Author: अनंत पांगारकर
प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन शुक्रवार ५ जुलै थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रस्त्यांच्या दुतर्फा, गावोगावी, मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ शनिवारी ६ जुलैपासून करण्यात येणार असून या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आयोजित १८ व्या दंडकारण्य अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ…
गुरुवार, ५ जून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून सुविधा निर्माण करून दिली असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. इंद्रजीत थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सहा वर्षाच्या कृषीमंत्री पदाच्या काळात अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या असून याच कालावधीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक शेती उत्पन्न करणारे राज्य ठरले होते. कृषी विद्यापीठ बांधावर, महापीक अभियान, मागेल त्याला शेततळे, शिवार फेरी असे अनेक उपक्रम आमदार थोरात यांच्या कार्यकाळात राबवले गेले. शेती संबंधीच्या…
शुक्रवार, ५ जुलै कर्जाच्या हप्त्यापोटी बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून धनादेशाची रक्कम स्वतःच्या खात्यावर गोठवून घेतल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली असून सोबत बावीस हजार रुपयांचा दंडही सुनावला. अजिज महंमद शेख (रा. महात्मानगर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात हस्ताक्षर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची साक्ष नोंदविली गेली. याबाबत अधिक माहिती अशी, राधाकिसन धीरुराम धांजल (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी टाटा फायनान्सचे कर्ज घेतलेले होते. त्याचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी आरोपी शेख यास बँक ऑफ महाराष्ट्रच्या पंचवटी शाखेचे ३३ धनादेश तयार करण्यास सांगितले होते.…
मुंबई | प्रवीण पुरो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दूध भावाच्या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ असा हरीनाम गजर करत महायुतीच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शन करताना पाहायला मिळाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. “दूध भुकटी…
गुरुवार ४ जुलै महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मोरे यांनी आंबेडकरांचीही साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरे गटाकडून मोरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. https://x.com/vasantmore88/status/1808791238285668776?s=19 पुण्याच्या मोरे यांनी इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले आता तेथून खाली उतरत मशाल हाती घेण्याचा नवा राजकीय निर्णय मोरे यांनी घेतला आहे. राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली.…
गुरुवार ४ जुलै संगमनेरमधील प्रख्यात उद्योजक राजेश मालपाणी असल्याचे भासत फोनवरून अज्ञात आरोपीने तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नव्याने बदललेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारासंदर्भात राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी साडेनऊ वाजता मालपाणी हाऊस मध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एका मोबाईल क्रमांकावरून दुबे यांना फोन करत फोनवर राजेश मालपाणी असल्याचे भासवत तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगितले.…
गुरुवार ४ जुलै काँग्रेस नेते, माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. नागपूर सहकारी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांच्या शिक्षेला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे केदार आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्यात सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. बँकेची रक्कम बँकेच्या परवानगीशिवाय खाजगी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवण्यात आली होती. या कंपन्या पुढे दिवाळखोरीत निघाल्या. शिवाय बँकेलाही रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही…
गुरुवार ४ जुलै गेल्या पावसाळी अधिवेशनात नासिक मुंबई मार्गाच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ३१ मार्चपूर्वी या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ३१ मार्च उलटून गेल्यानंतर देखील या मार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक भीषण झाल्याचे वास्तव थोरात यांनी आज पुन्हा सभागृहात मांडल्याने सरकारचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून आले. थोरात यांनी गुरुवारी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय पुन्हा एकदा सभागृहासमोर मांडला. यासाठी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा देखील दाखला दिला. ते म्हणाले, पूर्वी या रस्त्याने मुंबईला येण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी…
गुरुवार, ४ जुलै राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (६ जुलै) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी दिली. बैठकीमध्ये ८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) मार्चअखेर खर्चास मान्यता, सन २०२४-२५ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनु. जाती उपयोजना) व जुनअखेरच्या खर्चाचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गुरुवार, ४ जुलै भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी रात्री ९ वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षीय अडवाणी यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या आहेत. काही दिवसांपूर्वी अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती…
