Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज | शिर्डी अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेली शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधाची चाचणी शनिवारी (८ एप्रिल) रात्री यशस्वी झाली. २११ प्रवासी घेऊन दिल्लीहून निघालेले इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या प्रवासी विमानाने रात्री ८ वाजून १० मिनिटांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग केले. त्यानंतर रात्री नऊ वाजता २३१ प्रवाशांना घेऊन या विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत या विमानतळावर नाईट लँडिंगची नियमित सेवा सुरू होणार आहे‌. २३२ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. शिर्डी…

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, ‘आधार’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोसावी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ भिलारे, मनेश भालेकर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेन्द्र वाकचौरे व मित्रपरिवारामुळे अजय प्रेमानंद कोल्हे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर या आजोबांच्या राहण्याचा व उपचारांचा प्रश्न लागला मार्गी लागला महाराष्ट्र संवाद न्यूज अजय प्रेमानंद कोल्हे वय 52 हे ‘अर्धांगवायू’ या जीवघेण्या आजाराने पीडित आजोबा… अनेक वेदना अन यातनांनी निकामी झालेले बरेच अवयव… अशातच मायेच्या माणसांनीच दुरावा धरल्याने आलेले असहाय एकाकीपण, यामुळे जगण्याची आशा अन मार्ग अंधुक झालेल्या या आजोबांना युवकांच्या प्रयत्नांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र युथ सॉफ्टबॉल स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या संगमनेर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवत सुवर्णपदकावर मोहर उमटविली. संघात आजी-माजी खेळाडूंचा सहभाग होता. अंतिम सामन्यात बलाढ्य ठरलेल्या जळगाव मनपा संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये ८-४ च्या धाव संख्येने मोठा विजय मिळविला. अजिंक्यपद मिळविणाऱ्या या मुलांच्या संघात पवन गुंजाळ, आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, वैभव मुठे, स्वप्निल पथवे, सौरभ कानवडे, साईराज परचंडे, निखिल शिंदे, वैभव नेहे, गणेश साबळे, हनुमंता शिंदे, युवराज गुरव यांचा समावेश होता. पवन गुंजाळ याने पिचरची महत्त्वाची भूमिका पार पाडत प्रतिस्पर्धी संघाचे १५ गडी बाद केले तर बॅटिंग करताना आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, साईराज परचंडे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्याद्री पतसंस्थेला ३१ मार्च अखेरीस १ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ यांनी दिली. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेकडे ३० कोटी ३४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने २७ कोटी २४ लाख रुपयांचे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा राखीव निधी ६ कोटी ४९ लाख तर संस्थेचा स्वनिधी १ कोटी ३५ लाख रुपये आहे. संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ४१ लाख आहे. संस्थेची २० कोटी ११ लाख रुपये गुंतवणूक असून ३१ मार्च अखेर १ कोटी १९ लाख रुपये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरमच्यावतीने भारतीय हिंदी कवयित्री, कादंबरीकार मनीषा खटाटे यांच्या ‘मरुस्थल’ या काव्यसंग्रहावर नेपाळमधील नेपाळगंज शहरात समीक्षात्मक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तत्वज्ञानात्मक परिभाषेत हिंदी साहित्यात एका स्त्रीने लिहिलेले हे पहिले आणि रांगेय राघवच्या ‘मेधावी’नंतरचे हे दुसरे खंडकाव्य आहे. एप्रिलच्या प्रारंभी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मरुस्थळच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन देखील भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लेखक डॉ. अमर गिरी, नेपाळ भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लघुकथा लेखक गोपाळ अश्क यांनी केले. यावेळी नेपाळचे ज्येष्ठ साहित्यिक सनत रेग्मी, डॉ. राजेंद्र खटाटे उपस्थित होते. मराठी भाषिक हिंदी स्री साहित्यिकास नेपाळमध्ये असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय साहित्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुलाने गायांचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास विरोध केला, शेत जमीन दुसऱ्याच्या नावे केल्याने विकता येत नाही, या कारणावरून वडिलांनी मुलाचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेर न्यायालयाने वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात दत्तात्रय रामचंद्र हुलवळे यांच्या विरोधात त्यांचा मुलगा प्रवीण दत्तात्रय हुलवळे याने दिलेल्या तक्रारीवरून भाऊ अंकुश याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जून २०१९ रोजी वडगाव पान येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गीता परिवार संचालित संस्कार बालभवनमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या अकरा मारुतींच्या वेशभूषा करुन मुलांनी उपस्थितांना शिवकाळाचे दर्शन घडवले. बालभवनमध्ये जमलेल्या पालक व नागरीकांच्या उपस्थितीत हनुमानरुपी बालकांचे यावेळी पूजन करण्यात आले. मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणानंतर बजरंग बली की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. हनुमान जयंती निमित्ताने गीता परिवाराच्या संस्कार बालभवनमधील सर्व मुलांना महाबली हनुमानाच्या तर मुलींना अंजनी मातेच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. यावर्षी शिवकाळात समर्थ रामदास स्वामींनी राज्याच्या कानाकोपर्‍यात स्थापन केलेल्या विविध अकरा मारुतींच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या. यात चाफळ येथील विरप्रताप मारुती, शिंगणवाडी येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ अर्थसंकल्प सादर करतांना अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने १७ मार्च, २०२३ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२,७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या डोक्यात पाटा टाकून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश नामदेव धांडे, वय 36 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी खुनाचा हा प्रकार घडला होता. आरोपी प्रकाश धांडे यांच्यावर पत्नी शांता हिच्या खुनाचा आरोप होता. या संदर्भात घारगाव (ता. संगमनेर) पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मृत शांता धांडे हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शांता हिचा मामेखेल येथील एका व्यक्तीशी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अनैतिक संबंधाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाला गळा दाबून, मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावामध्ये मंगळवारी अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीर जयंती दिनी घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकील महिला जिल्ह्यातील एका न्यायालयात वकिली करत आहे. या महिलेच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, ही बाब त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात पतीला समजावून सांगण्यासाठी आपल्या सासूला सांगितले होते. महावीर जयंतीदिनी 4 एप्रिल ला संबंधित महिला आपल्या घरी असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या महिलेच्या सासूने तिच्या पतीस आणि महिलेचा पती असलेल्या मुलास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज □ अनंत पांगारकर ऐतिहासिक असलेल्या संगमनेरच्या हनुमान रथोत्सव मिरवणूक गेल्या वर्षी एका वेगळ्याच वादात सापडल्यानंतर यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज वाजत गाजत आणत तो रथावर फडकाविण्याचा मान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कायम ठेवला. गतवर्षी निर्माण झालेल्या वादामुळे हा ध्वज आणण्याचा मान पोलीस निरीक्षकांऐवजी इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला होता. संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या रथ मिरवणुकीला एक वेगळी परंपरा लाभली आहे. कोरोना संकटानंतर गतवर्षी संगमनेरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील तत्कालीन नगराध्यक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अमर कतारी यांच्यावर सातव्यांदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविले गेली. त्यानंतर कतारी यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांचा “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत शहरात एकाच दिवशी सर्व प्रभागात पंधरा शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या. या शाखांची उद्घाटन करताना संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शहरप्रमुखांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. संगमनेर शहरातील सर्वच्या सर्व पंधरा प्रभागामध्ये बुधवारी (५ एप्रिल) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख आदींच्या हस्ते या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोपरगावचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रात्रंदिवस माणसांची वर्दळ असलेल्या बस स्थानकासमोरील काश्मीर हॉटेललगत अज्ञात चोरट्याने दोन किराणा दुकान फोडत दुकानातील रोकड रकमेसह सिगारेट, विलायची असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेला परिसर आणि सातत्याने 24 तास माणसांची वर्दळ असलेल्या ठिकाणी झालेली ही चोरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तुषार अशोक राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून जाणाऱ्या नासिक-पुणे महामार्गावर बस स्थानक आणि हॉटेल काश्मीर या गजबजलेल्या परिसरात