Author: Annant Ppangarkar
दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) उद्या गुरुवारी (ता. 11 मे) घटनापीठाकडून दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा तसेच राजकीय पक्षांची धाकधूक वाढविणारा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाकडून राखून ठेवण्यात आलेला महाराष्ट्रातील सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार असल्याने यामुळे राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सोळा आमदारांच्या पात्रते, अपात्रतेसंदर्भात उद्या फैसला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा बरोबरच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथून एका सतरा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे वय सतरा वर्ष एक महिन्याचे असून अज्ञात व्यक्तीने तिला कसले तरी आमिष दाखवून तिला घरच्यांच्या रखवालीतून पळवून नेले. सोमवारी (ता. 8 मे) रात्री अकरा वाजल्यानंतर मंगळवारी (ता. 9 मे) सकाळी सहा वाजण्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे हा प्रकार घडला. सकाळी घरातील लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र मुलगी आढळून न आल्याने या संदर्भात…
सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुणेकर असलेल्या आणि साताऱ्यामध्ये दुय्यम निबंधक (वर्ग 2) पदावर कार्यरत असलेल्या उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42) याने नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एसीबीने सूर्यवंशी याला बुधवारी रंगेहात पकडले. सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी एसीबीने याबाबत पडताळणी केली असता सूर्यवंशी याने लाच मागितली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज बुधवारी (10 मे) लाचखोर सूर्यवंशी याला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदाराकडून सातारा येथे सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) यास एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना…
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर; ‘संगमनेर’मधून यांचा आहे समावेश
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी शिवसेनेचे (ठाकरे) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. पद, पदाधिकाऱ्याचे नाव व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : कक्ष जिल्हा संघटक : अशोक थोरे (कोपरगाव / श्रीरामपूर/नेवासा / राहाता / संगमनेर अकोले / राहुरी), कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस : अॅड. राहुल नवले, कक्ष जिल्हा सहसंघटक : प्रमोद कुलट (संगमनेर/अकोले / राहाता), कक्ष जिल्हा सहसंघटक दत्ता कडू (कोपरगाव…
राजापूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील धनलक्ष्मी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. नव्या संचालक मंडळात… अँड नबाजी गायकर, विजय रभाजी हासे, सुभाष भिवाजी हासे, भास्कर मारुती गुंजाळ, भाऊसाहेब संभू हासे, भास्कर गंगाधर मोहिते, सोमनाथ भाऊसाहेब सोनवणे, रामनाथ लक्ष्मण सोनवणे, संपत भागाजी गुंजाळ, सचिन भाऊसाहेब सातपुते, बाळासाहेब राजाराम हासे, विष्णू माधव सोनवणे, वसंत डांगळे, शिला तबाजी हासे व…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर अहमदनगरमध्ये बदलून आलेल्या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 9 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदांचा पदभार हाती घेतला. शिवराज मोरे, हेमलता बढे व पल्लवी निर्मळ या उपजिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली. भेटीनंतर मोरे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदाची, बढे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची व निर्मळ यांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी क्रमांक एक या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. 4 मे रोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील तर 8 मे रोजी तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार हाती घेण्यास सुरुवात केली…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्थानकाजवळचा हॉटेल कश्मीर समोरील अनधिकृत रिक्षा स्टॉप बंद करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या अनधिकृत रिक्षा स्टॉपजवळ राजू आखाडे यांची अल्पवयीन मुलगी उन्हाच्या तीव्रतेने भोवळ येवून पडली असता, या रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान याचवेळी येथून योगेश सूर्यवंशी, विशाल वाकचौरे, दिपक रणशेवरे जात होते. त्यांनी मुलगी तीव्र उन्हात रस्त्यावर पडलेली पाहिली, त्यांनी तिला तत्परतेने सावलीत नेवून पाणी पाजले, तरीही तिला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे या तिघांनी संयमाची भूमिका घेवून तिला दवाखान्यात नेण्याची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामाजिक जाणीव आणि संवेदना जागृत ठेवत शिक्षक सुनील कडलग व अनिल कडलग, लता पुष्पा व उषा या भावंडांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने रूढी परंपरा बाजूला ठेवत स्वामी विवेकानंद वाचनालय आणि आधार संस्थेस देणगी दिली. याचबरोबर विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून प्रेरणादायी कार्य केले. रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संस्थापक सुनील कडलग आणि आधार संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे अनिल कडलग यांच्या मातोश्री शकुंतला किसन कडलग यांचे सोमवारी (ता.8) प्रथम पुण्यस्मरण होते. आयुष्यभर सामाजिक जाण व भान जपणाऱ्या आईचा स्मृतीजागर हा प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करून व…
