Author: अनंत पांगारकर

सोमवार, ०५ ऑगस्ट संगमनेरमधील एका अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राजू पवार (रा. वडगाव गुप्ता रस्त्यावरील आठरे पाटील शाळेजवळ, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने पीडित फिर्यादी अल्पवयीन मुलीवर ९ मार्च २०२४ रोजी दुपारच्या वेळी व २७ जुलै २०२४ रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. यातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ती’ विवाहिता पती आणि मुलासोबत बँक खात्याची केवायसी करण्यासाठी बँकेत आली. बँकेत गर्दी असल्याने नवऱ्याला मुलासाठी खाऊ आणण्यास पाठविले आणि बँकेत असे काही घडले की नवऱ्याला बायकोच्या शोधासाठी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती पाहून पोलिसांसोबत सर्वच चक्रावले. सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगवा सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची धावाधाव सुरू आहे. अशा स्थितीत या योजनेच्या नावाखाली महिलेने आपल्या पती मुलासह बँकेत येत प्रियकरासोबत भुर्र होण्याचा प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये समोर आला आहे. घडलं असं की, नांदेडच्या…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्ध विचारांचे वारसदार असलेले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनालयाकरिता अध्यायावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता संगमनेर तालुक्यातील बारा गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयाकरता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. थोरात म्हणाल्या, तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. याकरता आमदार थोरात व आपण पाठपुरावा केला. संगमनेरमध्ये वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक…

Read More

सोमवार, ०५ ऑगस्ट मुळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत असून मुळा नदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर व पारनेर तालुक्यांना जोडणारा साकुर नजीकचा मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून मुळा नदीचा उगम होत असून नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साकुर नजीकच्या मांडवे येथील पुलाच्या माध्यमातून संगमनेर-पारनेर हे दोन तालुके जोडले गेले आहे. सद्यस्थितीत रविवारी हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील संपर्काचा मार्ग…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट  शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे मंत्री विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी उपस्थित होते. सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान,‌ इंदिरा गांधी,‌ श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व…

Read More

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवा एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घ्या, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी रविवार, ०४ ऑगस्ट मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत. पुणे परिसरातील…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट  राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत असताना गेल्या दोन दिवसात या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या टीकाटिप्पणीनंतर आता विखे यांच्यावर पलटवार करत आमदार रोहित पवार यांचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान राधाकृष्ण…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३४३.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेजारील पुणे व नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे‌‌, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्याच्या ७६.६६% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. आज दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील गोदावरी…

Read More

रविवार, ०४ ऑगस्ट पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपयांवर तडजोड करणाऱ्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. थोरबोले लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. एका ३२ वर्षीय व्यक्ती विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्ज आला होता. या तक्रार अर्जाचा तपास सहाय्यक निरीक्षक थोरबोले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. थोरबोले यांनी तपासात त्यांच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तसेच भविष्यात त्रास न देण्यासाठी पाच लाख रुपयांची…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत गलिच्छ पातळी गाठणार्‍या भाजपला धक्क्यावर धक्के बसूनही त्या पक्षाचे नेते सुधारण्याचं नाव घेत नाहीएत. या घाणेरड्या राजकारणाचे फटके लोकसभेत पडले तरी हे नेते पक्षाला खड्ड्यात घालण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे अनिल देशमुख यांच्यावरील कथित पलटवाराने दाखवून दिलं आहे. राज्यात गेल्या दहा वर्षातील राजकीय उलथापालथीचं केंद्र हे भाजपच होतं आणि आहे. या घटनांमागे असलेल्या अनेकांची नावं आता हळूहळू पुढे येऊ लागली आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात ज्या काही घटना घडल्या त्यामागच्या घडामोडी पाहिल्या की भाजपने महाराष्ट्राचं राजकारण किती खाली नेलं हे दिसून येतं. आघाडी सरकारमधले गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईत समित कदम…

Read More