काश्मीर हॉटेल लगत राठी यांच्या मालकीची किराणा दुकाने आहेत. फिर्यादी तुषार राठी हे सोमवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या करियरसाठी धावत आहे. मात्र, तुमच्याकडे कौशल्ये नसतील तर केवळ पदवीला काहीही अर्थ नाही. आता तुमच्या थेट कामातून उच्च गुणवत्ता अपेक्षित आहे, म्हणूनच कामाचा निखळ आनंद मिळवून समर्पितवृत्तीने कार्य करणारे तरुणच भारताला सामर्थ्य संपन्न बनवतील, असे प्रतिपादन संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी केले. मास्टर लर्नर्स फोनिक्स फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रज्ञावंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फोनिक्स फाऊंडेशनच्या संस्थापक माया परदेशी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुचित गांधी उपस्थित होते. कडलग म्हणाल्या, परंपरागत शिक्षण कुचकामी ठरत असतांना विद्यार्थ्यांनी नाविन्याची कास धरून आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रामाणिकपणा जपा, विचलित होऊ नका.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या सुरू असलेल्या कामांचा निधी मागील मविआ सरकारच्या काळातील आहे. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते, हे सर्व जनतेला माहिती आहे. असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी महाविकास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा शुभारंभ देशभरातील १ लाख ५९ हजार पोस्ट ऑफिसेसमधून करण्यात आला. संगमनेरमध्ये गणेशनगर मधील रहिवासी अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्या. संगमनेरमधील मुख्य डाकघर येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित व्याजदर व जास्त परतावा यामुळे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी व्यक्त केला. निश्चित आर्थिक ध्येयपूर्ती करण्यासाठी महिलांनी या खात्याचा लाभ घ्यावा,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऐतिहासिक शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी येथे सर्वात उंच मारुतीरायांच्या ३० फूट गदेचा लोकार्पण सोहळा हनुमान जन्मोत्सव दिनी गुरुवारी (६ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, अभिनेता देवदत्त नागे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. पेमगिरी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव असुन शहागड व भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष या गावात आहे. याचबरोबर आता नव्याने सर्वात उंच मारुतीरायांची ३० फूट गदा या ठिकाणी उभारली आहे. हनुमान जन्मोत्सव दिनी या ऐतिहासिक गदेचा लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, प्रतिनिधी शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्‍या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्‍वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्प आहे. विविध ग्राहकोपयोगी सुविधा, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि उच्च कोटीची कामकाज प्रणाली यामुळे आधुनिक संस्थांच्या पंक्तितही संस्थेने भरारी घेतली आहे. ठेवीदारांच्या याच विश्‍वासाच्या जोरावर संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात १६९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडतांना विक्रमी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी दिली. संस्थेच्या ३१ मार्च अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देतांना विद्यमान अध्यक्ष विशाल पडताणी म्हणाले, कोविड संक्रमणाच्या कालावधीनंतर जगभरात निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर दीर्घकाळ मुदतवाढ मिळालेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर तब्बल 109 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत प्रथमताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात विरोधक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. 28 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसते. त्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: उभी हयात सामाजिक योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. ज्या संस्कृतीमध्ये संवेदनशीलतेने ज्येष्ठांना सन्मान दिला जातो, ती संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य भगवान जोशी यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या ५० नागरिकांना आधारवड कृतज्ञता समारंभात छत्री व काठी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोमनाथ कळसकर गुरुजी होते. व्यासपीठावर इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या अध्यक्ष रचना मालपाणी, अध्यक्ष वृषाली कडलग, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी ज्योती पलोड आदी उपस्थित होते. अनिता कोदे व विजय कोदे यांनी छत्री व काठी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात…

Read More