नासिक / संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोरून येणाऱ्या राजहंस दुधाच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी दुपारी सिन्नर पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर सिन्नर-नाशिक मार्गावर नाशिकच्या दिशेने एल अँण्ड टी फाट्याजवळ हा अपघात झाला. शहापूर आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. 06 एच. 8560 ही 40 प्रवासी घेऊन दुपारी शिर्डीहून शहापूरकडे निघाली होती. शहापूरच्या दिशेने जात असताना एसटी बस चालकाच्या बाजूने ओढली जात असल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात येताच बस चालकाने सिन्नर…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला नवे तहसीलदार मिळाले आहे महिनाभरापूर्वी 12 एप्रिलला बदलून गेलेल्या तहसीलदार अमोल निकम यांच्या जागेवर अमरावती विभागातून धीरज मांजरे बदलून आले आहे. याशिवाय शिर्डीच्या साईबाबा संस्थान मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संगमनेरला नवीन तहसीलदारांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. तहसीलदार अमोल निकम यांची नाशिकला बदली झाल्यापासून संगमनेरचे पद रिक्त होते. या पदावर शासनाकडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. सोमवारी 8 मे रोजी राज्य शासनाने नासिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद विभागातील तहसीलदारांच्या शासनाने केल्या बदल्या आहेत. अमरावती विभागामध्ये कारंजा येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती असलेले धीरज…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा यंदाचा नृत्य कलाभूषण पुरस्कार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पटकावला. सौम्या सचिन जोशी, अदिती राजेश लाहोटी व श्रिया अमोल मुळे या विद्यार्थीनींचा यात समावेश आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातील दीडशे स्पर्धकांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात ध्रुव ग्लोबलच्या तिघींचा समावेश आहे. नटराज आर्ट अँड कल्चरलचे प्रा. रवींद्र हरदास, आसमान फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रवी गिरे, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, प्रा. डिंपल साखरे, प्रा. सुंदरी पिसिपती, अनिल कावडे, ममता जयस्वाल, प्रा.…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणामध्ये सद्यस्थितीत 59.60% पाणीसाठा शिल्लक असून निळवंडे धरणामध्ये सद्यस्थितीत 57.12% पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी सायंकाळी निळवंडे मधून 600 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून साधारणतः 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.
गोंदिया (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शैक्षणिक संस्थेला कर्मचाऱ्यांचे 65 कोटी रुपये चुकविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पटेल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आणि सध्या बंद पडलेल्या संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखाली गोंदिया येथे मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ही संस्था कार्यरत होती. मात्र ही संस्था बंद पडल्याने अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. गोंदिया एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था खासदार पटेल यांचे कुटुंबीय चालवीत आहेत. 2018 मध्ये संस्थेत एकही प्रवेश नोंदविला गेला…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक गोळवळकर गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काँग्रेसच्या हरिभाऊ सोळंके यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मनोहर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोळंके यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व ५०१ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वरील संस्कृती संवर्धन नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक लिंक आली. सूर्यवंशी यांनी आलेली लिंक क्लिक करून ओपन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील “ऐसपैस शिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगमनेरमधील पत्रकार उपस्थित होते. चपराक प्रकाशनाच्यावतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाच्यावतीने यापूर्वी शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले आहे. पुस्तकाला माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर…
रविवार विशेष लेख (महाराष्ट्र संवाद न्यूज) भारतीय राजकारणात काही व्यक्ती इतक्या बनेल झाल्यात की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही असेच व्यक्तीमत्व बनलं आहे. जगज्जेते आणि सर्वव्यापी असल्याने त्यांनी केलेली कोणतीही कृती ही दैवी देणगीच जणू. ते कोणालाही काहीही बोलले तरी ते शब्द फुलोरे आणि त्यांना कोणी काही बोललं तर तो द्रोह, त्या म्हणजे लाखोल्या. त्यांनी कसंही वागलं तरी तो दैवी चमत्कार, इतरांसाठी मात्र तो व्यंग ठरतो. त्यांच्या अवगुणांवर कोणी बोट ठेवलं की जणू देवावरचाच हल्ला. यामुळे इतरांनी पंतप्रधानांवर टीका करू नये. तो अधिकार केवळ आणि केवळ मोदींचा आणि त्यांच्या पक्षाच्या वाचाळांचाच. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्या देशात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. देशात व राज्यात आगामी काळात सत्ता बदल निश्चित असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षात युवकांसाठी मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा आदींसह युवक पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,…
अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) येत्या पंधरा दिवसात अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहरातील ज्योतिष व पौरोहित्य क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून योगदान देणाऱ्या प्रमोद बेल्हेकर (गुरु) यांना बेंगलोरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंट’च्यावतीने ज्योतिष व रत्नशास्त्रातील योगदानासाठी ‘नॅशनल ॲस्ट्रोरत्न अवार्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंटचे चेअरमन व भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य सनदी अधिकारी डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते तसेच हिंदी व दक्षिणात्य चित्रपट निर्माते भोलाराम मालवीय यांच्या उपस्थितीत ए. डी. ए. रंगमंदिर, बेंगलुरू येथे रविवारी (ता. ६ मे) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रतिवर्षी विविध क्षेत्रात योगदान, सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान ह्या संस्थेमार्फत केला जातो. बेल्हेकर गुरु म्हणून परिचित असणाऱ्या प्रमोद…
