Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : नोकरीसाठी इच्छुक असलेल्या करिता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या संदर्भातील आदेश देखील काढला आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या सभागृहातील पहिल्याच भाषणात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत आता सरकारकडून दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील पतसंस्थांमध्ये गैरव्यवहाराचे प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. तसेच यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती येत्या पंधरा दिवसात स्थापन केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. सहकार मंत्री सावे म्हणाले, गैरव्यवहारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी ही समिती काम करेल. राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर…
महाराष्ट्र संवाद न्यूज एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मोडक्या तुटक्या एसटी बसेस वर जाहिरात केल्याच प्रकरण विधिमंडळात अजित पवार यांनी गुरुवारी उघडकीस आणले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संदर्भात पवार म्हणाले, राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वापरावा. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला विरोध करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,…
महाराष्ट्र संवाद न्यूज कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांची मानधन वाढ तात्काळ करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे प्रश्न मांडताना ते म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका ह्या ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळात या सर्वांनी चांगले काम केले. हे सर्व राज्याने आणि देशाने पाहिले आहे. त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. मानधन वाढीबाबत सर्व विधानसभेतील सदस्य अनुकूल आहेत. या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अंगावर स्विफ्ट कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी वकिलाला गुप्तीचा धाक दाखवत बोटातील सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी संगमनेर न्यायालयाच्या परिसरात घडला. यासंदर्भात संगमनेर न्यायालयातील वकील ॲड. प्रसाद कडलग यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिल पांडुरंग गुंजाळ, प्रवीण (पूर्ण नाव माहिती नाही) सह आणखी चार जणांवर दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन दिवसाच्या वादाची परिणती जिवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाणीत झाल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, ॲड. प्रसाद कडलग हे संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वकिली करत असून…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे येथे झालेल्या नवव्या राजस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण आणि ५ रौप्य अशा १२ पदकांची कमाई केली आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर उपविजेतेपदही पटकाविले आहे. सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २१ वर्षांखालील मुलींच्या शास्त्रीय नृत्य प्रकारात ‘दशावतार’ हे शास्त्रीय नृत्य सादर करून संस्कार बालभवनच्या समूहाने सुवर्णपदक मिळविले. या समुहात मिताली भडांगे, आदिश्री झंवर, रिया साकी, मनसा कालडा, आर्या भालेराव, भक्ती रत्नपारखी व अनुष्का जाधव यांचा समावेश होता. याच वयोगटातील मुलींच्या शास्त्रीय लोकनृत्य प्रकारात ‘झूम झूम’ हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तब्बल 44 हजार मते घेत आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे या मतदारसंघातून पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप निवडून आल्या असल्या तरी राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. या मतदारसंघात पराभूत झालेले काटे यांनाच फक्त आपले डिपॉझिट वाचविता आले असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आपल्या पहिल्याच भाषणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोट ठेवले. चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना तांबे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ७५ हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल कुठेही उल्लेख नव्हता. ‘शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. २ लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहे. मात्र ७५ हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे? सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या-ज्या वेळेस शेतकरी अडचणी आला त्या-त्या वेळेस सरकारने मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीबाबतचे स्पष्ट धोरण सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलताना आमदार थोरात म्हणाले, भाजीपाला, कापूस, सोयाबीनसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. नाशिकसह इतर तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कांदा पिकासाठी उत्पादनासाठी खर्च ही मोठा आहे. यामुळे सध्या मातीमोल परिस्थिती निर्माण झाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्रामध्ये पुण्यात कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने एक जागा गमावली असताना दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये भरारी घेतली आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्रात एकही आमदार नाही. तरी देखील राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या आठवले यांनी आपल्या पक्षाचे नागालँडमध्ये खाते खोलले आहे. आठवले गटाचे थेट नागालँडमध्ये आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आठवले यांची पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असताना चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला मोठे यश मिळविता आले. