Author: Annant Ppangarkar
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) परभणी जिल्ह्यातील सेलू येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात लातूरचा तर, एकोणावीस वर्षांखालील गटात नागपूरच्या संघाचा पराभव करीत ध्रुव ग्लोबलच्या संघाने चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. परभणी जिल्हा आणि सेलू तालुका क्रीडा कार्यालयाने या स्पर्धांचे आयोजन केले होते. पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 17 वर्षांखालील संघाने साखळी सामन्यात मुंबईचा 2 विरुद्ध शून्य असा एकतर्फी तर कोल्हापूरचा 2 विरुद्ध 1 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक घेतली. अतिशय अतितटीच्या अंतिम सामन्याच्या दुसर्या सत्रात ध्रुवच्या खेळाडूंनी आघाडी घेत लातरच्या संघाला 4 विरुद्ध…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्थानकामधून दररोज दागिने चोरीच्या घटना समोर येत आहे. बस स्थानकावरील पोलीस चौकी केवळ देखावा बनली असून या चोऱ्या रोखण्यास संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. संगमनेरहून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चोरट्यांनी हात मारत एका निवृत्त शिक्षिकेचे तब्बल साडेदहा तोळे वजनाचे दागिने हातोहात लंपास केले. दागिने, दुचाकी चोरांसोबतच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी संगमनेरात उच्छाद मांडला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे संगमनेरातील अवैध धंदे मात्र कोणत्याही कारवायाविना सुरूच आहे. अकार्यक्षम पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका संगमनेर करांना बसत असून तक्रारदारालाच पोलिसांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ लागले आहे. त्यामुळे चोरी परवडली, पण पोलीस चौकशीचा ससेमिरा नको, असे म्हणण्याची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाचा सपशेल पराभव करत सत्ता कायम राखलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील बाजार समितीचे सभापती, उपसभापती शुक्रवारी (ता.12 मे) निवडले जाणार आहेत. प्रतिष्ठेच्या असलेल्या या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. बाजार समितीचे सभापती, उपसभापती निवडण्यासाठी नूतन संचालकांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत आमदार थोरात यांनी निश्चित केलेल्या नावांना सहमती दर्शविली जाईल. सभापतीपदावर थोरात माजी सभापती शंकर खेमनर यांना पुन्हा संधी देतात की या पदासाठी दुसरे नाव समोर येते हे शुक्रवारीच कळणार…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीची निर्दोष मुक्तता केली आहे. अकोले तालुक्यातील गाजलेल्या या खटल्याचा बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला. बाळासाहेब विठ्ठल आडांगळे (रा. उंचखडक, ता. अकोले) असे न्यायालयाने मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून बाळासाहेब आडांगळे यांनी पत्नी कल्पना हिला ‘तू उद्धट आहे, काही एक ऐकत नाही, काल तू माझ्या तावडीतून वाचली, आज तुला सोडणार नाही’, असे म्हणत तिच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर कुऱ्हाडीने व चाकूने मारून तिला गंभीर जखमी केले होते. पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अकोले पोलीस ठाण्यात बाळासाहेब आडांगळे यांच्या विरोधात ११ सप्टेंबर…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) देशभरात उत्सुकता लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने केला. न्यायालयाने पहिली तीन निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ३० जूनला दिलेला राजीनामा चुकीचा ठरविल्याने सत्ता संघर्षाचा निर्णय शिंदे यांच्या बाजूने गेला. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. या निर्णयामुळे सरकार वाचले असून शिंदे-फडणीसांची सत्ता कायम राहिली आहे. ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे यांनी ३० जूनला दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागण्यासाठी कारणीभूत ठरला. ठाकरेंचा राजीनामा घेणं चुकीचं ठरलं, असं झालं नसतं तर परिस्थिती पूर्ववत करता आली असती,…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नव्या पोलीस निरीक्षकांच्या काळात संगमनेरात कायद्याचा धाक निर्माण होईल ही सामान्य नागरिकांच्या अशा फोल ठरली आहे. शहराच्या विविध भागात आणि बस स्थानकामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती माध्यमांपासून लपवून ठेवण्याचा आटापिटा पोलीस यंत्रणे कडून सुरू आहे. पोलिसांच्या लेखी फक्त कागदपत्रे गस्त असलेल्या संगमनेरच्या दक्षिणेकडील बहुवस्ती असलेल्या भागात मंगळवारी रात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला. या भागातून जवळपास चार घरफोडीचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास केला असून पोलिसांच्या दप्तरी मात्र किरकोळ मुद्देमाल दाखवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घोडेकर मळ्यातील भरगच्च लोकवस्तीतील अर्जुन काठे यांच्या घरी चोरीचा प्रकार…
दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) उद्या गुरुवारी (ता. 11 मे) घटनापीठाकडून दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा तसेच राजकीय पक्षांची धाकधूक वाढविणारा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाकडून राखून ठेवण्यात आलेला महाराष्ट्रातील सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार असल्याने यामुळे राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सोळा आमदारांच्या पात्रते, अपात्रतेसंदर्भात उद्या फैसला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा बरोबरच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथून एका सतरा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे वय सतरा वर्ष एक महिन्याचे असून अज्ञात व्यक्तीने तिला कसले तरी आमिष दाखवून तिला घरच्यांच्या रखवालीतून पळवून नेले. सोमवारी (ता. 8 मे) रात्री अकरा वाजल्यानंतर मंगळवारी (ता. 9 मे) सकाळी सहा वाजण्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे हा प्रकार घडला. सकाळी घरातील लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र मुलगी आढळून न आल्याने या संदर्भात…
सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुणेकर असलेल्या आणि साताऱ्यामध्ये दुय्यम निबंधक (वर्ग 2) पदावर कार्यरत असलेल्या उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42) याने नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एसीबीने सूर्यवंशी याला बुधवारी रंगेहात पकडले. सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी एसीबीने याबाबत पडताळणी केली असता सूर्यवंशी याने लाच मागितली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज बुधवारी (10 मे) लाचखोर सूर्यवंशी याला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदाराकडून सातारा येथे सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) यास एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना…
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर; ‘संगमनेर’मधून यांचा आहे समावेश
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी शिवसेनेचे (ठाकरे) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. पद, पदाधिकाऱ्याचे नाव व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : कक्ष जिल्हा संघटक : अशोक थोरे (कोपरगाव / श्रीरामपूर/नेवासा / राहाता / संगमनेर अकोले / राहुरी), कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस : अॅड. राहुल नवले, कक्ष जिल्हा सहसंघटक : प्रमोद कुलट (संगमनेर/अकोले / राहाता), कक्ष जिल्हा सहसंघटक दत्ता कडू (कोपरगाव…
राजापूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील धनलक्ष्मी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. नव्या संचालक मंडळात… अँड नबाजी गायकर, विजय रभाजी हासे, सुभाष भिवाजी हासे, भास्कर मारुती गुंजाळ, भाऊसाहेब संभू हासे, भास्कर गंगाधर मोहिते, सोमनाथ भाऊसाहेब सोनवणे, रामनाथ लक्ष्मण सोनवणे, संपत भागाजी गुंजाळ, सचिन भाऊसाहेब सातपुते, बाळासाहेब राजाराम हासे, विष्णू माधव सोनवणे, वसंत डांगळे, शिला तबाजी हासे व…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर अहमदनगरमध्ये बदलून आलेल्या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 9 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या पदांचा पदभार हाती घेतला. शिवराज मोरे, हेमलता बढे व पल्लवी निर्मळ या उपजिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली. भेटीनंतर मोरे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदाची, बढे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची व निर्मळ यांनी भूसंपादन उपजिल्हाधिकारी क्रमांक एक या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. 4 मे रोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील तर 8 मे रोजी तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार हाती घेण्यास सुरुवात केली…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर बस स्थानकाजवळचा हॉटेल कश्मीर समोरील अनधिकृत रिक्षा स्टॉप बंद करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या अनधिकृत रिक्षा स्टॉपजवळ राजू आखाडे यांची अल्पवयीन मुलगी उन्हाच्या तीव्रतेने भोवळ येवून पडली असता, या रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान याचवेळी येथून योगेश सूर्यवंशी, विशाल वाकचौरे, दिपक रणशेवरे जात होते. त्यांनी मुलगी तीव्र उन्हात रस्त्यावर पडलेली पाहिली, त्यांनी तिला तत्परतेने सावलीत नेवून पाणी पाजले, तरीही तिला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे या तिघांनी संयमाची भूमिका घेवून तिला दवाखान्यात