Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २२ ऑक्टोबर मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून पंचवीस-पंचवीस कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा प्रश्न करत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवारांचा हा व्हिडिओ आणि त्या अनुषंगाने उपस्थित केलेले प्रश्न चर्चेत आले आहे. आमदार रोहित पवारांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा…
मंगळवार, २२ ऑक्टोबर मुंबई – भारतीय जनता पक्षाने आपली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातून अकोले मतदार संघात विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना एबी फॉर्म दिल्याने ते महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असतील. अकोले मतदार संघाची जागा डॉ. किरण लहामटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे राहिली आहे. लहामटे यांना एबी फॉर्म मिळाल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवार गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गेल्या वेळी…
मंगळवार, २२ ऑक्टोंबर पुणे – पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे? याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास ५ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची…
मंगळवार, २२ ऑक्टोबर वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील मार्ग निघाला नव्हता. अखेरीस ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’आणि ‘संगमनेर टाइम्स’ने या उपोषणकर्त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत उपोषणार्थींची समस्या लक्षात घेत त्यांना सोमवारी सकाळी दोन पर्यायी रस्ते काढून दिले. असे असले तरी मूळ बंद केलेल्या रस्त्याबाबत अपील सुरूच राहणार आहे. रस्ता केस मध्ये तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांच्या बाजूने निर्णय देऊन देखील रस्ता वहिवाटीला खुला करून देण्यात आला नाही. उलट तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले. दादागिरीने रस्ता बंद करून कुटुंबाला…
मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष – आपल्या कार्यक्षेत्रात आपणास आता जास्त काम पडणार असल्याने जास्त दगदग होणार आहे. यामुळे आपल्याला थोडेसे थकल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. कुटुंबाला फारसा वेळ देता येणार नाही. वृषभ – शुभ ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. बेकार व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामात यश लाभेल, बँकेची कामे करून घ्या. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. मिथुन – स्वतःच्या हिंडणे फिरणे यावर नियंत्रण ठेवा. तसेच खाणेपिणे यावरही लक्ष ठेवणे आवश्यक. विनाकारण वादावादी घालू नका. कुठल्याही कारणाने दिवसाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. कर्क – पती-पत्नीमध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. दोघांनी समजुतीने घ्यावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही…
सोमवार, २१ ऑक्टोंबर भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची विधानसभा निवडणुकीचे पहिली यादी जाहीर केली. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची चिन्ह असताना आता तिसऱ्या आघाडीने आपले दहा उमेदवार जाहीर करत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी तयार झाल्या असून परिवर्तन महाशक्तीने सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपल्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बच्चू कडू, संभाजी राजे, राजू शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आले असून चांगले उमेदवार मिळाले तर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील उमेदवार दिले जाणार आहेत तसेच जेथे चांगले उमेदवार मिळतील तेथे निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.…
सोमवार २१ ऑक्टोबर नेवासे – निवडणुकीसाठी ईव्हीएम सुरक्षिततेच्यादृष्टीने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक…
सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मनोबल पण उत्तम राहणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. वृषभ – मन आज हलके होणार आहे. कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. कामही सहजतेने होणार आहेत. सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल. मिथुन – काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत. आपले खिसा पाकीट सांभाळा. कर्क – आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश…
रविवार, २० ऑक्टोबर मुंबई – राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.…
रविवार, २० ऑक्टोबर संगमनेर – अनेक वर्षांपासून वापरात असलेला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता दादागिरीने बंद करून कुटुंबाला रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि तहसीलदार यांनी हा रस्ता वहिवाटिस मोकळा करून द्यावा असा आदेश दिलेला असतानाही कुठलीही दखल न घेणाऱ्या संगमनेरच्या प्रशासनाच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील संपूर्ण कुटुंबाने आपल्या अडीच वर्षाच्या बालकासह गेल्या तीन ते चार दिवसापासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे. ऊन, वारा, पावसात हे उपोषण चालू असून प्रांत कार्यालयाकडून या संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाचे उपोषणकर्ते जागेवरच असल्याने माणसे मेल्यानंतर न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव…
