Author: Annant Ppangarkar
रविवार विशेष लेख महाराष्ट्रातल्या 2021मधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यानंतरही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे ‘आयजीची खाट आणि बायजीचा थाट’ असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारी पिसं उपटूनही आपणच जिंकल्याचं आणलेलं उसनं अवसान म्हणजे लाज कोळून पिण्याचा प्रकार होय. प्रचंड लत्ताप्रहार होऊनही शिंदे गट आणि भाजपने साजरा केलेला आनंदोत्सव पाहाता आजचे सत्ताधारी लाज कोळून पिणारे सत्तापिसाटच म्हटले पाहिजेत. महाराष्ट्रात अस्तित्वात आलेली सत्ता ही बेकायदा आणि घटनेची सारी तत्व गुंडाळून आलेलं सरकार होय, असं स्पष्ट मत व्यक्त होऊनही कोणी आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्या बुध्दीची तपासणीच करायला हवी. काहींना आनंद साजरा करण्यात असुरी असते. तीच असुरी…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तालुका प्रशासनाच्यावतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या निवडणूक वार्ताच्या सहामाही अंकात पृष्ठ क्रमांक ९ वर कोपरगाव तालुका प्रशासनाने राबविलेल्या ‘गुलाबी मतदान केंद्र (पिंक बूथ)’ या उल्लेखनीय उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूका पार पडल्या. यात शिंगणापूर…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर कडे जाताना या दांपत्याचा अपघात झाला. अशोक विठ्ठल गुंड (वय 58 वर्ष) व शोभा अशोक गुंड (वय 53 वर्ष रा. जळगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर) हे दांपत्य शनिवारी (ता. 13 मे) सकाळी संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून जात असताना साडे आठ वाजण्याच्या दरम्यान जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अशोक गुंड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी शोभा गुंड या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) राहत्या घराचे कुलूप तोडत घरामध्ये घुसलेल्या अज्ञात चोरट्याने तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमोण येथे घडला. विशेष म्हणजे चोरट्याने चांदीचे देवही चोरून नेले आहे. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी विकास हरिभाऊ मंडलिक (वय 38 वर्ष रा. निमोन, ता. संगमनेर) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश मिळविला. चोरट्याने घरातील 29 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये कानातील वेल, कानातले, पोत, चांदीचे 12 कॉइन व चांदीचे 2 देव, 1 शिक्का, दोन-तीन हजार रुपये चिल्लर व…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नवीन वाळु धोरणाच्या अनुषंगाने वाळू डेपोपासून ग्राहकांच्या स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळू पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौणखनिज वाहतूक धारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळु उत्खनन, वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. नवीन वाळु धोरणानुसार वाळु डेपोपासुन ग्राहकांना स्वखर्चाने त्यांच्या इच्छुक ठिकाणी वाळु पोहोच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळु पोहोच करण्यासाठी सहा चाकीपर्यंत सर्व गौण खनिज वाहतुकदार यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करावी. वाहतुकीचे दर प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर यांनी निश्चित केल्यानुसार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच याबाबतची सविस्तर माहिती www.nic ahmednagar.com या संकेतस्थळावर उपलब्ध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘द केरला स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाचे धर्म जागृती मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने संगमनेरमध्ये ३ शोचे मोफत आयोजन केले होते. संगमनेरकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. “द केरला स्टोरी” हा चित्रपट धर्मांतर व लव्ह जिहाद या विषयावर आधारित असून कट्टरपंथी जिहादी व आतंकवादी संघटना, देश विघातक संस्थाच्या षडयंत्राद्वारे महाविद्यालयीन विदयार्थीनी व अल्पवयीन मुली आपल्या जाळ्यात ओढून सिरिया- अफगाणिस्तान सारख्या देशांत पाशवी बलात्कार व अत्याचार करण्यासाठी पाठविल्या जातात. अश्या धर्मांध वृत्तीपासूनच्या अमानवीय कृत्यापासून हिंदू मुली व महिला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांचे प्रबोधन म्हणून हा मोफत चित्रपट दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता. हिंदू धर्मजागृती मोहीम अंतर्गत विहिंप, बजरंग दल,…
सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध…
विधानसभा अध्यक्ष एक चांगले वकील आहेत आणि ते कायद्यानुसार निर्णय घेतील… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत आणि वाजवी वेळही दिली आहे आणि तरीही कोणी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती मुक्त आणि न्याय्य प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत विविध राजकीय पक्षांच्या वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. याकरिता रिझनेबल वेळ देखील दिला आहे. दरम्यान यावर अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्तुत्तर दिल. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष हे…
नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) जाऊ द्या.. ते ज्येष्ठ नेते आहेत.. बोलत असतात.. इतकं लक्ष द्यायचं नसतं! अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांने केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही असा टोला लगावला होता. त्यानंतर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाची दखल घेत शरद पवारांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर यांची फेरनिवड तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड यांची निवड करण्यात आली. बाजार समितीचे सभापती उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी शंकरराव खेमनर यांच्या नावाचे सूचना संचालक कैलास पानसरे यांनी मांडली. संचालक निलेश कडलग यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी गीताराम गायकवाड यांच्या नावाचे सूचना संचालक अरुण वाघ यांनी मांडली. या सूचनेला संचालक…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये विनापरवाना चालविल्या गेलेल्या सेतू कार्यालयाचे थकलेले १८ लाख ४७ हजार ४५६ रुपये भाडे संबंधितांकडून तात्काळ वसूल केले जावे अथवा २०१४ पासून आतापर्यंत येथे कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या पगारांमधून या भाड्याची रक्कम वसूल करावी तसेच शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खताळ यांच्या या मागणीमुळे संगमनेरच्या सेतूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संगमनेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये ऑगस्ट २०१४ पासून मार्च २०२३ पर्यंत अनधिकृतरित्या शारदा पतसंस्था…
