटकारस्थानाचे महामेरू’ अशी पदवी उत्तम शोभू शकते त्यांना! अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेने आमच्या सोबत जी बेईमानी केली, त्या बेइमानाना त्यांची जागा दाखविण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आले आहे. अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सरकार पाडण्यामागे फडणवीसच असल्याची टीका सुरू झाले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पटोले म्हणाले, मविआ सरकारकडून मी बदला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो पदयात्रेला महाराष्ट्रामध्ये देखील अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेतील महाराष्ट्रामधील शेवटची सभा शेगावमध्ये होत आहे. पदयात्रेमध्ये अहमदनगर मधील पाच हजारावर कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असून शेगाव येथील शेवटच्या सभेसाठी हे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंखे आणि समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली. कन्याकुमारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आली आहे. नांदेड हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये जनतेने यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून यात्रेचा शेवटचा प्रवास होणार असून त्यानंतर यात्रा दुसऱ्या राज्यात प्रवेश करणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणी वाहन चालकाची सखोल चौकशी केल्यानंतर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष सीआयडीने काढला आहे. याप्रकरणी मेटे यांच्या चालका विरोधात रसायनी पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑगस्टला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (52) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचे कट्टर समर्थक असलेले माजी विधान परिषद सदस्य विनायक मेटे हे मराठ्यांच्या नोकरीतील टक्क्याच्या मुद्द्यावरच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जात होते. यादरम्यान त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या रोटरी क्लबने संगमनेर-अकोले तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर, दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी, ३७ शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी ६६५ शैक्षणिक टॅब वितरित केले. रोटरी क्लब तैवान आणि रोटरी क्लब पुणे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला गेला आहे. टॅब वितरण व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मालपाणी लॉन्स येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे नॉर्थ क्लबचे अध्यक्ष गिरीश कोणकर, केतन जोशी, पीडीजी ओमप्रकाश मोतीपवळे, एजी गौरव भुजबळ यांच्यासह संगमनेर रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सचिव आनंद हासे, रोटरी क्लब अकोलेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र डावरे, प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दुर्दम्य इच्छाशक्ती… अंगभूत असलेला कष्टाळूपणा अन् ठरवले ते करणारच या ध्येयाने झपाटलेली एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी. ती आपले बीएचे शिक्षण इंग्लिश विषयातून पुर्ण करते… समोर असे निश्चीत ध्येय नव्हतेच… मात्र काहीतरी वेगळेच करण्याचे तिचे स्वप्न होते… गरिबीचे चटके सोसत काबाडकष्ट करत, प्रचंड अभ्यास करून हे स्वप्न तिने सत्यात उतरवलेच! … अन् आशा पंढरीनाथ बागुल ही गावातील पहिली महिला वकील झाली. प्रत्येक तरुणीसाठी आदर्शदायी ठरावा असा आशाचा प्रवास थक्क करणारा आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील पंढरीनाथ बागुल यांच्या कुटूंबातही अनेक कुटूंबाप्रमाणेच गरीबी वाट्याला आलेली. मात्र या परिस्थितीत वडील आणि भावाच्या खांद्याला खांदा लावून तीदेखिल शेतीची मेहनतीची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, असे खा. राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही वनवासी म्हणते,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीच्या साई आश्रया परिवारमध्ये बाल दिनी मुलांना भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पुस्तकांचे वाटप करत बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शिर्डीच्या नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस वंदना गोंदकर यांनी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपल्या मुलांची शिक्षणाची पुस्तके बाहेर कुठेही न देता साईआश्रया परिवार येथे द्यावी असे आवाहन केले आहे. “ह्रदयाची कोमलता, मनाची निरागसता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची ओढ असणाऱ्या आणि उद्याचा देश घडवणाऱ्या बालकांना बालदिनाच्या यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. बालदिनानिमित्त साईआश्रया वाचनालय व मुलांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मांसाहेब, स्वातंत्र्यविर सावरकर, प.पु. गोवळकार गुरूजी, प.पु.डॅा. हेडगेवार, पंडित दिनदयाल उपाध्याय, डॅा.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली. ‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” देण्याचा उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाहतुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेल्या अहमदनगर- मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पक्ष चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याशिवाय पक्ष चिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्वाखाली आपला गट स्थापन करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये रंगलेले युद्ध थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. अंधेरी पोट निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविले. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ‘मशाल’ निवडणूक चिन्ह दिले तर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात आता पूर्वीचे सरकार राहिलेले नाही, त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो नियमात राहूनच करावा लागेल. आधी राज्यांमध्ये गुंडाराज सरकार होते, आता मात्र चांगले सरकार सत्तेवर आल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या विरोधात ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, त्या संदर्भात अधिक भाष्य न करता त्यांनी याबाबत तिच्याशी बोलेन त्यानंतरच यावर बोलणे उचित राहील असे त्या म्हणाल्या. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत नाहीये, त्यामुळे कोणते खोटे होणे आता दाखल होणार नाही हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. खासदार राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत. थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमानुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणावर दिला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नासिक-मुंबई महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही. तसा दबाव टाकला ही जाणार नाही. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील, पडताळणी करतील. जी काही तक्रार असेल त्यात तर त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी तीन सहकारी नगरसेविकांसह बिनशर्त शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. अशा आशयाचे पत्र नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करतय असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्राद्वारे लक्ष करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच…
