Author: Annant Ppangarkar
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून देखील त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. एकाच वेळी शहरात दुचाकी चोरट्यांच्या एकापेक्षा अधिक टोळ्या कार्यरत असल्याचे दुचाकी चोरीच्या घटनांमधून समोर येत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकीमध्ये एका बुलेटचा समावेश आहे. 19-20 मे दरम्यान शहरातील ताजणे मळा येथून हबीब अब्दुल करीम तांबोळी या किराणा व्यावसायिकाची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची क्लासिक कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. या संदर्भात बुधवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) रिक्षा चालक ते अब्जाधीश असा प्रवास असलेले आणि वर्षभरापासून अटकेत असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. भोसले यांच्या याचिकेवरील सुनावणी ६ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. येस बँक आणि डिएचएफएल घोटळा प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयने २६ मे २०२२ रोजी अटक केली होती. दरम्यान, ईडीने मनी लाँड्रींगच्या आरोपात देखील तपास सुरू केला होता. तेव्हापासून अविनाश भोसले हे कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांना जवळपास वर्षभरापासून जामीन मिळालेला नाही. भोसले यांनी याप्रकरणी दिलासा मागत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान ६ जूनपर्यंत या प्रकरणाची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) दुचाकी वरून जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिच्या दुचाकीला कट मारून ‘तू मला आवडतेस’, असे म्हणून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जमजम कॉलनी येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून याच भागातील फरदीन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या मुलीने म्हटले आहे की, सोमवारी (ता. 22 मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या ओळखीच्या एका दाम्पत्यासह दुचाकीवरून रहेमतनगर येथे नाश्ता करण्यासाठी जात असताना पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून पाठलाग करीत आलेल्या आरोपी फरदीन शेख याने तिच्या दुचाकीला कट मारत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी शिक्षण व महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. परीक्षेत सुकेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मंगेश खिलारी, मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपारणे येथील राजश्री शांताराम देशमुख या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्द आणि आत्मविश्वासातून मिळवलेले हे यश संगमनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थी…
संगमनेर: अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सूर्य डोक्यावर आग ओकत असताना निळवंडेचे पाणी देखील तापले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले असून यात पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर सवडीने निळवंडे धरण व कालव्याचे उद्घाटन करा, आधी कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केली आहे. थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहा टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना, दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्याचे पुण्यकर्म सरकारने पार पाडावे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्यावतीने देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाते. याच उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्यावतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सन 2020 ते 2023 या तीन वर्षात 18 ते 59 वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेले मृत्यूचे दाखले नगर परिषदेमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाल्यापासून सरकारमधील मतभेदांमुळे रखडलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अखेर सोमवारी रात्री उशिराने शिंदे-फडणवीस सरकारने पदोन्नती देत याबाबतचे आदेश रात्री उशिराने काढले आहेत. यात राज्यातील 143 पोलीस निरीक्षकांचा समावेश असून सरकारने त्यांना नव्या नियुक्तीची ठिकाणे देखील दिली आहेत. यात नासिक येथून अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकपदी आनंदा वाघ बदलून येत आहेत. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पदोन्नती आणि बदली संदर्भात सरकारने काढलेले आदेश… याशिवाय आणखी वीस पोलीस उपाधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी खालील प्रमाणे:-
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिराने राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील तब्बल 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या संगमनेरच्या पोलीस उपनिरीक्षक पदावर सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती झाल्याने अखेरीस संगमनेरला नवे डीवायएसपी मिळाले आहे. वाकचौरे यांनी काही काळ श्रीरामपूर विभागात देखील काम बघितले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच डीवायएसपीच्या बदल्या झाल्या असून त्यातील दोघांना पुन्हा नगर जिल्ह्यातच नव्याने नियुक्ती मिळाली आहे. तर तिघे जिल्ह्याबाहेर बदलून गेले आहे. त्यांच्या जागेवर जिल्ह्याबाहेरून तीन नवे डीवायएसपी जिल्ह्यात आले आहेत. अण्णासाहेब मारुती जाधव यांची कर्जत वरून सांगली शहर येथे, अहमदनगर ग्रामीणचे डीवायएसपी अजित भगवान…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) महत्त्वकांक्षी ठरलेल्या नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा खुला झाल्यानंतर त्या पाठोपाठ आता २६ मे पासून शिर्डी ते नाशिक हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नासिकपर्यंत हा महामार्ग खुला होत असल्याने आता नागपूर ते नाशिक प्रवासासाठी सहा तास लागणार असून नव्याने सुरू होत समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर…
श्रीरामपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) श्रीरामपूर पोलिसांनी गोवंश जनावरांचे कत्तल करून त्यांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे पावणे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी (ता. २२ मे) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर पोलिसांनी धनगर वस्ती, वार्ड नंबर दोन येथे ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांना मुजाहिद मुस्ताक कुरेशी हा त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या कार नंबर एम. एच. २३ वाय ६०९९ मध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून ६३००० रुपये किमतीचे साडेचारशे किलो मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला पोलिसांनी कारवाईदरम्यान ६३ हजार रुपये किमतीचे मांस व चार लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेतली. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मुजाहिद…
राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) उच्चशिक्षित प्रेयसीला फसवत दुसऱ्या मुलीशी विवाह करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. नव्या वधू सोबत बोलल्यावर चढण्यासाठी नवरदेवाची निघालेली मिरवणूक लग्न मंडपाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचण्याचा प्रकार राहाता तालुक्यात समोर आला आहे. लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार घेऊन प्रेयसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि नवरदेवाचा हिरमोड झाला. लग्न तर मोडलेच परंतु नवरदेवावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नगर जिल्ह्यात या विवाहाची चर्चा सुरू आहे. एकीकडे वर आकाशात सूर्यनारायण तळपत असताना दुसरीकडे विवाह समारंभ जोरात सुरू आहे. रविवारी (ता. 21 मे 2023) अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये देवळाली ता. नाशिक येथील पंकज कदम याचा…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – रविवारी झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आशीर्वाद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दर्शवित विरोधी पॅनलचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील पुनाजी दाभाडे तर विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून बाळासाहेब जगन्नाथ दासरी या सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांची निवड सुरुवातीलाच बिनविरोध झाली होती. विरोधी गटाने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केल्याने उर्वरित तेरा जागांसाठी रविवारी मतदान झाले. या संस्थेच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर विरोधी गटाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे दिसून आले. एकाही…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अज्ञात व्यक्तीने संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या पार…
रविवार विशेष लेख विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) आज शनिवारी नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यातील महत्वाचे मुद्दे : ✓ नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती. ✓ २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? ✓ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. ✓…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनावर महसूल विभागाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसम गुरमीत सिंग दडियाल (वय ४० वर्ष, रा. कोपरगाव) याला नासिक एसीबीने रंगेहात पकडले. दडियाल आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगावमध्ये थेट तहसीलदारांवरच एसीबीचा ट्रॅप झाल्याने जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोपरगाव येथील तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये याकरीता, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४ वर्षे, रा. कोपरगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची…