राजुर (महाराष्ट्र संवाद न्यूज) चोरट्यांनी चोरी करताना केलेल्या मारहाणीत अकोले तालुक्यातील वाकी येथे मधुकर किसन सगभोर यांचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवसांच्या पोलीस तपासानंतर हे प्रकरण वेगळाच वळणावर येऊन थांबले. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागील बनाव देखील उघडा पाडण्यात पोलीस यशस्वी ठरले. मधुकर सगभोर हे सातत्याने दारू पिऊन पत्नी, मुलांना मारहाण करणे, मद्यप्राशन करून घरामध्ये राडा करणे अशा प्रकारचे कृत्य करत असल्याने कारणाने वैतागलेल्या पत्नीच्या हातून पतीचा खून झाल्याचे समोर आले. घटनेच्या दिवशी देखील मुलाने त्यांना मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्यांनी मुलाला मारहाण देखील…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरता घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. यामध्ये तत्कालीन राज्यपाल यांचे निर्णय, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीर गटाचा व्हीप याचा समावेश आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने सरकार पाडणे आणि सत्तेवर जाणे ही सत्तेची अभिलाषा ठेवून केलेली ही कृती असल्याचे निकालातून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून नैतिकतेच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर बोलताना थोरात म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) परभणी जिल्ह्यातील सेलू येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात लातूरचा तर, एकोणावीस वर्षांखालील गटात नागपूरच्या संघाचा पराभव करीत ध्रुव ग्लोबलच्या संघाने चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. परभणी जिल्हा आणि सेलू तालुका क्रीडा कार्यालयाने या स्पर्धांचे आयोजन केले होते. पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 17 वर्षांखालील संघाने साखळी सामन्यात मुंबईचा 2 विरुद्ध शून्य असा एकतर्फी तर कोल्हापूरचा 2 विरुद्ध 1 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक घेतली. अतिशय अतितटीच्या अंतिम सामन्याच्या दुसर्या सत्रात ध्रुवच्या खेळाडूंनी आघाडी घेत लातरच्या संघाला 4 विरुद्ध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्थानकामधून दररोज दागिने चोरीच्या घटना समोर येत आहे. बस स्थानकावरील पोलीस चौकी केवळ देखावा बनली असून या चोऱ्या रोखण्यास संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. संगमनेरहून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चोरट्यांनी हात मारत एका निवृत्त शिक्षिकेचे तब्बल साडेदहा तोळे वजनाचे दागिने हातोहात लंपास केले. दागिने, दुचाकी चोरांसोबतच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी संगमनेरात उच्छाद मांडला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे संगमनेरातील अवैध धंदे मात्र कोणत्याही कारवायाविना सुरूच आहे. अकार्यक्षम पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका संगमनेर करांना बसत असून तक्रारदारालाच पोलिसांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ लागले आहे. त्यामुळे चोरी परवडली, पण पोलीस चौकशीचा ससेमिरा नको, असे म्हणण्याची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाचा सपशेल पराभव करत सत्ता कायम राखलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील बाजार समितीचे सभापती, उपसभापती शुक्रवारी (ता.12 मे) निवडले जाणार आहेत. प्रतिष्ठेच्या असलेल्या या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. बाजार समितीचे सभापती, उपसभापती निवडण्यासाठी नूतन संचालकांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आमदार थोरात यांनी निश्चित केलेल्या नावांना सहमती दर्शविली जाईल. सभापतीपदावर थोरात माजी सभापती शंकर खेमनर यांना पुन्हा संधी देतात की या पदासाठी दुसरे नाव समोर येते हे शुक्रवारीच कळणार…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली आहे. अकोले तालुक्यातील गाजलेल्या या खटल्याचा बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला. बाळासाहेब विठ्ठल आडांगळे (रा. उंचखडक, ता. अकोले) असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून बाळासाहेब आडांगळे यांनी पत्नी कल्पना हिला ‘तू उद्धट आहे, काही एक ऐकत नाही, काल तू माझ्या तावडीतून वाचली, आज तुला सोडणार नाही’, असे म्हणत तिच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर कुऱ्हाडीने व चाकूने मारून तिला गंभीर जखमी केले होते. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अकोले पोलीस ठाण्यात बाळासाहेब आडांगळे यांच्या विरोधात ११ सप्टेंबर…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) देशभरात उत्सुकता लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने केला. न्यायालयाने पहिली तीन निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ३० जूनला दिलेला राजीनामा चुकीचा ठरविल्याने सत्ता संघर्षाचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने गेला. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. या निर्णयामुळे सरकार वाचले असून शिंदे-फडणीसांची सत्ता कायम राहिली आहे. ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे यांनी ३० जूनला दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागण्यासाठी कारणीभूत ठरला. ठाकरेंचा राजीनामा घेणं चुकीचं ठरलं, असं झालं नसतं तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती,…