नेण्याची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामाजिक जाणीव आणि संवेदना जागृत ठेवत शिक्षक सुनील कडलग व अनिल कडलग, लता पुष्पा व उषा या भावंडांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने रूढी परंपरा बाजूला ठेवत स्वामी विवेकानंद वाचनालय आणि आधार संस्थेस देणगी दिली. याचबरोबर विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून प्रेरणादायी कार्य केले. रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संस्थापक सुनील कडलग आणि आधार संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे अनिल कडलग यांच्या मातोश्री शकुंतला किसन कडलग यांचे सोमवारी (ता.8) प्रथम पुण्यस्मरण होते. आयुष्यभर सामाजिक जाण व भान जपणाऱ्या आईचा स्मृतीजागर हा प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करून व…
नासिक / संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोरून येणाऱ्या राजहंस दुधाच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी दुपारी सिन्नर पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर सिन्नर-नाशिक मार्गावर नाशिकच्या दिशेने एल अँण्ड टी फाट्याजवळ हा अपघात झाला. शहापूर आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. 06 एच. 8560 ही 40 प्रवासी घेऊन दुपारी शिर्डीहून शहापूरकडे निघाली होती. शहापूरच्या दिशेने जात असताना एसटी बस चालकाच्या बाजूने ओढली जात असल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात येताच बस चालकाने सिन्नर…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला नवे तहसीलदार मिळाले आहे महिनाभरापूर्वी 12 एप्रिलला बदलून गेलेल्या तहसीलदार अमोल निकम यांच्या जागेवर अमरावती विभागातून धीरज मांजरे बदलून आले आहे. याशिवाय शिर्डीच्या साईबाबा संस्थान मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संगमनेरला नवीन तहसीलदारांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. तहसीलदार अमोल निकम यांची नाशिकला बदली झाल्यापासून संगमनेरचे पद रिक्त होते. या पदावर शासनाकडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. सोमवारी 8 मे रोजी राज्य शासनाने नासिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद विभागातील तहसीलदारांच्या शासनाने केल्या बदल्या आहेत. अमरावती विभागामध्ये कारंजा येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती असलेले धीरज…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा यंदाचा नृत्य कलाभूषण पुरस्कार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पटकावला. सौम्या सचिन जोशी, अदिती राजेश लाहोटी व श्रिया अमोल मुळे या विद्यार्थीनींचा यात समावेश आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातील दीडशे स्पर्धकांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात ध्रुव ग्लोबलच्या तिघींचा समावेश आहे. नटराज आर्ट अँड कल्चरलचे प्रा. रवींद्र हरदास, आसमान फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रवी गिरे, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, प्रा. डिंपल साखरे, प्रा. सुंदरी पिसिपती, अनिल कावडे, ममता जयस्वाल, प्रा.…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणामध्ये सद्यस्थितीत 59.60% पाणीसाठा शिल्लक असून निळवंडे धरणामध्ये सद्यस्थितीत 57.12% पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी सायंकाळी निळवंडे मधून 600 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून साधारणतः 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.
गोंदिया (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शैक्षणिक संस्थेला कर्मचाऱ्यांचे 65 कोटी रुपये चुकविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पटेल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आणि सध्या बंद पडलेल्या संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखाली गोंदिया येथे मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ही संस्था कार्यरत होती. मात्र ही संस्था बंद पडल्याने अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. गोंदिया एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था खासदार पटेल यांचे कुटुंबीय चालवीत आहेत. 2018 मध्ये संस्थेत एकही प्रवेश नोंदविला गेला…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक गोळवळकर गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काँग्रेसच्या हरिभाऊ सोळंके यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मनोहर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोळंके यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व ५०१ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वरील संस्कृती संवर्धन नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक लिंक आली. सूर्यवंशी यांनी आलेली लिंक क्लिक करून ओपन…
