Author: Annant Ppangarkar
प्रवीण पुरो भारताच्या सार्वभौम लोकशाहीला ज्या-ज्या कोणी वाळीत टाकले त्यात प्राधान्याने ज्ञानेश वर्मा या व्यक्तीचे नाव घेतले जाईल. पेशाने ते आयएएस असले तरी ते स्वीकारताना लोकशाहीच्या संवर्धनाची घेतलेली शपथ या माणसाने पायदळी तुडवली आहे. देशात राबवल्या जात असलेल्या निवडणूक प्रक्रियेत घटनात्मक बदलाचा वापर करण्याऐवजी या आयुक्ताने मनमानेल असे बदल केले आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असा हिणकस कारभार केला. किमानपक्षी तक्रारी झाल्या की त्याची दखल घ्यावी, असेही ज्ञानेश यांना वाटले नाही. हा माणूस सत्ताधारी भाजपला विकला गेला, असा आरोप खुलेआम का होतो ते आज उघड झाले आहे. स्वतःला सत्यावानाचा अवतार समजणाऱ्या या व्यक्तीने निर्लज्जतेच्या सारे मर्यादा पार केल्या…
आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला आणि कष्टाला मोठे यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाचा आणि समंजसपणाचा आहे. व्यवसायात धनलाभाचे योग बनत आहेत, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ निसर्गात किंवा ध्यानात घालवणे उत्तम ठरेल. मिथुन- आज तुम्हाला विविध क्षेत्रातून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटातील ‘मातोश्री वृद्धाश्रमा’त आज, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एका वृद्धाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सुरक्षारक्षकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. शारीरिक व्यंगावरून वृद्धाश्रमातील इतर रहिवाशांनी केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने संतप्त झालेल्या एका वृद्धाने झोपेत असलेल्यांवरच लोखंडी रॉडने भीषण हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराला तात्काळ अटक केली आहे. महंकलेश्वर बाबुराव हेने (वय ५८, रा. भिंगार) आणि दत्तात्रय शंकर हरके (वय ८०, रा. जामखेड) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर गोरक्ष हरिभाऊ फुंदे, गणेश छबु घोडके, बाबासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- SIR संदर्भातील नोटिसा काही नागरिकांना प्राप्त होत असून, या नोटिसांमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, दक्ष राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि प्रशासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केले आहे. SIR प्रक्रियेमध्ये सेल्फ मॅपिंग, प्रोजेनी मॅपिंग किंवा नो मॅपिंग अशा प्रकारच्या नोंदी असलेल्या नागरिकांना नोटिसा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोटीस प्राप्त झालेल्या नागरिकांनी तातडीने आपल्या संबंधित BLO शी संपर्क साधावा, असे शेलकर यांनी सांगितले. नोटीस मिळालेल्या नागरिकांनी आगामी कॅम्पच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तयारी ठेवावी. स्वतःच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात झालेला अत्यंत अल्प पाऊस आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने हाता-तोंडाशी आलेली खरिपाची पिके वाया गेली आहेत. या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, ही काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात सर्वत्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झाला होता. संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमधून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने लावून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- चालू वर्षी पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे संगमनेर तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत संगमनेरचाही समावेश करण्यात आला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पावसाअभावी खरीप पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पिंपळे येथे प्रत्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द परिसरात अत्यंत शांततेत आणि पारंपरिक उत्साहात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये आश्वी पोलीस ठाण्याने दडपशाही आणि अरेरावी करत मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक गणेश मंडळांनी केला आहे. “गुन्हे दाखल करतो” अशा धमक्या देत कार्यकर्त्यांवर धावून जाणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्व नियमांचे पालन करून रीतसर परवानग्या घेतलेल्या असतानाही विसर्जन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मंडळे आणि वाद्यवृंदांना नोटिसा बजावल्या. मिरवणुकीदरम्यान वाद्यांच्या तालावर शांततेत नाचणाऱ्या तरुणांवर आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी थेट दमदाटी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेनुसार पहिला टप्पा लागू करत २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. या घोषणेचे अखिल भारतीय किसान सभेने स्वागत केले असले, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजनांचा यात अभाव असल्याचे स्पष्ट केले आहे. सलग दोन खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यामुळे अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री आश्वासने न देता तातडीने भरपाई देण्याची आक्रमक मागणी किसान सभेने केली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आणि यंदा पावसाच्या अभावाने दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. उत्पादनात प्रचंड घट झाली असून शेतीचा खर्च, कर्जाचा बोजा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर संगमनेर शहरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा भक्ती, जल्लोष आणि अनोख्या उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात संगमनेरकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार अमोल खताळ यांनी स्वतः ढोल वाजवत गणेशभक्तांमध्ये भरलेला उत्साह! गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपली जावी, या उद्देशाने आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी विसर्जन मिरवणुकीतील मंडळांसाठी भव्य स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गणेश मंडळाचे आमदार खताळ यांनी वैयक्तिकरीत्या स्वागत करून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. तुमच्या मनात नवीन कल्पना आणि योजनांचा संचार होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्याने केलेले काम वरिष्ठांच्या पसंतीस पडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण होणारे खर्च टाळलेले बरे. