Author: अनंत पांगारकर
शनिवार, ०९ नोव्हेंबर राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुधाकर खाडे यांची हत्या झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना गंभीर जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे…
शनिवार, ९ नोव्हेंबर अहिल्यानगर – लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय असं सध्या सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील माझ्या बाबतीत असंच घडल्याची जाहीर कबुली देत वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. धांदरफळमधील त्या सभेमुळे आपली संगमनेरमधील संधी हुकली असल्याची कबुली माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे (भाजप) उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ शिराळ चिंचोडी येथील जाहीर सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. विखे म्हणाले, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या…
शनिवार, ०९ नोव्हेंबर पंचवीस वर्षीय महिला घरात अंघोळ करत असताना ओळखीच्या एका तरुणाने तिच्या घरात शिरुन तिला बाथरुमधून बळजबरीने बाहेर ओढून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा महिला चुलत सासरच्या घरी गेली त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेली असताना दोन जणांनी तिचा पाठलाग करुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना शहरातील स्वारगेट परिसरात घडली आहे. याबाबत पिडित महिलेने तीन आरोपी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही स्वारगेट परिसरात राहण्यास आहे. महिला घरात अंघोळ करत असताना सुरुवातीला एक आरोपी तिच्या घरी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या आठ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखी बंडखोरांनी दिली आहे. महायुतीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही, त्यातील काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली. त्यातील काहींना शांत करण्याचे प्रयत्न महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले. मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली आणि आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही बंडखोर मागे हटायला तयार नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. निलंबनाची कारवाई करताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी…
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येऊ लागला असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मंत्री अमित देशमुख आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने येत आहे, अशी माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तळेगाव दिघे येथे हे दोन्ही नेते विरोधकांवर टीका करताना काय भाष्य करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे…
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर संगमनेर – कुटुंबीयांकडे बघून शिवीगाळ करणाऱ्या दारूच्या नशेतील तरुण आणि त्याच्या दहा-पंधरा साथीदारांनी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच हाउसिंग सोसायटी मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकात घडला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात योगेश मदनलाल तिवारी (वय ४३ वर्ष, रा. कंचन कम्फर्ट हाऊसिंग सोसायटी, एकता चौक, घुलेवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सागर राऊत व त्याच्या दहा-पंधरा साथीदार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, योगेश तिवारी यांचा गोंदेफाटा, सिन्नर जि. नाशिक येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तसेच ते शहरालगतच्या घुलेवाडी येथील एकता चौकातील कांचन…
यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग विधानसभा निवडणूक तालुक्याच्या अस्मिता आणि स्वाभिमानाची शुक्रवार, ०८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुका हा कायमच शांतताप्रिय आहे. परंतु या तालुक्यातील जर कोणी येथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. येथील विधानसभा निवडणूक संगमनेर तालुक्याच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नवव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्या प्रचारार्थ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संगमनेर शहरात युवा संवाद यात्रा काढण्यात आली होती. दिवसभर शहराच्या सर्वच भागात सुरू असलेल्या या यात्रेत दोन…
गुरुवार ०७ नोव्हेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई तेरा वर्षांपूर्वी हत्या झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रमोद महाजन पक्षाच्या राजकारणात वरचढ ठरू नये यासाठी त्यांचा घात करण्यात आला. यामागे गृहकलश असल्याच्या वावड्या उडवल्या जात होत्या. मात्र त्यात जराही सत्य नव्हतं. ते एक षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांनी केला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हा ही हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी चर्चा केली जात होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष…
गुरुवार, ७ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम मशीन हाताळणी, मतदानासाठी यंत्र तयार करणे व मतमोजणी बाबतचे प्रशिक्षण गुरुवारी घेण्यात आले. संगमनेर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे, संतोष कोरे उपस्थित होते. प्रशिक्षणात विभाग प्रमुख व सहाय्यक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनच्या सिलिंग व सेटिंग, मतमोजणी प्रक्रिया, फेऱ्यानुसार व टेबलनुसार साहित्य हाताळणी, तसेच साहित्य वितरणाच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम यंत्राची तयारी व सीलबंद प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही घेण्यात आले. प्रशिक्षणामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत मिळाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी…
गुरुवार, ७ नोव्हेंबर नाशिक – विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करून उमेदवाराला निवडून आणतो असे सांगत त्याने ४२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने नाशिक मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांना विधान सभा निवडणुकीत मशिन हॅक करून पाडण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या परप्रांतीयाला नाशिक पोलिसांनी शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. भगवानसिंग नारायण चव्हाण (वय ३४ मुळ रा. अजमेर राजस्थान हल्ली विठू माऊली कॉलनी, मखमलाबाद, म्हसरूळ लिंकरोड) असे खंडणी मागत धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. चव्हाण याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अल्पावधीत संशयितास मखमलाबाद शिवारातून हुडकून काढले असून, त्यास मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन…
