Author: अनंत पांगारकर
सोमवार, २६ ऑगस्ट पुणे – भांडण सोडविण्यास गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. पसार झालेल्या हल्लेखोरांना सोलापूर परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९ वर्ष, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २० वर्ष, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्या वेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड…
सोमवार, २६ एप्रिल | अनंत पांगारकर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या काळात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती, मात्र संगमनेरकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दोन मटका टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना पंधरा दिवसाचा कार्यकाळ उलटून देखील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या ‘शक्तिमान टॉवर’चा पत्ता सापडलेला नाही. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात केलेल्या उपोषणानंतर जिल्हा पोलीस दलात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या जागेवर नगरहून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब…
सोमवार, २६ ऑगस्ट मुंबई – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहील, अशी अट टाकण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंधपत्र सादर करावयाचे आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून १० दिवसाच्या आत या संदर्भात बंधपत्र द्यायचे आहे. या कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत निवडून आलेल्या संचालकांकडून पदभार घेतल्यापासून ३० दिवसांच्या आत बंधपत्र द्यावयाचे आहे. यापूर्वी वैयक्तिक…
सोमवार, २६ ऑगस्ट नांदेडचे काँग्रेसचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांचे आज हैदराबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून निवडून आलेले काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचा विजय महत्वपूर्ण मानला जात होता. त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. गेल्या आठवड्यात १५ ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. शिवाय अचानक बीपीदेखील कमी झाला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने…
सोमवार, २६ ऑगस्ट संगमनेर रोटरी क्लबने माजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात युद्धभूमीवर लढलेल्या माजी सैनिकांनी युद्धाचे थरारक प्रसंग आणि यादरम्यान स्वतः त्यातून कसे बाहेर पडले याची माहिती सांगताना अनेकांच्या डोळ्यासमोर युद्धाचे ते थरारक प्रसंग उभे राहिले होते. बुधवारी (२३ ऑगस्ट) रोटरी हॉलमध्ये सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक कॅप्टन रावजी भागुजी घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. घुले यांच्यासह माजी सैनिक कार्तिक तांगडकर, सखाहरी माळी, सुभाष कातोरे, सुभाष खताळ, काशिनाथ घुले, काशिनाथ खिलारी, रामनाथ हासे, रमेश सातपुते, विजय जोशी, दत्तात्रय नवले, बाजीराव…
सोमवार, २६ ऑगस्ट संगमनेर – साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त संगमनेरच्या साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ आवसक यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) सकाळी ९ ते ४ या वेळेत संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आवसक यांनी म्हटले आहे. नानांच्या जयंती वर्षानिमित्ताने साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारीत विषय सर्व गटातील स्पर्धकांसाठी देण्यात आलेले आहेत. स्पर्धेचे हे ४१ वे वर्ष आहे. इयत्ता तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी, नववी ते…
सोमवार २६ ऑगस्ट २०२४ मेष – धनस्थानी असलेली मंगळ गुरु चंद्र हर्षल युती आज तुमचा खिसा पाकीट मालामाल करणार. प्रवास खर्च वाढविणारा दिवस. वृषभ – जन्मस्थानी असलेला चंद्र गुरुचा राजयोग तुम्हाला आज वाहनयोग दर्शवतो. संततीकडून मात्र अपेक्षाभंगाच दुःख पदरी पडण्याची शक्यता. मिथुन – आज लांबचे प्रवास योग दर्शवतात. श्री गणेशाची आराधना करावी. कर्क – मित्रांबरोबर नाच गाण्याचा आनंद घ्याल. आज आपल्या हातून घडलेल्या कर्मामुळे मान सन्मान वाढेल. सिंह – आज सगळीकडे आनंदी वातावरण अनुभवाल. अध्यात्मिक प्रगती साधण्याचा दिवस. कन्या – आज खोट्याचा अगदी तिटकारा येईल व नेमके तेच आज अनुभवाल. चिडचिड वाढेल. तूळ – मनाचे धार्मिकता वाढलेली असेल. आज एखाद्या…
रविवार, २५ ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)… ✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा. ✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. ✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ. ✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. ✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी. ✅ पर्यायी खडकवासला…
रविवार, २५ ऑगस्ट भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर पुण्यात कोयता गॅंगने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या रामटेकडी भागात घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून दोन्ही हल्लेखोर आरोपी अल्पवयीन आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. यातील एकावर वीस तर दुसऱ्यावर चौदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्याच्या रामटेकडी भागात दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू होती. या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड घटनास्थळी गेले होते. गुंडांना पकडत असताना अचानकपणे…
रविवार, २५ ऑगस्ट कल्याणवरून संगमनेरमध्ये यात्रेसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, पश्चिम कल्याण येथील कौशल्या हरी शिंदे (वय ६० वर्ष) ही महिला संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आशापीर बाबा यात्रेला जाण्यासाठी कल्याण येथून बुधवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये आली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्टैंडवर पारेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने या महिलेला पाठीमागून धक्का देत तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे पेंडल असलेले सोन्याची साखळी लंपास केली. संबंधित…