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर आहार घ्या. वृषभ – आजचा दिवस तुम्हाला संयम आणि धैर्याने काम करण्याचा आहे. मानसिक शांतता जपणे आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात काही नवीन संधी चालून येऊ शकतात, पण कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. घरात धार्मिक किंवा मांगलिक कार्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या दृष्टीने सर्व सामान्य नागरिक समान असतात,’ असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. संगमनेर शहरातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मानाच्या सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मोठ्या उत्साहात सुरू झाली. त्यावेळी आयोजित महाआरतीप्रसंगी ते बोलत होते. रंगारगल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणरायाची महाआरती आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. १३१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपणाऱ्या या मंडळाच्या आरतीप्रसंगी प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झालेल्या दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या नात असलेल्या नीला विखे-पाटील या त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. राजकीय कारकीर्दचं यश श्रेय हे त्यांचे काका, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ, माजी खासदार सुजय विखे-पाटील घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नीला यांनी माझ्या विजयाशी राधाकृष्ण आणि त्यांचा मुलगा सुजय यांचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिल्याने पितापुत्र अक्षरशः तोंडघशी पडले आहेत. नीला विखे-पाटील यांनी स्टॉकहोममधून बोलताना सांगितलं की, कुणीतरी मला सुजय विखे-पाटील हे बढाई मारत असल्याचा व्हिडिओ पाठविला. विखे-पाटील कुटुंबाच्या खासदाराचा महाराष्ट्रात पराभव झाला असला तरी त्यांच्या कुटुंबातील दुसरा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला. या पार्श्वभूमीवर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात ‘एकविरा फाउंडेशन’च्या ४५० युवक-युवतींनी प्रवरा नदीकाठी व विविध विसर्जन स्थळांवर नागरिकांना मदत करत निर्माल्य संकलन आणि स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबवली. गेल्या सात वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा सामाजिक उपक्रम यावर्षीही नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. गणेशोत्सवाच्या उत्तररंगात संगमनेर शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळांचे बाप्पा आणि घरगुती गणेशमूर्तींचे सुरक्षित विसर्जन करण्यासाठी एकविरा फाउंडेशन व संगमनेर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या विसर्जन सोहळ्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज- सोमेश्वर गणेश मंडळाने २००२ पासूनच डीजे व गुलाल बंदी करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक आदर्श आणि शिस्तबद्ध परंपरा निर्माण केली. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त करत विघ्नहर्ता गणरायाच्या आशीर्वादाने उर्वरित काळात संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी व नागरिक सुखी-समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरच्या १३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या रंगारगल्लीतील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन पारंपारिक पद्धतीने काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. गणपतीच्या पूजन सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील १३१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या रंगारगल्ली येथील ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानाच्या पहिल्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याची सुरुवात श्री सोमेश्वर मंदिरात महादेवाची तसेच गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून करण्यात आली. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात उपस्थित राहून महादेवाचे व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तब्बल १३१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या मानाच्या गणपतीला ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणून संगमनेर शहरात विशेष श्रद्धेचे स्थान आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी श्री सोमेश्वर मंदिरात धार्मिक विधी आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) संध्याकाळी कोकणगाव येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला. आरोपींमध्ये शिवम नंदकिशोर ढगे (अध्यक्ष, शिवबा प्रतिष्ठान कोकणगाव), हेमंत यशवंत धुमाळ (रा. सांबरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), अजित अंबादास जोंगधडे (अध्यक्ष, शिवछत्रपती प्रतिष्ठान पानसरवाडी, कोकणगाव), अक्षय बाजीराव लोहकरे (रा. मांजर चांदोली, ता. आंबेगाव, जि. पुणे), जनार्दन लक्ष्मण पारधी (अध्यक्ष, उमाजी नाईक प्रतिष्ठान कोकणगाव) आणि आकाश विठ्ठल गुंजाळ (रा. बांडगाव, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. या विसर्जन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई मन्सुरी यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोणी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ भाई शेख यांनी या नवनियुक्त कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इदरीस मुलतानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. इरफानभाई मन्सुरी यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही लीलया पार पाडाल. आर्थिक बाजू मजबूत राहिल्यामुळे जुनी देणी पूर्ण करण्यात यश येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सौहार्दाचे राहील. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ तक्रारी वगळता दिवस उत्तम जाईल. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांतता बाळगण्याचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात घाईगडबडीने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळच्या वेळी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मनातील ताण कमी होईल. मिथुन – आजचा दिवस तुम्हाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर असून सर्व शासकीय योजना, पीक विमा आणि कर्जमुक्तीचा लाभ प्राधान्याने दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांना धीर देत, प्रशासनाने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत पुरवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक गुरुवारी पहाटे (२४ सप्टेंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, खांडगाव चौफुला कडून वैदुवाडीकडे लाल रंगाच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने खांडगाव रोडवर सापळा रचून संशयास्पद ट्रॅक्टर अडवला. ट्रॅक्टर ट्रॉलीची…