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तब्बल ३६०९१ मतांनी विजयी झाल्या आहेत. कसबा पेठ मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील उमेदवार न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. याचा मोठा फटका भाजपला बसला असताना चिंचवड मध्ये मात्र भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड मधून निवडणूक लढविण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाची प्रभावी अंमलबजावणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी मधील ३१ गावामधील नोंदणीकृत ५ हजार ९१६ बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. असंघटीत कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ३२ विविध योजनांची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना महत्वपूर्ण मानली जाते. ग्रामीण भागातील इमारत व बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली असून शिर्डी मतदार संघाने यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 प्रमाणे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणारे तक्रारदार हे पाथरे बुद्रुक ता. सिन्नर जि. नाशिक येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. थकीत कर्जदारांवर संस्थेमार्फत कलम 101 प्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. सिन्नरच्या सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील यांनी या प्रमाणपत्रासाठी एका नोटीस करिता प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली होती. सतरा नोटीस करिता पाटील यांनी पंचवीस हजार पाचशे…
महाराष्ट्र संवाद न्यूज जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यासमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजक धार्जिन्या सरकारने पुढाकार घ्यावा. वीज जोडण्या तोडू नये, कांद्याला भाव वाढ मिळावी, महागाई कमी करावी आदी मागण्यासाठी शनिवारी (४ मार्च) काँग्रेसच्यावतीने बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे व तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले, शनिवारी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन होणार आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी असून सरकारकडून शेतकऱ्यांना काहीही दिले जात नाही. उलट उद्योजकांना कोट्यावधी रुपयांची माफी दिली जाते. उन्हाळ्याचे दिवस…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. धंगेकर यांच्या रूपाने काँग्रेसने १९९२ नंतर म्हणजेच तब्बल २८ वर्षानंतर भाजपकडून ही जागा पुन्हा ताब्यात मिळविली आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११,०४० मतांनी पराभव केला आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीत पहिल्या फेरीपासून आपली आघाडी कायम ठेवली होती. धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसत आहे. कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लागली. निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी लोकसभा निवडणुकीत यावेळी निवडून येणारा खासदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच असेल, अशी ग्वाही शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबन घोलप यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातदेखील शिवगर्जना अभियानास सुरुवात करण्यात आली. संगमनेरमध्ये व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात बुधवारी झालेल्या शिवगर्जना अभियानावेळी घोलप बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विनोद कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, युवा सेनेचे साईनाथ दुर्गे आदी पदाधिकाऱ्यांसह संगमनेर-अकोलेतील शिवसैनिक, गटप्रमुख,…
महाराष्ट्र संवाद न्यूज आई आणि तिच्या दोन तरुण मुलींनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातील मन्याळे येथे समोर आला आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे अकोले तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली. सुनिता अनिल जाधव (वय 48 वर्ष), प्राजक्ता अनिल जाधव (वय 22 वर्ष) आणि शितल अनिल जाधव (वय 19 वर्ष) अशी दुर्दैवी माय लेकींची नावे आहे. सुनिता जाधव यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मुली प्राजक्ता आणि शितल या दोघी बहिणींनी गावातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिघी मायलेकींनी आत्महत्या कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेव्हा विच्छेदनानंतर तसेच पोलीस तपासात ही माहिती पुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचे उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील. मात्र माझ्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी १०० वर्षे दिली मात्र, त्याच पक्षाने मला स्पष्टीकरणाची एकही संधी न देता हाकललं असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी त्यांची खंत व्यक्त केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत निवडणूक जिंकणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षांतर्गत घडलेल्या काही गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले, माझ्यासोबत काय घडलं ती खूप मोठी गोष्ट आहे. ती मी नंतर कधीतरी सांगेन. मला अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागली कारण माझ्यापुढे काही पर्यायच उरला नव्हता. नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. मला अपेक्षा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी ऊर्जा धोरण 2020 अंतर्गत राबवलेल्या निविदा प्रक्रियेतून संगमनेर तालुक्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी 10 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कृषी ऊर्जा धोरण 2020 अंतर्गत तालुक्यातील ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी तळेगाव दिघे, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपारणे, निंबाळे व रहिमपूर या गावांकरता 33 kV, 5 MVA अतिरिक्त पावर ट्रान्सफार्मरसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी 10 कोटी 40 लाख रुपयांचे निधीसाठी पाठपुरावा केला होता. नुकताच हा निधी मंजूर झाला आहे. नव्याने मंजूर झालेल्या या निधीतून अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर मिळणार असल्याने या गावांना जोडणाऱ्या गावांसाठी वीजपुरवठा सुरळीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज महिला आणि युवतींचे सबलीकरण, आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधित ८ ते १० मार्च दरम्यान महिलांच्या क्रिकेट कुस्ती बॅडमिंटन आणि रस्सीखेच स्पर्धांचा थरार रंगणार असल्याची माहिती एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमत:च या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि युवतींसाठी टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती आणि रस्सीखेच स्पर्धा संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात होणार आहेत. थोरात म्हणाल्या, आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्त संगमनेरमध्ये दरवर्षी…
